दक्षिण भारतातील एकमेव केंद्रशासित राज्य पुददूचेरी, ( पुडुचेरी, Puducherry ) मधील सत्ता कॉँग्रेस ला गमवावी लागली आहे.काँग्रेसप्रणीत सत्तारुढ आघाडीतील आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री व्ही नारायणसामी (V.Narayanasamy ) यांचं सरकार संकटात आलं होतं.त्यांना आज सोमवारी विश्वासदर्शक ठराव जिंकायचा होता,मात्र विश्वास दर्शक ठरावात बहुमत सिद्ध करू न शकल्याने अध्यक्षांनी काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचं जाहीर केलं.
मुख्यमंत्री नारायणसामी यांनी राजीनामा देणाऱ्या आमदारांवर टीका केली असून संधीसाधू म्हणून त्यांचा उल्लेख केला जाईल असं म्हटलं आहे. “आमदारांनी पक्षासोबत निष्ठा राखली पाहिजे. राजीनामा देणारे आमदार आता लोकांना सामोरे जाऊ शकत नाहीत कारण त्यांना संधीसाधू अशी हाक मारली जाईल,” अशी टीका नारायणसामी यांनी केली आहे.
“केंद्र सरकारने लोकशाहीची हत्या केली असून पुद्दुचेरीमधील जनता आणि देश त्यांना धडा शिकवेल,” असा विश्वास नारायणसामी यांनी राज्यपाल भेटीनंतर व्यक्त केला आहे.
पुददूचेरी राज्य विधानसभेचे एकूण 33 सदस्य आहेत, त्यापैकी 30 सदस्य निवडून आले आहेत
आणि तीन नामनिर्देशित आहेत. कॉँग्रेस ला विश्वास दर्शक ठराव जिंकण्यासाठी 14 संख्या गरजेची होती.
मात्र कॉँग्रेसकडे 12 आमदार संख्या होती.विरोधी पक्षाकडे एआयएनआरसीचे 7, एआयएडीएमकेचे 4
आणि भाजपा-नाम निर्देशित 3 असे एकूण 14 चा आकडा आहे.त्यामुळे विरोधीपक्ष सरकार स्थापनेचा दावा करणार का हा प्रश्न आहे.
पुढील दोन महिन्यात म्हणजे एप्रिल-मे मध्ये पुददूचेरीत निवडणुका घेण्यात येणार आहेत,
त्यामुळे आता सरकार स्थापनेचा दावा केला जाईल की राष्ट्रपती शासन लागेल हे येत्या काळात स्पष्ट होईल.
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on February 22, 2021, 13:40 pm
Web Title: Congress failed to prove floor test in Puducherry cm narayansamy resigns