कोरोना च्या वाढत्या संसर्गामुळे पुण्यात पुन्हा एकदा नियम कडक करण्यात आले आहेत.संचारबंदी करण्यात आली आहे. (Pune corona updates)
कोरोना मुळे पुण्यात संचारबंदी
केसेस वाढल्याने पुणे जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लादण्यात आले असून रात्री 11:00 ते पहाटे 06:00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.यासोबतच शाळा कॉलेज आणि खाजगी कोचिंग क्लासेस वर सुद्धा बंदी घालण्यात आली असून ते 28 फेब्रुवारी पर्यंत बंद राहतील.तसेच विवाह सोहळ्याना केवळ 200 लोकांची परवानगी देण्यात आल्याचे समजते.याशिवाय कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम पोलिसांच्या परवानगीशिवाय घेता येणार नाहीत.तसेच हॉटेल्स रेस्टॉरंट रात्री 11 पर्यंतच सुरू राहतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
भाजपचे तेंडुलकर आरक्षण विरोधात अजेंडा रेटल्याने ट्रोल
#आरक्षण_जहर_है हा हॅशटॅग अजेंडा भाजपचे गोव्याचे राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी आज चालवला.भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून आरक्षण विरोधात गरळ ओकलेली विरोध केलेला आणि आरक्षण संपविण्यासाठी धडपड केल्याच्या बातम्या अधून मधून येत असतात,मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारात भारतीय जनतेसमोर भाजप हे आरक्षण संपवणारे नाहीत असं म्हणत असतात. भाजप सोबत सत्तेत असणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा भाजपची बाजू घेताना सतत असे म्हणताना दिसतात की भाजप आरक्षण संपवणार नाही,भाजपकडून संविधान आणि आरक्षणाला धोका नाही.आठवले काहीही दावे करत असले तरी.. वस्तुस्थिती मात्र याच्या विपरीत दिसत आहे.
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on February 21 , 2021 18:30 pm
Web Title – Increasing corona infection in pune from 11 pm to 6 am curfew