दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने रमेश नगर भागात धाड टाकली आहे. त्या ठिकाणाहून पोलिसांनी 200 किलो कोकेन जप्त केली, जी एका गोदामात ठेवली होती. जप्त करण्यात आलेल्या या ड्रग्जची किंमत अंदाजे 2 हजार कोटी रुपये सांगितली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 7 हजार कोटी रुपयांच्या ड्रग्जची स्पेशल सेलने जप्ती केली आहे. या ड्रग्ज रॅकेटचा आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड झाले आहे. ईडीने देखील दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून 2 हजार कोटींची कोकेन जप्त केल्यानंतर या प्रकरणाच्या तपशीलाची माहिती घेतली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोकेन आणणारा व्यक्ती लंडनला फरार झाला आहे. ज्या कारने ही कोकेन आणली होती, त्या कारमध्ये जीपीएस लावले होते. या जीपीएस लोकेशनचा मागोवा घेत पोलिस रमेश नगरमधील गोदामापर्यंत पोहोचले. जप्त केलेली ही कोकेन 5600 कोटींच्या कोकेनसह पकडलेल्या त्या सिंडिकेटची आहे. भारतामधील कोणत्याही तपास यंत्रणेकडून जप्त करण्यात आलेली ही सर्वात मोठी ड्रग्जची खेप आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आणखी काही ठिकाणी धाडी होण्याची शक्यता आहे. स्पेशल सेलला काही महत्त्वाच्या धागेदोऱ्यांची माहिती मिळाली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी पकडली होती 5 हजार कोटींची कोकेन
पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे की, 5 हजार कोटींच्या ड्रग्ज सिंडिकेटचा मास्टरमाईंड तुषार गोयल आणि मुख्य आरोपी वीरेंद्र बसोया हे जुने मित्र आहेत. बसोयाने तुषारला ड्रग्ज नेक्ससमध्ये सामील केले होते. बसोयाने कोकेनच्या खेपांच्या वितरणाच्या बदल्यात तुषारला प्रत्येकी कन्साईनमेंटसाठी तीन कोटी रुपये देण्याचे ठरवले होते. दुबईहून बसोयाने यूकेमधील जितेंद्र गिलला भारतात जाण्याचे सांगितले होते. त्यानंतर यूकेहून जितेंद्र गिल तुषारला भेटण्यासाठी आणि ड्रग्ज डील करण्यासाठी दिल्लीला आला. तिथे तुषारने त्याला पंचशील भागातील एका हॉटेलमध्ये थांबवले. नंतर दोघे गाजियाबाद आणि हापूड येथे ड्रग्ज घेण्यासाठी गेले. मुंबईत कोकेन ज्याला पुरवायची होती, त्या व्यक्तीची ओळखही दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उघड केली आहे. यासंदर्भात मुंबईतील संभाव्य ठिकाणांवर छापेमारी सुरू आहे.
दिल्लीच्या रमेश नगर भागात धाड
या प्रकरणात आतापर्यंत 4 लोकांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींची ओळख दिल्लीतील तुषार गोयल (40), हिमांशु कुमार (27) आणि औरंगजेब सिद्दीकी (23) आणि मुंबईतील भरत कुमार जैन (48) अशी झाली आहे. मास्टरमाईंड आणि मुख्य आरोपी तुषार गोयल असल्याचे सांगितले जात आहे, जो पूर्वी काँग्रेसमध्ये होता.
ड्रग्ज सिंडिकेटचे धागे दुबईशी जोडलेले
पोलिसांना माहिती मिळाली होती की, हे सिंडिकेट दिल्ली आणि इतर मेट्रो शहरांतील कॉन्सर्ट्स, रेव्ह पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विकण्याचा विचार करत होते. दुबईमध्ये राहणारा भारतीय नागरिक वीरेंद्र बसोया या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे. बसोयाला पूर्वी भारतात ड्रग्ज प्रकरणात अटक झाली होती, परंतु जामिनावर सुटल्यानंतर तो दुबईला पळून गेला आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कार्टेलचा मोठा माफिया बनला.
वीरेंद्र बसोया अनेक वर्षांपासून दुबईहून कोकेनच्या डीलिंगशी जोडलेला आहे, असे सांगितले जात आहे.
आंतरराष्ट्रीय यंत्रणांना वीरेंद्र बसोया विषयी माहिती शेअर करण्यात आली आहे, जेणेकरून त्याला दुबईमध्ये अटक केली जाऊ शकते.
वीरेंद्र बसोयाचे दाऊद गँग (डी कंपनी)शी असलेले संबंधही तपासले जात आहेत.
गेल्या वर्षी पुणे पोलिसांनी दिल्लीतील छापेमारीत 3 हजार कोटींच्या ड्रग्ज (म्याऊ म्याऊ) जप्त केली होती,
त्या ड्रग्ज सिंडिकेटमध्येही बसोयाचे नाव समोर आले होते. पुणे पोलिसांनी दिल्लीतील पिलंजी गावात बसोयाच्या ठिकाणी छापा टाकला होता,
परंतु पोलिसांच्या पोहोचण्याआधीच तो फरार झाला होता.
गेल्या वर्षी बसोयाने उत्तर प्रदेशातील एका माजी आमदाराच्या मुलीशी आपल्या मुलाचे लग्न दिल्लीतील एका आलिशान फॉर्महाऊसवर केले होते.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 10,2024 | 20:50 PM
WebTitle – 2,000 Crore Worth Cocaine Seized in Delhi, Total Drug Seizures Reach 7,600 Crore