एक महिन्यांपूर्वी आमच्या धम्मलिपि विद्यार्थीनी लता ताई गायकवाड यांनी फोन केलेला की पुण्यातील आमच्या विभागातील धम्म बांधव व भगिनीचा ग्रुप कर्जत मधील आंबिवली बुद्ध लेणी व कोंढाने बुद्ध लेणी बघण्यासाठी व अभ्यासण्यासाठी येत आहे,
कृपया तुमच्या टीमने येऊन मार्गदर्शन करावे असे निवेदन त्यांनी फोन द्वारे दिले होते, त्यानंतर तब्बल 3 आठवड्याने पुन्हा फोन आला की 25 नोव्हेंबरला दिघी पुणे येथुन 50 जणांचा ग्रुप कर्जत येथील कोंढाने बुद्ध लेणी, व अंबिवली लेणी पहायला येत आहे तेव्हा Mbcpr team ने आम्हाला लेणी व बुद्ध संस्कृती बद्दल मार्गदर्शन करण्यासाठी यावे,परंतु गुरूवार हा वर्किंग डे व असल्याने कोणत्याही लेणी संवर्धकास सुट्टी नव्हती,तेव्हा सुनील खरे यांनी लेणी संवर्धक/ अभ्यासक संतोष वाघमारे यांना याबाबत सांगितले असता त्यांना कामाची रजा टाकायला सांगितले आणी कोणताही संकोच न करता संतोष वाघमारे सर आणी लेणी संवर्धक दिपक सुरवाडे सर यांनी रजा टाकली ..
संतोष वाघमारे सरांची ही खासियत आहे की ते कोणत्याही कार्यशाळेस जातीने हजर असतात,
कितीही आर्थिक असो की मानसिक अडचण असो ते लेणींवर येतात
कितीही आर्थिक असो की मानसिक अडचण असो ते लेणींवर येतात म्हणजे येतातच..याचा सर्व MBCPR टीमला खुप अभिमान वाटतो…
पुणे येथुन आलेल्या धम्म उपासकांना अंबिवली बुद्ध लेणीचा इतिहास व त्यावर झालेलं अतिक्रमण, शिल्पकला आणी शिलालेखांचे वाचन धम्मलिपी विद्यार्थी लता गायकवाड यांच्याकडुन वाचन करून घेतले,तसेच दिपक सुरवाडे सर यांनी बुध्द लेणीवर अतिक्रमण कसे होते, ते अतिक्रमण कसे रोखले पाहिजे यावर मार्गदर्शन केले
धम्मसहलीचे अध्यक्ष संदीप सोणवने सर, प्रमिला गायकवाड, लता गायकवाड , शिल्पा कांबळे आदी यांनी उपस्थीत राहुन बुध्दलेणी इतिहास समजुन घेतला व पुढील
Mbcpr team च्या कार्यशाळेत सहभागी व्हायला आवडेल असे मनोगत व्यक्त सर्वानी हसतमुखाने केले…
आपलं वैभव जपल पाहीजे यासाठी सतत लेणींवर गेले पाहिजे,म्हणजे अतिक्रमणास आळा बसेल.
mbcpr_team
बुद्ध लेण्यांवर धम्मलिपी संशोधनाची विनामूल्य चळवळ
Good News : आंतरजातीय लग्न केले तर , हे राज्य देणार 5 लाख
धर्म बदलला तरी जात बदलत नाही; मद्रास हायकोर्टाचा निकाल
Jai bhim film Review – इरुलर जमातीचे भेदक चित्रण करणारा सिनेमा ‘ जयभीम ‘
सिनेमा: ‘जयभीम’, ‘जयंती’, सोशल मिडिया आणि समीक्षक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 28, 2021 14: 45 PM
WebTitle – Workshop held at Kondhane Buddha Caves and Ambivali Buddha Caves