मुंबई: मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. राखी सावंतला मुंबई पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले आहे. शर्लिन चोप्राने ट्विट करून राखी सावंत च्या अटक संदर्भातील ही बातमी शेअर केली आहे. काही काळापूर्वी शर्लिन चोप्राने राखी सावंतविरोधात मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी राखीला ताब्यात घेतले आहे. 19 जानेवारी रोजी शर्लिन चोप्राने ट्विट केले होते,
‘ब्रेकिंग न्यूज अंबोली पोलिसांनी FIR 883/2022 प्रकरणी राखी सावंतला अटक केली आहे.
राखी सावंतचा ABA 1870/2022 काल मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला.
राखी सावंत ला अटक का झाली?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई पोलीस काही वेळानंतर राखीला अंधेरी कोर्टात हजर करणार आहेत. पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राखी सावंतवर काही काळापूर्वी एका महिला मॉडेल (शर्लिन चोप्रा) चा आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शर्लिन चोप्रा ने तक्रार दाखल केल्यानंतर राखी सावंत ला अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे, बुधवारी, मुंबईच्या सत्र न्यायालयाने राखी सावंतचा एबीए फेटाळला, त्यानंतर तिला आज म्हणजेच गुरुवार, 19 जानेवारी रोजी ताब्यात घेण्यात आले.
राखी सावंत सध्या तिच्या आदिलसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे. यानंतर आईच्या ब्रेन ट्युमर आणि कॅन्सरची बातमी दिल्याने सर्वांचे डोळे ओलावले होते. काही काळापूर्वी राखीचा गर्भपात झाल्याची बातमीही आली होती. राखीवर संकटांचा डोंगर कोसळल्याचे दिसत आहे, मात्र आता आदिलने पुढे येऊन राखीच्या गर्भपाताचे सत्य सांगितले आहे. राखी सावंतच्या गर्भपाताच्या वृत्ताला पूर्णविराम देताना आदिल खान दुर्रानी यांनी ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे म्हटले आहे. तसे काहीही झालेले नाही. खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत.असेही त्याने म्हटले आहे.
सिमी ला भारत मुस्लिम राष्ट्र बनवायचंय,म्हणून बंदी -केंद्र
वरच्या ‘शक्तिमान’ला हवंय हिंदू राष्ट्र,मोदी सरकारकडे केली मागणी
भारतातील मुस्लिमांना घाबरण्याची गरज नाही – मोहन भागवत
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 19,2023 17:40 PM
WebTitle – why was rakhi sawant arrested?