अमरावती : त्रिपुरा येथील कथित हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी रझा अकादमी च्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. तसेच राज्यातील इतर मुस्लिम बहुल भागातही मोर्चा काढण्यात आला होता.गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव,नांदेड,अमरावती आणि अन्य काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या,मोर्चाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न झाला.याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने आज शनिवारी अमरावती बंद ची हाक दिली होती.यावेळीही या बंदला हिंसक वळण लागले.काही दुकानांची तोडफोड, दगडफेक करण्यात आली होती.जमावाकडून दगडफेक आणि तोडफोड करण्यात आल्याने हिंसाचार उफाळला. त्यामुळे जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकारी पवणीत कौर यांच्याकडून देण्यात आले अमरावती शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.
अमरावती मध्ये बंद ला हिंसक वळण का लागले? बांगलादेश ते महाराष्ट्र दरम्यान ची ही लिंक आणि विविध राजकीय मते आपण जाणून घेऊया
भाजपाने पुकारलेल्या अमरावती बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करण्यास नकार दिला.त्यामुळे बंद मध्ये सहभागी झालेला भाजप पुरस्कृत जमाव संतप्त झाला.चौकाचौकात आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली. दुकानं बंद न केल्याने दुकानेही जाळली गेली. दुकानांची तोडफोड करण्यात आली.यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
अमरावती हिंसाचाराची लिंक?
पत्रकार सामाजिक कार्यकर्ते भय्या पाटील यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.ते त्यांच्या ट्विट मध्ये म्हणतात की “आज अमरावतीमध्ये भाजपने ज्या गाड्या दुकाने हॉस्पीटल फोडली ते सर्व हिंदूंची होती. भाजपाला दंगल भडकावून राजकारण करण्यात जास्त रस आहे. आजच्या तोडफोडीचा खर्च या आंदोलन करणाऱ्यांकडून तात्काळ वसुल करावा. त्यांच्या संपत्तीवर टाच आणल्याशिवाय त्यांना अक्कल नाही येणार..”
संजय राऊत यांचा भाजपवर निशाना
संजय राऊत महागाई, बेरोजगारीवरून लक्ष हटवण्यासाठी ही दंगल घडवून आणली आहे. दंगली घडवणं हा भाजपचा हातखंडा आहे. राज्य चालवता येत नाही म्हणून भाजपकडून दंगली घडविण्यात येत आहे, असा थेट आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे आवाहन
अमरावतीतील परिस्थिती नियंत्रणाखाली येत आहे. माझी सर्व अमरावतीकरांना विनंती आहे, त्यांनी शांतता आणि संयम पाळावा. माध्यमांनीही दूरचित्रवाणीवर अप्रिय घटनांची दृश्ये दाखवताना त्यावर वेळ नमूद करावी, जेणेकरून लोकांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कारवाई करण्याची मागण
अमरावती बंद दरम्यान दुकाने फोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी
अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
दंगली घडवण्यामागे भाजपचा हात असल्याच्या संजय राऊतांच्या वक्तव्याचं त्यांनी खंडन केले असून
बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी राऊत यांच्या थोबाडीत मारली असती,असं ते म्हणालेत.
बांगलादेश मधिल घटना (सुरुवात)
बांगलादेशमध्ये दुर्गा पुजेच्या ठिकाणी मुर्तीच्या पायापाशी काही समाजकंटकांनी मुस्लीम धर्मग्रंथ कुराण ठेवल्याचा प्रकार घडला. ही माहिती व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण बांगलादेशमध्ये १५ ऑक्टोबरला अनेक दुर्गा पुजा मंडप आणि मंदिरांवर हल्ले झाले. बांगलादेशमधील अल्पसंख्यांक हिंदू समुदायाच्या घरांवरही हल्ले झाले. जवळपास आठवडाभर हा घटनाक्रम सुरू राहिला. बांगलादेशमध्ये अनेकांनी या धार्मिक हिंसाचाराविरोधात भूमिका घेतली. यानंतर दुर्गा पुजा मंडपात हे कुराण ठेवणाऱ्यालाही अटक झाली.
त्रिपुरात अनेक ठिकाणी हल्ले आणि हिंसाचाराच्या घटना
बांगलादेशमधील हिंसाचाराच्या घटनांनंतर २१ ऑक्टोबरला त्रिपुरात काही धार्मिक संघटनांनी रॅली आयोजित केली. यातील काही रॅलींचा शेवट पोलिसांसोबत संघर्षात झाला. त्रिपुरातील गोमती जिल्ह्यातील उदयपूर येथे मुस्लीम अल्पसंख्याक समाजाच्या घरांवर, दुकानांवर आणि मशिदींवर हल्ले करण्यात आले. या रॅली आयोजित करण्यात विश्व हिंदू परिषद, हिंदू जागरण मंच अशा धार्मिक संघटनांचा समावेश होता. या रॅलींनंतर झालेल्या हिंसाचारात ३ पोलिसांसह १५ जण जखमी झाले. अशाच रॅली पश्चिम त्रिपुरामधील आगरताळामध्ये देखील झाल्या. या ठिकाणी देखील काही समाजकंटकांनी मशिदीत सीसीटीव्हीसह इतर वस्तूंची तोडफोड केली
.त्रिपुरात या घटना घडल्या असल्या तरी सरकारची मात्र भूमिका वेगळी आहे. धार्मिक तणाव निर्माण झालेला असला तरी त्रिपुरा राज्य सरकारने मात्र राज्यात असं काही झालंच नसल्याचा दावा केला.नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवू नये तसेच शांतता पाळावी, असं आवाहनही करण्यात आले.त्रिपुरा राज्याचे माहिती आणि सांस्कृतिक मंत्री सुशांत चौधरी यांनी शुक्रवारी (१२ नोव्हेंबर) त्रिपुरात कोणत्याही मशिदीवर हल्ला झाला नसल्याचा दावा केला.
त्रिपुरात त्या घटना घडल्याच नाहीत,हे सुनियोजित षडयंत्र
महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही दावा केला आहे की त्रिपुरात अशा काही घटना घडल्याच नाहीत, त्यावर महाराष्ट्रात प्रतिक्रिया दुर्दैवी, हे सुनियोजित षडयंत्र आहे.अमरावतीमधील घटनाक्रम अस्वस्थ करणारा, हिंदूंची दुकाने जाळली गेली!राज्य सरकारमधील मंत्रीच जर भावना भडकावित असतील, तर हे अधिकच गंभीर!शांतता पाळावी, हे माझे सर्वांना आवाहन आहे !
यातील विशेष बाब म्हणजे त्रिपुरा उच्च न्यायालयाने त्रिपुरामधील हिंसाचारानंतर
स्वतः दखल घेत सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे.
तसेच त्रिपुरा सरकारला १० नोव्हेंबरपर्यंत राज्यातील हिंसाचारावर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.
गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांचे आवाहन
अमरावती मध्ये बंद ला हिंसक वळण का लागल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा असे सर्व हिंदू व मुस्लीम बांधवांना कळकळीचे आवाहन केले आहे.यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले असून या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी जनतेला केली आहे.गृहमंत्र्यांनी पोलिस बांधवांनाही परिस्थिती संयमाने हाताळण्याचे आणि राज्यामध्ये शांतता कशी राहील यादृष्टीने कार्य करण्याचे आवाहन केले आहे.
बांगलादेश कुठे आणि महाराष्ट्र अमरावती कुठे?
शेवटी अशा घटना घडतात तेव्हा हिंदू मुस्लिम मरत नाहीत तर मानवता मरत असते हे सर्वांनीच लक्षात घेणे गरजेचे.
डॉ.कफील खान यांना क्लीनचिट मिळूनही सरकारी सेवेतून केले बडतर्फ
“जय भीम” फिल्म पाहिल्यानंतर अभिनेत्याने “पार्वती” साठी घर देण्याचे ठरवले
हे वाचा जय भीम चित्रपटातील ती केस कायद्याच्यादृष्टीने का महत्वाची जाणून घ्या
जय भीम चित्रपट:पोलिसांनी बॅग भरून लाच देण्याचा प्रयत्न केला न्या.चंद्रू
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 13, 2021 17:46 PM
WebTitle – Why did the bandh take a violent turn in Amravati? Review from Bangladesh to Maharashtra