महाराष्ट्रातले राजकीय अन सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे.शाई फेक हा शब्द सध्या सोशल मिडियावर ट्रेंड करत आहे.भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या कथित बहुजन महापुरुषांच्यासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना वक्तव्याचा निषेध करत समता सैनिक दलाचे सदस्य मनोज गरबडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर निळा रंग फेकल्याचा आरोप करत त्यांना अटक करण्यात आली.
मनोज गरबडे यांच्यावर भां.दं.संहिता अनुसार कलम 7,37(1), 37(3), 120 ब , 135,294,307,353,355,500,501 इत्यादी भरमसाठ कलमे लावून अटक करण्यात आली.या कलमलावण्याच्या विरोधात अनेक नागरिक आणि राजकीय नेत्यानी भूमिका घेत चंद्रकांत पाटील यांना विचार करण्याच्या सूचना दिल्या.आपण या लेखात जाणून घेऊया की भारतात अशा कोणकोणत्या घटना घडल्या आहेत,कुणासोबत घडल्या आहेत.
मनीष सिसोदिया
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अंगावर शाईफेक करण्यात आली होती.
गुणरत्न सदावर्ते
गुणरत्न सदावर्ते हे सोलापूर दौऱ्यावर असताना. पत्रकार परिषद सुरू असतांना सदावर्ते यांच्या अंगावर काळी शाई फेकण्यात आली होती.
शरद पवार
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या कानाखाली मारली गेली होती,दिल्लीत,त्यावेळी अण्णा हजारे हसत हसत म्हणाले होते.. एकही मारा.. ?
दीपक दळवी
महाराष्ट्र मध्यवर्ती एकीकरण समितीचे बेळगाव शहर अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर त्यांनी शाई फेक करण्यात आली होती.
गिरीश कुबेर
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्याव नाशिक इथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या मुख्य स्थळी बॅटरी गाडीतून येत असताना संभाजी ब्रिगेडच्या दोन व्यक्तींनी शाईफेक केली होती
राकेश टिकैत
शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर बंगळूर येथे शाई फेक करण्यात आली होती. शाई फेक करणारे मोदी मोदी अशा घोषणा देत होते.घोषणा देणारे भाजपचे कार्यकर्ते नाहीत त्यांची चौकशी केली जाईल असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं.
पी चिदंबरम
पत्रकार परिषद सुरू असताना पी चिदंबरम यांच्यावर शीख पत्रकार जर्नेल सिंगने बूट फेकला होता.
सोमनाथ भारती
‘लिहून घ्या, योगी जाणार’ असं म्हणताच दिल्लीचे माजी कायदे मंत्री आणि आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांच्यावर उत्तर प्रदेशातील रायबरेली इथं शाई फेक करण्यात आली होती.
राहुल गांधी
2012 मध्ये डेहराडूनमध्ये एका रॅलीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर बूट फेकण्यात आला होता. यानंतर 2016 मध्येही राहुल गांधींवर आणखी एकदा बूट फेकण्यात आला होता.
जीतनराम मांझी
बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांची जानेवारी २०१५ मध्ये बूट फेकून मारण्यात आला होता. मांझी पाटणा येथील त्यांच्या निवासस्थानी जनता दरबारात लोकांना भेटत असताना त्यांच्यावर बूट फेकण्यात आला होता.
योगेंद्र यादव
जंतरमंतरवर महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आप नेते योगेंद्र यादव यांच्या तोंडाला एका व्यक्तीने काळे फासले.
योगेंद्र यादव त्यावेळी पत्रकार परिषदा घेत होते.
त्यानंतर योगेंद्र यादव यांनी संसद मार्ग पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना तरुणाला सोडण्याचे आवाहन केले होते.
यादव यांनी तरुणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यास नकार दिला होता. या तरुणाने त्यावेळी ‘भारत माता की जय’च्या घोषणाही दिल्या होत्या.
मनमोहन सिंग
प्रधानमंत्री मनमोहन सिंग चपलाचा बळी बनून बचावले. रविवारी, प्रधानमंत्री अहमदाबादमध्ये रॅली घेत होते ज्यात ते त्यांच्या 5 वर्षांच्या कार्याची माहिती देत होते आणि त्यांच्या कामाच्या आधारे मते मागत होते. त्यानंतर समोरच्या रांगेत बसलेल्या व्यक्तीने त्याच्यावर बूट फेकले.मात्र, स्टेजपासून त्या व्यक्तीचं अंतर दूर असल्याने प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना फेकून मारलेला बूट त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली, प्रधानमंत्र्यांनी त्या तरुणाला माफ केले. हितेश चव्हाण असे आरोपी तरुणाचे नाव असून तो बापूनगर येथील रहिवासी असून संगणक अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. तरुणांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करू नये, असेही प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी म्हटले होते.
लालकृष्ण अडवाणी
भारतीय जनता पक्षाचे भीष्म पितामह, लालकृष्ण अडवाणी हे देखील चप्पल फेक प्रकरणातून सुटू शकलेले नाहीत. एप्रिल 2009 मध्ये एनडीएचे प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी दौऱ्यावर असताना त्यांच्यावर चप्पल फेकण्यात आली होती. मध्य प्रदेशातील कटनी येथे ही घटना घडली होती. त्यावेळी अडवाणी एका सभेला संबोधित करत होते. भाजप कार्यकर्ता पावस अग्रवाल याने त्यांच्यावर चप्पल फेकली होती. अडवाणींच्या जिना यांच्यावरील प्रेमामुळे ते नाराज असल्याचे सांगण्यात आले होते.
संजय राऊत
शिवसेना नेते, खासदार व दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर लखनौ येथे शाई फेक करण्यात आली होती. शिवसेनेच्या नेत्यावर शाई फेकण्याचा हा पहिलाच प्रकार असून, तो उत्तर प्रदेशात घडला हे विशेष.
कन्हैया कुमार
उत्तर प्रदेशमध्ये आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी आलेला काँग्रेस नेता कन्हैया कुमार यांच्यावर शाई फेकण्यात आली होती.
ही घटना काँग्रेसच्या लखनऊ मुख्यालयातच घडली. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल होत झाला होता.
अरविंद केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंगावर शाईफेक करण्यात आली होती. एकदा नाही अनेकदा,त्यानंतर एकाने कानाखाली दिली होती,अरविंद केजरीवाल हे बहुधा एकमेव राजकीय व्यक्तिमत्व आहे, ज्यांना चपला, मिरची पावडर, बुटांसह शाईचाही सामना करावा लागला आहे.
Video:न्यायमूर्ती जितेंद्र मिश्रा यांच्या व्हायरल व्हिडिओ मागील एक खुलासा
man of hole आणखी एक आदिवासी समाज जगातून पूर्णपणे मिटवला गेला
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 12,2022, 14:06 PM
WebTitle – When were political leaders thrown ink or beaten by people? find out