आज भारतीय घटनेचे शिल्पकार समतामूलक मानवमुक्तीचे उद्गाते बोधिसत्व महान अर्थतज्ज्ञ बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले.या दिवसापासून आजच्या आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांच्यासोबत हा दिवस मुंबई दादर येथील चैत्यभूमीवर अलोट गर्दीचा जनसागर समोरच्या अरबी महासागरास स्पर्धा करत मागे सरकायला भाग पाडत असतो.अशा महामानवाला देश विदेशातून त्यांचे अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात.मात्र यंदाही कोरोनाच्या सावटाने सरकार शासनाने जारी केलेल्या नियमांचे पालन कायदाप्रेमी आंबेडकरी जनता पालन करत चैत्यभूमीवर गर्दी करण्याचे टाळत आपल्या आपल्या स्तरावर अभिवादन करत आहे.माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव यांनी अभिवादन करताना जागल्या भारत ने निर्मिती केलेलं चित्र शेअर केलं आहे. हे चित्र आता व्हायरल होत आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विविध क्षेत्रातून अभिवादन केले जाते.सिनेमा कला क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील
राजकीय क्षेत्रातील राजकीय नेते नागरिक सोशल मिडियातून अनेक भारतीय नागरिक सामाजिक क्षेत्रातील नागरिक राजकीय नेते कलाकार इत्यादी अभिवादन करत असतात.या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दल चे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे.अभिवादन करताना त्यांनी जागल्या भारत ने निर्मिती केलेले चित्र शेअर केलं आहे. हे चित्र आता व्हायरल होत आहे.
जागल्याभारत हा सर्वसामान्य लोकांचा एक आवाज आहे
जागल्याभारत हा खूप लहान आहे.जागल्याभारत हा सर्वसामान्य लोकांचा एक आवाज आहे.असं आम्ही नेहमी म्हणत असतो,म्हणत आलो आहोत. मात्र आज जागल्याभारतची ओळख राष्ट्रीय पातळीवर बनायला लागली आहे,तशी सुरुवात होत आहे ही आमच्या तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जागल्याभारत चं काम दखलपात्र होत आहे ही गोष्ट आम्हाला सुखावणारी आहेच परंतु जबाबदारी देखिल वाढविणारी आहे.आमच्या आर्टिस्टचं हे काम अनेकांना आवडलं आहे.आणि विशेष बाब म्हणजे आमचे कलाकार दिनेश मोरे हे जागल्याभारत साठी कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता त्यांचे योगदान देत आहेत.असे अनेक लोक आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचा हात घट्ट धरून आहेत.म्हणून आम्ही आजवरचा हा प्रवास यशस्वीपणे करू शकलो आहोत.
माजी केंद्रीय मंत्री लालु प्रसाद यादव यांचे आम्ही टीम जागल्याभारत तर्फे आभार मानत आहोत.
तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तमाम आंबेडकरी जनतेने दाखवलेल्या विवेकी कृतीचे
आम्ही मनापासून स्वागत करतो आणि कौतुक सुद्धा त्याबद्दल तमाम आंबेडकरी जनतेचे आभार.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना..आत्मशोध घेताना..
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्कृत राष्ट्रभाषा करण्याचा दावा खरा आहे?
भगवान बुद्धांचे दोन महत्वाचे संदेश
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
( @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 06, 2021 13 : 05 PM
WebTitle – When Lalu Prasad Yadav shares a picture of jaaglya bharat