भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकाचा दुसरा सामना (मॅच) रविवारी दुबईत होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दहा महिन्यांनंतर दोन्ही देश आमनेसामने येणार आहेत. यापूर्वी, दोघेही 24 ऑक्टोबर 2021 रोजी टी-20 विश्वचषक स्पर्धेत एकाच मैदानावर खेळले होते, ज्यामध्ये पाकिस्तानने 10 विकेट्सने विजय मिळवला होता.
मागच्या वेळी दोन्ही संघ आमनेसामने आले होते तेव्हा विराट कोहली कर्णधार होता. त्याने टी-20 विश्वचषकापूर्वीच सांगितले होते की, तो स्पर्धेनंतर टी-20 कर्णधारपद सोडणार आहे. त्याच्यासाठी कर्णधार म्हणून पाकिस्तानविरुद्धचा शेवटचा सामना पराभवाचा सामना करावा लावणारा ठरला होता.वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेनंतर रोहित शर्मा कडे कर्णधारपद दिले गेले. पाकिस्तानने केलेल्या पराभवाची परतफेड करण्याची जबाबदारी आता रोहित शर्मा वर आहे.
चला जाणून घेऊया या सामन्याच्या प्रक्षेपण आणि ऑनलाइन टेलिकास्टशी संबंधित सर्व माहिती…
A भारत-पाकिस्तान मॅच कधी होणार?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकाचा दुसरा सामना 28 ऑगस्टला म्हणजेच रविवारी खेळवला जाणार आहे.
B भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच कुठे होणार?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
C भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच कधी सुरू होणार?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.
सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित केला जाईल?
आशिया कपच्या प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. तुम्ही हा सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट एचडी वर पाहू शकता.
फोन किंवा लॅपटॉपवर लाईव्ह मॅच कशी बघायची?
भारतातील डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.
हा सामना मोफत कसा बघायचा?
हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर प्रसारित केला जाईल. डीडी स्पोर्ट्स चॅनलसाठी कोणतेही शुल्क नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कोणतेही पैसे न भरता या मालिकेचे सामने पाहू शकता.
दोन्ही संघांचे संभाव्य खेळाडू -11
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अश्विन/आवेश खान, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमान, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, खुशदिल शाह, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, शाहनवाज दहनी.
आरएसएस मध्ये बदल होणार,संघ स्थापनेची 100 वर्षे, 40 संघटनांमध्ये बदल
Jai Bhim Movie जयभीम चित्रपटाच्या निर्मात्यांवर गुन्हा दाखल
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 27,2022, 21:44 PM
WebTitle – When is the India-Pakistan match? How to watch the match on TV-Phone? find out