मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात अंतरिम दिलासा मागणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) चे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आणखी एक फोटोस्फोट केला आहे.NCB अधिकारी हा जन्मतः मुस्लिम असल्याचा दावा करण्यासाठी आणखी एक छायाचित्र शेअर केले करत नवाब मलिक यांनी प्रश्न विचारला आहे.राखीव प्रवर्गातून नागरी सेवेत जाण्यासाठी त्यांनी अनुसूचित जातिची बनावट कागदपत्रे बनवली असल्याचा दावा करण्यात आलाय. वानखेडे यांच्या ‘निकाह’ दरम्यान क्लिक केलेला फोटो शेअर करत मलिक यांनी ट्विटरवर लिहिले: ‘समीर दाऊद वानखेडे, तू काय केलेस?’
या अगोदरही नवाब मलिक यांनी माध्यमांच्या समोर समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा,
त्या लग्नाच्या वेळेचे फोटो ट्विट करुन समीर वानखेडे यांनी मुस्लीम असल्याचं लपवत असल्याचा दावा केला होता.
तसेच त्यांनी खोट्या जातीच्या दाखल्याचे कागदपत्रांवर आरक्षण घेऊन आयआरएसमध्ये नोकरी मिळवल्याचा आरोप केलाय.
याच आरोपांचा पुरावा म्हणून आता मलिक यांनी वानखेडे यांचा कथित स्वरुपामधील निकाहनाम्यावर स्वाक्षरी करताना फोटो ट्विट केलाय.
“कबूल है, कबूल है, कबूल है… यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?”,
अशा कॅप्शनसह नवाब मलिक यांनी हा फोटो ट्विटरवर मध्यरात्री उशिरा शेअर केला.
या फोटोमध्ये डाविकडे बसलेली व्यक्ती ही समीर वानखेडे असल्याचा दावा करण्यात येतोय.
तर या व्यक्तीच्या समोर बसलेली व्यक्ती ही निकाह लावणारी मुस्लीम धर्मगुरु असून फोटोत दिसणारे वानखेडे
हे निकाहनाम्यावर स्वाक्षरी करत असल्याचा दावा करण्यात आलाय.
फोटोमध्ये जी व्यक्ती समीर वानखेडे असल्याचा दावा केला जातोय तिने मुस्लीम बांधव घालतात
त्याप्रमाणे डोक्यावर गोल जाळीची टोपी घातल्याचं दिसत आहे.
वानखेडे यांचे स्पष्टीकरण
मुस्लिम पद्धतीने केलेल्या लग्नाच्या संदर्भात समीर वानखेडे यांनी अगोदरच स्पष्टीकरण दिलेले आहे की “भारत हा पुरोगामी देश आहे त्याचा मला अभिमान आहे. माझी आई मुस्लीम होती, बाबा हिंदू आहेत. मी दोघांवरही खूप प्रेम करतो. माझ्या आईने मुस्लीम पद्धतीने विवाह करण्यास सांगितला तो मी केला. कारण मी आईचा शब्द पाळला, मी गुन्हा केला नाही. ज्या महिन्यात निकाह झाला त्याच महिन्यात मी विशेष विवाह कायद्यानुसार (Special marriage act) नोंदणी करून घेतली. मी जे केलं तो गुन्हा नाहीये,” असं वानखेडे म्हणाले होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत आहेत;खिडकीत कपडे वाळत घालू नका
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 22, 2021 11:07 AM
WebTitle – What did you do, Sameer Wankhede? Malik said while sharing the photo