नांदेड, 26 ऑक्टोबर : नांदेडमधील (nanded) देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या (deglur bypoll election 2021) निमित्ताने आरोप-प्रत्यारोपावरून राजकीय वातावरण तापले आहे.कॉँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या पातळीसोडून केलेल्या टिकेला उत्तर देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ( prakash Ambedkar) यांनीही चव्हाणांना ‘बायको सासुबरोबर जेलमध्ये जायचं का ते ठरवा’ असं म्हणत गर्भित इशाराच देऊन टाकला.देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्त वंचित आघाडीच्या वतीने प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलत असताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर घणाघाती प्रहार केला. ‘आदर्श प्रकरण पुन्हा काढायचे का?’ असा जीवघेणा चिमटा त्यांनी यावेळी अशोक चव्हाण यांना काढला.
अशोक चव्हाण यांची पातळी सोडून टीका
अशोक चव्हाण टीका करताना म्हणाले की वंचित बहुजन आघाडीच्या गाड्यांमध्ये भाजपचे पेट्रोल भरले जात आहे.या टीकेमुळे पदरमोड करून स्वत:च्या खिशात हात घालून गाड्यांचा खर्च करणारे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चांगलेच भडकले त्यांनी ही बाब वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या कानावर टाकली.आणि इलेक्शन झाल्यावर हायकोर्टाला आपण विचारूया आणि यांचे कोणते प्रकरण आहे? आदर्श ते ही बाहेर काढायला लावूया अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली.
अशोक चव्हाणांनी वडिलांचा ‘आदर्श’ घेतला पाहिजे
यावेळी टीका करताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांची एक आठवण सांगितली त्यांच्यासोबत माझे चांगले मैत्रीचे संबंध होते असेही सांगितले.मात्र त्यांचा मुलगा बापाचा आदर्श घेत नाही त्यांनी तो घ्यावा नाहीतर राजकीय आयुष्य संपून जाईल,कारण भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आली तर नंतर फक्त जेलच्या वाऱ्या कराव्या लागतील असा सल्ला यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी अशोक चव्हाण यांना दिला.इलेक्शन इलेक्शन म्हणूनच लढा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अशोक चव्हाण यांच्या सासूच्या नावे आदर्श मध्ये फ्लॅट
आदर्श घोटाळा गैरव्यवहार प्रकरणात आरोपी असलेले अशोक चव्हाण यांच्या सासू अन्य एका नातेवाईकांनी या सोसायटीत फ्लॅट घेतल्याचा आरोप आहे.चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांची सासू भगवती शर्मा आणि सास-यांचे भाऊ मदनलाल यांना आदर्शमध्ये सदस्यत्व देण्यात आले होते.अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता यांची वहिनी सीमा शर्मा सासरे मनोहरलाल शर्मांचे भाऊ मदनलाल मिल्खिराम शर्मा सासू भगवती शर्मा यांना एक फ्लॅट मिळवून दिल्याचा आरोप होता. या केसची फाइल पुन्हा ओपन झाली तर बायको-सासुबरोबर जेलमध्ये जावं लागेल अशा अर्थाने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बायको-सासुबरोबर जेलमध्ये जायचं का? अशी खोचक टीका अशोक चव्हाण यांच्यावर केली.
एनआरसी सीएए बद्दल काँग्रेसची भूमिका बोटचेपी
एनआरसी सीएए बद्दल काँग्रेसवाल्यांची भूमिका बोटचेपी आहे.विशेषत: सत्ते मध्ये असलेले आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अशोक चव्हाण यांनी याबाबत घेतलेला ठराव दाखवून द्यावा असे आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले आहे. काँग्रेस ने मुस्लिम समाजाला 5% आरक्षण का लागू केले नाही असा सवालही यावेळी त्यांनी विचारला.वंचितचे उमेदवार डॉ. उत्तमराव इंगोले यांना निवडून दिल्यास लेंडीप्रकल्पासह मुस्लिम समाजाच्या 5% आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही त्यांनी दिली.यावेळी देगलूर बिलोली उदगीरसह अनेक तालुक्यातील वंचितच्या कार्यकर्त्यांची प्रचंड संख्येने उपस्थिती होती.
एनसीबीच्या अधिकाऱ्याने नवाब मलिक यांना पत्र पाठवून समीर वानखेडेचा पर्दाफाश केला?
टी-20 पाकिस्तानच्या विजयानंतर पाक फॅन ‘सैराट’, हवेत गोळीबार, 12 लोक जखमी
आर्यन खान प्रकरण; वानखेडेंवर आरोप;पंच चा धक्कादायक गौप्यस्फोट!
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 26, 2021 13 :54 PM
WebTitle – Want to go to jail with your wife and mother-in-law? Prakash Ambedkar’s direct threat to Chavan