पटना : Viral Photos ‘तिरंगा’ पाहूनही थांबले नाहीत पोलिसांचे हात;लाठ्या फुटल्या : पटना येथे सोमवारी पोलिसांनी बेरोजगार शिक्षक (unemployed teacher candidates) उमेदवारांवर लाठीमार केला. बिहारमध्ये सरकार बदलल्यानंतर पोलिसांकडून अशाप्रकारे बळाचा वापर केल्याचे वृत्त आहे. काही आंदोलकांनी तिरंगा ध्वज संरक्षण म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला,मात्र पोलिसांनी कोणतीही दयामाया दाखवली नाही. निदर्शनादरम्यानचे अनेक फोटो समोर आले आहेत, ज्यात पोलिसांनी इतक्या लाठ्या मारल्या की अनेक आंदोलकांचे रक्त वाहू लागले. पोलिसांनी आंदोलकांकडून तिरंगा हिसकावून घेतला आणि पुन्हा त्यांच्यावर बम लाठीमार केला.
तिरंगा, आंदोलन आणि लाठीमार नेमकं कारण समजून घ्या

5000 हून अधिक सीटीईटी आणि बीटीईटी उत्तीर्ण उमेदवार डाक बंगला चौकात निदर्शने करण्यासाठी जमले होते. यावेळी त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. आठव्या टप्प्यातील नियुक्तीची मागणी करत आंदोलक आंदोलनासाठी आले होते. मात्र त्याआधीच तेथे मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा आणि जल तोफांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हे उमेदवार बिहारचे नवे शिक्षणमंत्री प्रोफेसर चंद्रशेखर यांच्या विरोधात घोषणा देत होते, तेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज केला. सीटीईटी, बीटीईटी CTET, BTET उत्तीर्ण या उमेदवारांची प्राथमिक विज्ञप्ति ची मागणी होती.देशात अलिकडेच हर घर तिरंगा अभियान चालवलं गेलं होतं मात्र आता असेही चित्र समोर येत आहे जिथं तिरंगा हातात धरलेला असताना पोलिसांच्या लाठ्या अमानुषपणे प्रहार करत रक्त बंबाळ करत आहेत.
गुणवत्ता यादीत असलेल्यांच्या समस्या जैसे थे

2019 STET परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या शिक्षक उमेदवारांचा आरोप आहे की ते गुणवत्ता यादीत आहेत, परंतु सरकारने अद्याप त्यांची समस्या सोडवली नाही. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हे लोक राजभवनापर्यंत मोर्चा काढण्यासाठी निघाले होते, मात्र पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही.
STET परीक्षा 8 वर्षांनंतर बिहारमध्ये घेण्यात आली.
2019 मध्ये अधिसूचना जारी केली. परीक्षा जानेवारी 2020 मध्ये ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती,
परंतु 2-3 केंद्रांवर अनियमिततेच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली होती.
सप्टेंबर 2020 मध्ये पुन्हा परीक्षा झाली. त्यावेळी ती ऑनलाइन घेण्यात आली होती.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, 11 जणांना अटक
दुसरीकडे, रविवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याप्रकरणी पटना मध्ये 11 जणांना अटक करण्यात आली आहे. त्या ताफ्यात नितीश कुमार उपस्थित नव्हते. स्थानिक व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे रास्ता रोको करण्यात आल्याची घटना गौरीचुक पोलीस ठाणे हद्दीतील सोहडी मोड येथे सायंकाळी ५ वाजता घडली. पटना चे जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी सांगितले की, आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा पाहिल्यावर त्यांनी दगडफेक केली, ज्यामुळे तीन-चार वाहनांचे किरकोळ नुकसान झाले.
मोदींच्या 10 लाख तर नितीश कुमार यांच्या 20 लाख नोकऱ्या
त्यानंतर काही वेळातच पोलिसांचा फौजफाटा परिसरात पाठवण्यात आला आणि जमावाला पांगवण्यात आले. याप्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यापूर्वीच 11 जणांना अटक केली आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज पाहत आहेत. उर्वरित आरोपीही लवकरच पकडले जातील. तीन वर्षे वाट पाहूनही सरकारने काहीच केले नाही, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.मात्र भाजप सत्तेत असेपर्यंत या लोकाना आंदोलन करणे सुचत नव्हते असेही काही लोक म्हणत आहेत.
केंद्रातील मोदी सरकारने येत्या 18 महिन्यांत 10 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. तर दुसरीकडे राजदसोबत आघाडी करून आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनलेल्या नितीश कुमार यांनी 10 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते,एवढच नाही तर यामुळे आणखी 10 लाख लोकांना अधिक रोजगार मिळू शकेल, अशी तरतूदही करणार असल्याचं त्यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं,राजकीय नेते अशी आश्वासने देत असतात.त्यातील किती पूर्ण होतात?
अब्दुल सत्तार आणि अशोक चव्हाण यांची भेट ; काँग्रेसला मोठा धक्का?
‘अफजल’ बनून ‘विष्णू’ ने दिली मुकेश अंबानी ना जीवे मारण्याची धमकी
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 22,2022, 19:25 PM
WebTitle – Viral Photos Even after seeing the ‘tricolor’, the hands of the police did not stop; the sticks burst