विश्वाला शांती व अहिंसेचा मध्यममार्ग देणाऱ्या महाकारूणिक तथागत भगवान बुद्ध यांचं बामियान येथील जागतिक शिल्प असणाऱ्या मूर्त्यांवर तालिबान ने पुन्हा एकदा हल्ला करत गोळीबार सुरू केला आहे.अफगाणिस्तानातील बामियानमध्ये भगवान बुद्धांच्या मूर्तींची तालिबान सतत नासधूस करत आहे. यामुळे तालिबानचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबान सतत ‘उदारमतवादी’ असल्याचा आव आणत आहे, मात्र सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्याची पोलखोल उघड झाली आहे. व्हिडिओमध्ये तालिबानी सैनिक बामियानमधील पुतळ्यांवर गोळ्या झाडताना दिसत आहेत. 20 वर्षांपूर्वी तालिबानने या मूर्ती उडवून दिल्याचे व्हिडिओसोबत लिहिले आहे.
बामियान मध्ये बुद्ध मूर्तींना लक्ष्य केल्याचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. एका यूजरने शेअर करत लिहिले, ‘तालिबान ने बामियानच्या बुद्धावर गोळ्या झाडल्या. हा असहिष्णुतेचा स्पष्ट संदेश आहे ज्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. जग आणि अफगाणिस्तान वारसा विरुद्ध एक मोठी चूक. हे थांबवले पाहिजे. व्हिडिओ शेअर करताना आणखी एका युजरने लिहिले की, ‘बामियानच्या पुतळ्यांबद्दल तालिबानचा द्वेष अजूनही जिवंत आहे.’
गेल्या महिन्यातही लक्ष्य करण्यात आले होते
अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवादी सत्तेवर आल्याने गेल्या महिन्यात
बामियानमधील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाला लक्ष्य करण्यात आले होते.
वृत्तानुसार, हल्लेखोरांनी फ्रेंच पुरातत्वशास्त्रज्ञांच्या गोदामातून
भगवान बुद्धाच्या उत्खननात सापडलेल्या मूर्ती आणि इतर कलाकृती लुटल्या होत्या.
ही टीम बामियानमध्ये उत्खनन करत होती आणि तिथून पुढे येणारा अमूल्य ऐतिहासिक वारसा जतन केला जाणार होता.
तालिबानने त्यांच्या मागील राजवटीत देखिल केले होते लक्ष्य
जपानच्या क्योडो न्यूजनुसार,दहशतवादी तत्वांनी तालिबानच्या ताब्यानंतरच्या रिकाम्यापणाचा फायदा घेत ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात बौद्ध मूर्ती आणि कलाकृती लुटल्या. या काळात जपानी पुरातत्वशास्त्रज्ञांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले. हे या लोकांचे कोठार होते. यापूर्वी २००१ मध्ये तालिबान सत्तेवर आल्यावर दहशतवाद्यांनी ६व्या शतकातील बुद्ध मूर्तींची नासधूस केली होती.
बामियान बुद्धाचे ऱ्हास वाचवण्यासाठी झाले जागतिक प्रयत्न
श्रीलंका, जपान, चीन, स्वित्झर्लंड, तुर्कस्तान आदी देशांनी हे पुतळे नष्ट होऊ नये यासाठी खूप प्रयत्न केले. जपानने तर ते दोन्ही पुतळे जपानला हलवण्याचीही तयारी दाखवली होती.युनेस्कोने तब्बल ३६ पत्रे तालिबान ला पाठवली होती.पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनीही त्यांचे परराष्ट्र मंत्री मोईनोद्दीन हैदर यांना काबूलमध्ये यासंदर्भात मुल्ला ओमर याला भेटायला पाठवले होते.अमेरिकन शिक्षणतज्ञाने हे पुतळे पाडण्याच्या मोहिमेला ‘संस्कृतीविरूद्धचा कट’ असं म्हटलं एवढेच नव्हे तर अगणिस्तानातील तालिबानविरोधी नेता अहमदशहा मसूद याने या घटनेविरूद्ध जाहिर तीव्र चीड व्यक्त केली होती.
तालिबान्यांचे वांशिक मूळ
मूलतः तालिबान शब्दाचा अर्थ हा विद्यार्थी असा होतो.साम्राज्यवादी भांडवली राष्ट्राने अफगाणिस्तानला नेहमीच आपले जहागीर मानली आहे. त्याविरूद्धच्या संघर्षातून आधी रशिया व त्यानंतर अमेरिकेविरुद्ध हा संघर्ष पेटता राहिला आहे.ओसामा बिन लादेन ने जगाचा व्यापाराचे अत्यंत महत्वपूर्ण केंद्र असलेले वर्ल्ड ट्रेड सेंटर २००१ मध्ये पाडून जगाला तालिबान ची दखल घ्यायला भाग पाडले.
असो तर तालिबानचे वांशिक मूळ तपासायला गेल्यावर ते जमात आहे हे लक्षात येतं.
प्रेषित पैगंबराच्यापूर्वी कबिलाईज्ड समाजात जसे जमातीची गुणवैशिष्ट्ये असलेल्या टोळ्या होत्या
तसंच तालिबानही हे जमातीचे गुणधर्म व गुणवैशिष्ट्ये असलेले लोक आहेत.अफगाणिस्तानात १४ प्रमुख जमाती आहेत.
जमातीचे गुणधर्म जमातीत क्रोर्य, रानटीपणा, हिंसा हे त्यांच्यात प्रचंड आढळतात.
अदिम टोळ्यांचे गुणधर्म त्यांच्यात मोठ्या प्रमाणात दिसतात. टोळ्या असल्याने ते लुटारू असणे साहजिकच असते.
सिविलाईज्ड समाज बनण्यासाठी दोन महत्वपूर्ण प्रक्रिया घडाव्या लागतात त्या म्हणजे शेती
किंवा पशुपालन.काय तिथे या दोन प्रक्रिया घडण्यासारखी नैसर्गिक परिस्थिती होती?
तर याचे उत्तर नाही असेच आहे पण त्या प्रदेशात जिथे शेती व पशुपालनाचे प्रयोग झाले ते लोक शांत जीवन जगतानाही दिसत आहे. तालिबानी किंवा एकंदरीतच कोणत्याही दहशतवाद्याचे हे वैशिष्ट्य असते की त्यांच्याएवढं सतर्क कुणीच नसतं. प्राणाची भीती एवढी जीवावर टांगलेली असते की ते कुणाकडेही सतत संशय व शंकेनेच बघत असतात. दुसरी गोष्ट कुटुंब समाज अशी कोणतीच व्यवस्था नसणे व ते पुरूषी पितृसत्ताकवादी असल्याने ते स्त्रीकडे कोणत्या नजरेने पाहतात हे दिसते. कोणतीच दयामाया नाही. हा सगळा प्रचंड पेच अफगाणिस्तानी समाज व जनतेसमोर आहे.
तालिबान अफगाणिस्तान ; साऱ्या विश्वाला बुद्ध हवा,भाग – एक
तालिबान अफगाणिस्तान ; साऱ्या विश्वाला बुद्ध हवा,भाग – दोन
Big breaking: आर्यन खान ला पैशासाठी फसवले- सॅम डिसूझा
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
st Published by Team Jaaglya Bharat on NOV 02, 2021 14:10 PM
WebTitle – VIDEO: Taliban again attack Buddha statues in Bamiyan