विश्वाला शांती व अहिंसेचा मध्यममार्ग देणाऱ्या महाकारूणिक तथागताची अफगाणिस्तानला गरज…….!!! तिसरा बुद्ध कुठे आहे?
समता, स्वातंत्र्य आणि लोकशाहीसत्ताक मुक्त वातावरणाची अफगाण्यांच्या नेणीवेवर असणारी आस
या लेखाच्या कालच्या भागात आपण अफगाणिस्तानमधील त्या तीन बुद्ध मूर्तीचा ऐतिहासिक परिप्रेक्ष्य समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पख्तूनी समाजावरचा दीर्घकालीन प्रभाव समजून घेतला.आता आपण या उत्तरार्धात त्या तिसर्या बुद्धाची चर्चा करून अफगाणिस्तानातील आजच्या अराजकतेला, दहशतवादाला, गोंधळाच्या परिस्थितीला व एकंदरीतच आत्यंतिक टोकाच्या हिंसेला तो तिसरा बुद्ध कोणते मुक्तीचे, सोडवणुकीचे उपाय देऊ शकतो. त्यातून कोणती कोंडी फुटू शकते याचा विचार करत आहोत.
बामियान बुद्धाचे ऱ्हास वाचवण्यासाठी झाले जागतिक प्रयत्न
श्रीलंका, जपान, चीन, स्वित्झर्लंड, तुर्कस्तान आदी देशांनी हे पुतळे नष्ट होऊ नये यासाठी खूप प्रयत्न केले. जपानने तर ते दोन्ही पुतळे जपानला हलवण्याचीही तयारी दाखवली होती.युनेस्कोने तब्बल ३६ पत्रे तालिबान ला पाठवली होती.पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनीही त्यांचे परराष्ट्र मंत्री मोईनोद्दीन हैदर यांना काबूलमध्ये यासंदर्भात मुल्ला ओमर याला भेटायला पाठवले होते.अमेरिकन शिक्षणतज्ञाने हे पुतळे पाडण्याच्या मोहिमेला ‘संस्कृतीविरूद्धचा कट’ असं म्हटलं एवढेच नव्हे तर अगणिस्तानातील तालिबानविरोधी नेता अहमदशहा मसूद याने या घटनेविरूद्ध जाहिर तीव्र चीड व्यक्त केली होती.
तालिबान्यांचे वांशिक मूळ
मूलतः तालिबान शब्दाचा अर्थ हा विद्यार्थी असा होतो.साम्राज्यवादी भांडवली राष्ट्राने अफगाणिस्तानला नेहमीच आपले जहागीर मानली आहे. त्याविरूद्धच्या संघर्षातून आधी रशिया व त्यानंतर अमेरिकेविरुद्ध हा संघर्ष पेटता राहिला आहे.ओसामा बिन लादेन ने जगाचा व्यापाराचे अत्यंत महत्वपूर्ण केंद्र असलेले वर्ल्ड ट्रेड सेंटर २००१ मध्ये पाडून जगाला तालिबान ची दखल घ्यायला भाग पाडले.
असो तर तालिबानचे वांशिक मूळ तपासायला गेल्यावर ते जमात आहे हे लक्षात येतं. प्रेषित पैगंबराच्यापूर्वी कबिलाईज्ड समाजात जसे जमातीची गुणवैशिष्ट्ये असलेल्या टोळ्या होत्या तसंच तालिबानही हे जमातीचे गुणधर्म व गुणवैशिष्ट्ये असलेले लोक आहेत. अफगाणिस्तानात १४ प्रमुख जमाती आहेत.
जमातीचे गुणधर्म जमातीत क्रोर्य, रानटीपणा, हिंसा हे त्यांच्यात प्रचंड आढळतात. अदिम टोळ्यांचे गुणधर्म त्यांच्यात मोठ्या प्रमाणात दिसतात. टोळ्या असल्याने ते लुटारू असणे साहजिकच असते.
सिविलाईज्ड समाज बनण्यासाठी दोन महत्वपूर्ण प्रक्रिया घडाव्या लागतात त्या म्हणजे शेती
किंवा पशुपालन.काय तिथे या दोन प्रक्रिया घडण्यासारखी नैसर्गिक परिस्थिती होती?
तर याचे उत्तर नाही असेच आहे पण त्या प्रदेशात जिथे शेती व पशुपालनाचे प्रयोग झाले ते लोक शांत जीवन जगतानाही दिसत आहे. तालिबानी किंवा एकंदरीतच कोणत्याही दहशतवाद्याचे हे वैशिष्ट्य असते की त्यांच्याएवढं सतर्क कुणीच नसतं. प्राणाची भीती एवढी जीवावर टांगलेली असते की ते कुणाकडेही सतत संशय व शंकेनेच बघत असतात. दुसरी गोष्ट कुटुंब समाज अशी कोणतीच व्यवस्था नसणे व ते पुरूषी पितृसत्ताकवादी असल्याने ते स्त्रीकडे कोणत्या नजरेने पाहतात हे दिसते. कोणतीच दयामाया नाही. हा सगळा प्रचंड पेच अफगाणिस्तानी समाज व जनतेसमोर आहे.
तिसऱ्या बुद्धाचा खरा शोध
पहिली गोष्ट ती हि की ज्याअर्थाने अफगाणी समाजाने दीड हजार वर्षे मोठ्या बुद्धाला जपले व त्याला ‘सोलसोल’ म्हणजे जगाचा प्रकाश किंवा अंतराळातून येणारा प्रकाश म्हणून जपले त्याअर्थी त्या समाजाच्या इच्छा, आकांक्षा,स्वप्न आकांक्षांचे तो प्रतिक बनला होता. दुसरा लहान पुतळा असलेल्या बुद्धाच्या तर अजूनच जवळ जाऊन त्याला त्यांनी आपली राणीआई किंवा queen mother केलं.
तिसरा बुद्ध ज्याचा बुद्ध ज्याचा भन्ते युवांग श्वांग यांनी त्यांच्या प्रवासवर्णनात केला आहे तो आता कुठाय?? त्यांच्या मते त्यांची उंची हि अंदाजे ३०० मी म्हणजे जवळपास ९८० फूट इतकी प्रचंड भव्य उंच असावी. तो त्या बामियान, कंदाहार, बाल्क मधल्या जमिनीत गाडला गेलाय का?? तो बुद्ध आज शोधता येईल तेव्हा येईल किंवा जर तो अस्तित्वात असेल तर त्याला परत उभंही करता येईल.
पण खरा तिसरा बुद्ध हा त्यांच्या नेणीवेत आहे.ज्याची त्यांना आस आहे.जर नसता तर त्या दोन्ही बुद्धांना आजवर दीड हजार वर्षे जपले नसते, असं मत खुद्द तालिबान विरोधी नेता अहमदशहा मसूद याने म्हटले आहे. वैराचन म्हणजे मोठा बुद्ध याला जगाचा प्रकाश तर लहान शाक्यमुनी बुद्ध त्याला आई म्हणून मातृसत्ताक बंध चिवटपणे जपून ठेवले.
एवढी वर्षे एखाद्या समाजाने काही जपणं याला निश्चितच महत्त्व असतं.
एवढी वर्षे तीही अशा प्रचंड मूलतत्त्ववादी वातावरणात ते जपलं गेलं.
रानटी मानसिकतेचा अंमल पावलापावलावर असतानाही ते जपलं.
आता ते का जपलंय? चिवटपणे ते का धरलंय?
त्यांच्या नेणीवेमध्ये कुठंतरी समता, स्वातंत्र्य, आणि लोकशाही (मेत्ता) सत्ताक मुक्त वातावरणाची आस त्यांच्या नेणीवेवर आहे म्हणूनच ते जपलं गेलं,
आणि या मूल्यांची प्रतिष्ठापना करण्याची प्रेरणा देणारं सर्वात मोठं प्रतिक जगात कुठे आहे? मूलतः तालिबानी का निर्माण झाले??
त्यांचं स्वतःच राज्य हवं म्हणूनच निर्माण झाले ना…
तिथं जी यादवी, अराजकता माजली होती म्हणूनच ते एक संघठन बनून पुढे आले ना.
मग जर यातून जर तालिबानी निर्माण झाले. तर हि मूलगामी भावनेला पुन्हा प्रतिस्थापित करण्याचा प्रयत्न केला तर ते याही भावनेने तयार होऊ शकतील. का नाही होणार??? ५५ मी म्हणजे १८० फूट बुद्धाला सोने, हिरे जवाहरांनी सजवण्याचा काळ हा समृद्धच असेल ना, त्याशिवाय हे करता येते काय?? हा तोच ग्लोरिफाय काळ होता. ज्याला आजच्या काळाबरोबर कम्पेअर करून विरोधविकासाच्या नियमाने जागृत करता येते.
यासंदर्भात सौत्रांतिक मार्क्सवादी स्कूलचे अभ्यासक मा.Viraj Kunda Phula यांनी एक अत्यंत महत्वपूर्ण विचार मांडला आहे.
त्यांच्या मते, ‘ निरिश्वरवाद हा बौद्ध विचारविश्वाचा गाभा आहे.एखादा ईश्वरी अस्तित्वावर विश्वास ठेवणारा मनुष्य हा तर्कावर विचार करणाराही असू शकतो परंतु तो अधिकाधिक सत्यापर्यंत पोचण्यासाठी नेहमीच अपयशी ठरतो,कारण ईश्वरवाद हा तार्किक विचारांसाठी निर्बंध घालतोच म्हणून तो सत्याचा शोध घेऊ शकत नाही.बौद्धांनी तेही निर्बंध काढून टाकले म्हणूनच ते तिथवर पोचू शकले.!” असा निरिश्वरवाद भेदक तर्कशास्त्र (Penitrating Logic ) निर्माण करते. जो घुसतो लेझर किरणांप्रमाणे आणि वेध घेतो सत्याचा
समता, स्वातंत्र्य बंधुतेचा प्रतिक असणारा बुद्ध अफगाणी समाजाने पुनश्च आणणे जीवदान देणारे असेल
जे लोक प्रचंड व्यवहारी आहेत. जंगली श्वापदांपेक्षाही हिंस्र आणि जागरूक चाणाक्ष आहेत.त्यांचं प्रबोधन करण्याचं हे एक महत्वपूर्ण टूल आहे.. साम्राज्यवादी तर त्यापेक्षाही चाणाक्ष आहेत.त्यांनी आजवर प्याद्याप्रमाणे करझाई,घनी सरकारला वापरून घेतलं त्याप्रमाणे आता ते तालिबान्यांनाही वापरून घेत आहेत.हि गोष्ट तालिबान्यांनाही कळणार नाही.नाही का घूसून ओसामा बिन लादेन संपवला तसं ते संपतील,आणि तसेही तालिबान्यांचे सरकार हे दीर्घकाळ चालेल असं त्यांचेकडे काहीच नाही.
साम्राज्यवादी एका बाजूला तालिबान्यांना वापरून घेतील,दुसऱ्या बाजूला त्यांना जागतिक समस्याही म्हणतील
व तिसऱ्या बाजूला यूसूफजाई मलाला लाही शांततेचा नोबेल देतील
म्हणून त्या तिसरा समता, स्वातंत्र्य बंधुतेचा प्रतिक असणारा बुद्ध अफगाणी समाजाने पुनश्च आणणे.
त्यापासून काही मूल्ये घेणे.हेच त्यांना जीवदान देणारे असेल.
( खालचा जो पुतळा दिला आहे तो ओरिजिनल नाही तर काही बौद्ध राष्ट्रांनी पुननिर्माणासाठी प्रस्थावित आराखडा म्हणून दिला आहे, तथागतांच्या पायथ्याशी जे दोन भगवे चिवरधारी भिक्खू दिसतात. बारकाईने पहा बरं. यावरून जुन्या वैरोचन बुद्धाच्या भव्यतेची कल्पना येते.)

तालिबान अफगाणिस्तान ; साऱ्या विश्वाला बुद्ध हवा,भाग – एक
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 21, 2021 16:30 PM
WebTitle – Taliban Need a Buddha if they want to survive