सिनेमा हा समाजाचा आरसा असतो,जे समाजात घडतं ते सिनेमा चित्रपटात दाखवलं जातं,मात्र काही लोक त्याला आक्षेप घेतात,संस्कृती धर्म वगैरे बदनाम होतं असं म्हणतात पण अशा घटना आपल्या आजूबाजूला सतत घडत राहतात,मध्यंतरी आश्रम नावाची वेबसिरीज आली ती प्रचंड गाजली आणि स्वाभाविकपणे त्यावर बंदीची मागणीही केली गेली,मात्र आश्रम वेबसिरीजची प्रत्यक्षात घटना घडलीय,मानव सेवा विश्व गुरू दत्तात्रेय आश्रमाच्या साध्वी हेमलता यांच्या सहाय्यक तगाराम यांच्यावर ‘एएनएम’ने बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत पीडितेने पोस्टाने पाठवलेल्या पत्राद्वारे तक्रार केली आहे. 27 जुलै रोजी पोलिसांना पत्र मिळाले आणि 28 जुलै रोजी रात्री 10 च्या सुमारास एफआयआर दाखल करण्यात आला. तगारामने बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ साध्वी हेमलता यांनी बनवला, असा आरोप आहे. पीडितेने आरडाओरडा सुरू केल्यावर साध्वीने तिच्या तोंडात बोळा कोंबला होता. हे प्रकरण सांचोरे, जालोर येथील आश्रमाचे आहे.
नवरा आणि सासरच्या लोकांचा आस्था अन विश्वास
सांचोरच्या सरवाना पोलिस स्टेशनचे प्रभारी किश्नाराम बिश्नोई यांनी सांगितले की, 32 वर्षीय पीडित तरुणी जालोरच्या चितलवाना तहसीलची रहिवासी आहे. जोधपूरमध्ये ANM म्हणून पोस्ट. तक्रारीत तिने सांगितले की, तिचा नवरा आणि सासरे भक्ती सेवेत गुंतलेले आहेत. तिच्या पतीने तिला २०२१ मध्ये मानव सेवा विश्व गुरु दत्तात्रेय आश्रमात आणले होते. हा आश्रम सांचोरच्या अर्वा जानाईपुरा गावात आहे. येथे त्यांनी साध्वी हेमलता आणि त्यांचे सहकारी तगाराम यांची भेट घेतली.
जेव्हा आश्रमावर आस्था अन विश्वास वाढला तेव्हा नोव्हेंबर 2021 मध्ये संस्थेतील एका गटात महिला हरिद्वारला गेली. 18 नोव्हेंबर 2021 रोजी हरिद्वारमध्ये तगारामने महिलेला रात्री खोलीत बोलावले. आत आल्यानंतर खोली बंद करून अश्लील कृत्य केले. यानंतर हरिद्वारमध्ये घडलेली घटना कोणाला सांगू नये म्हणून तिला धमकी देण्यात आली.
साध्वी हेमलता यांनी महिलेला कालपक्ष दोष असल्याचे सांगून तिचे निवारण तगाराम हे करतील असे सांगितले. तगाराम म्हणाले की, काल दोष दूर करण्यासाठी 108 दिवसांत 21 वेळा शारीरिक संबंध ठेवावे लागतात. तगारामने महिलेला सांगितले की, असे केल्याने तुझ्यावर असलेला कालदोष मी माझ्यावर घेईन.मात्र महिला या ‘उपचार’साठी तयार नव्हती, असा आरोप आहे. दुसरीकडे, सांचोरचे डीवायएसपी रूपसिंग इंदा यांनी सांगितले की, पीडितेचा जबाब घेण्यात आला आहे. मेडिकल केले आहे.पुढील तपास सुरू आहे.
‘साध्वीने तोंडात कापडाचा बोळा कोंबला आणि रेपचा व्हिडीओ बनवला’
19 फेब्रुवारी 2022 रोजी तगाराम आणि हेमलता यांनी महिलेला आश्रमात बोलावले. रात्री आठ वाजता साध्वी तिला अंडरग्राउंड रूममध्ये घेऊन गेली. तिथे आधीच असलेल्या तगारामने तीच्यावर बलात्कार केला. महिलेने आरडाओरडा केल्यावर साध्वी हेमलताने महिलेच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. तसेच या तगाराम बलात्कार करत असताना साध्वीने बलात्काराचा व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. यासोबतच कोणाला काहीही सांगितल्यास हा व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करू आणि संस्थानच्या जागेत ठार मारून गाडून टाकण्याची धमकी दिली. सध्या पोलीस गुन्हा दाखल करून तपास करत आहेत.
पीडितेने पोस्टाद्वारे केली तक्रार
एएनएमने साध्वी हेमलता आणि तिचा सहकारी तगाराम यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
ही तक्रार पोस्टाने प्राप्त झाली. मेडिकल करून पीडितेचा जबाब १६४ मध्ये नोंदवण्यात आला आहे.
– किश्नाराम, स्टेशन प्रभारी, सरवाना
बदनाम करण्याचे षडयंत्र
महिलेचा आरोप खोटा आहे. 19 फेब्रुवारीला आश्रमात अनेक लोक उपस्थित होते.
१९ फेब्रुवारीला सदर महिला आश्रमात आलीच नव्हती. माझी आणि आश्रमाची बदनामी करण्याचा हा कट आहे.
हे पूर्णपणे खोटे प्रकरण आहे.
– साध्वी हेमलता
स्मृती इराणी गोवा बार विवाद :काँग्रेस नेत्यांना कोर्टाचा धक्का,बदनामीचे षडयंत्र
New Wage Code: खाजगी क्षेत्रात आठवड्यातून 4 दिवस काम – 3 दिवस सुट्टी
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 02,2022, 16:22 PM
WebTitle – VIDEO: Ashram web series actually happened, 21 times relationship in 108 days by telling Kaldosh