अकोला- दि 29- अकोला जिल्हापरिषदेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष एड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात 50 बेड चे कोविड सेंटर उभारले आहे.त्यामुळे कोरोनाच्या या महामारीत वंचित बहुजन आघाडीने रुग्णसेवेकरता आघाडी घेतल्याचे दिसत आहे.मात्र बाकीचे पक्ष कधी पुढे येणार आणि सध्या गरज असलेल्या अशाप्रकारची कोविड सेंटर्स उभारणार असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

अकोला जिल्हा हा एड. प्रकाश आंबेडकर यांचा गड मानला जातो.पूर्वीची भारिप आणि आताची वंचित बहुजन आघाडीची या जिल्ह्यात निर्विवाद सत्ता आहे.सध्या राज्यसह Maharashtra corona cases raised अकोला जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

रुग्णालये फुल्ल झाली असून लोकाना बेड मिळणे मुश्किल झाले आहे.तर कुठे ऑक्सीजनची कमतरता तर कुठे व्हेंटीलेटर चे बेड उपलब्ध नाहीत.काही भागात रेमडीसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे.अनेक रुग्णालयात मनुष्यबळ अपुरे पडताना दिसत आहे,तर काही ठिकाणी मनुष्यबळ नसल्याने कोविड सेंटर्स बंद करण्यातची नामुष्की सरकारवर आली होती.

50 बेडस् चे सर्व सोयीसुविधांनी युक्त असे कोविड सेंटर
अशाचप्रकरच्या अडचणी अकोला जिल्ह्यातही उद्भवत आहेत.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष नेते एड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला जिल्हा परिषदेच्या वतीने 50 बेडस् चे सर्व सोयीसुविधांनी युक्त असे कोविड सेंटर उभारून आपल्यातील समाजकारणाचा व लोकांच्या गरजेला योग्यवेळी उभे राहण्याचा परिचय करून दिला आहे.

सिविल लाईन्स चौकातील,जिल्हा परिषद कर्मचारी भवनच्या विस्तीर्ण जागेत या सुसज्ज कोविड सेंटरची निर्मिती केली गेली आहे.लवकरच हे रुग्णसेवेत रुजू सुद्धा होत असून या कोविड सेंटर साठी लागणारे मनुष्यबळ अकोला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुरवले जाणार आहे.अकोला जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे.त्याचा उपयोग करती एड. प्रकाश आंबेडकर यांनी हे पाऊल उचलले आहे. त्याचे सर्वत्र कौतुक केले जाते आहे. Vanchit Bahujan Aghadi Initiated Covid Centre in Akola

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येस आळा घालण्यासाठी त्यावर उपाययोजना करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रमाणेच
इतर शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजप अशा राजकीय पक्षांनी सुद्धा पक्षीय पातळीवर
एक एक कोविड सेंटर उभारले पाहिजे होते.असा सुर जनसामान्यांतून उमटू लागला आहे.
भाजपची देशात सत्ता आहे.गेल्या सहा वर्षात त्यांची ताकद वाढली आहे,त्यांच्याकडे असणाऱ्या जागांमध्ये अशी सेंटर्स उभी राहू शकतात.
प्रत्येक जिल्ह्यात एक सेंटर उभे राहू शकते.तसेच कॉँग्रेस पक्षाकडे सुद्धा भरपूर जागा आणि सभागृह आहेत.
त्यामध्येही अशाप्रकारची रचना करता येवू शकते.
अशावेळी तरी एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण आणि टीका न करता राज्यातील जनतेसाठी विधायक काम करण्याची तयारी या पक्षांनी दाखवली पाहिजे.
अशा प्रकारची कोविड सेंटर्स उभारली पाहिजेत,वंचितने अल्पवधीतच सगळी औपचारिकता पूर्ण करत
कोविड सेंटरची जशी निर्मिती केली त्याप्रमाणे जिल्ह्यात आणखी कोविड सेंटर्स उभारण्याची गरज आहे.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
First Published on APRIL 29, 2021 13 : 48 PM
WebTitle – Vanchit Bahujan Aghadi Initiated Covid Centre in Akola. 2021-04-29