मुंबई,दि. २६/प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युती संदर्भात लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.गेले काही महिने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या राजकीय युती संदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात येण्याचे संकेत मिळाले असून आता केवळ औपचारिकता उरली असल्याचे समजते.
वंचित बहुजन आघाडी व शिवसेना युती संदर्भात चर्चेची आणखी एक फेरी पार
वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात युती संबंधीची आणखी एक सकारात्मक चर्चेची फेरी नुकतीच शिवसेना भवन येथे आज दिनांक २६ डिसेंबर रोजी पार पडली.
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री.सुभाष देसाई आणि वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष श्री.अबुल हसन खान यांच्यात तपशीलात चर्चा झाली. ‘येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीला आपण सोबतीने सामोरे जाण्यासंबधीचे आश्वासक संकेत ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि उध्दव ठाकरे यांनी आधीच दिले आहेत. आम्ही त्याला अधिक तपशीलात बोलून पुढे घेवून जाणार आहोत’, असे अबुल हसन खान यांनी सांगितले.
आज युती संर्दभातील चर्चेची अंतिम फेरी पार पडल्यानंतर
लवकरच दोन्ही पक्षांचे प्रमुख एकत्र येवून युतीची अधिकृत घोषणा करतील असेही अबुल हसन खान यांनी नमूद केले.
शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग यशस्वी होऊ शकतो?
अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भविष्यातील राजकीय समीकरणांची चाचपणी सुरू केल्याचं बोललं जात आहे.वंचित बहुजन आघाडीने गेल्या लोकसभेला मते तब्बल 41 लाख 32 हजार मते घेऊन आपलं राजकीय अस्तित्व दाखवून दिले आहे.वंचित बहुजन आघाडीला जेवढी मते मिळाली त्याहून कमी मते राज ठाकरे यांच्या मनसेला 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती.म्हणजे 16 लाख. मुंबईत असे काही महत्वाचे पॉकेट्स आहेत जिथं आंबेडकरी मतांची टक्केवारी निर्णायक आहे.ज्याचा फायदा शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी दोघांना होऊ शकतो.राज्यात सध्या भाजप आणि शिंदेगट यांचे सरकार आहे. महाविकास आघाडीचे तीन घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,आणि शिवसेना अशी तीन पक्षांची युती अजूनही आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका मध्ये हे तीन पक्ष कसे लढणार हे अजून ठरलेलं नाही.
आजवर भाजप सेना एकत्र लढली.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,हे सेनेचे विरोधक होते. यात नंतर मनसे हा सुद्धा एक पक्ष आला.
आज तीन विरोधी पक्षांची युती आहे.आता यात वंचित बहुजन आघाडीची एंट्री झाली आहे.त्यामुळे सर्वांचीच टक्केवारी विभागली जाईल.
यात काही शंका नाही. त्यामुळे आगामी निवडणुका लढवताना मतांच्या टक्केवारीचं हे गणित जुळवावं लागणार आहे.
स्थानिक चर्चेचा कानोसा घेतला तर स्थानिक मुंबईकर वंचित आणि सेना युतीसाठी उत्सुक आहेत,उत्साही आहेत असे चित्र दिसते,
इकडे सेनेचे शिवसैनिक आणि तिकडे वंचितचे भीमसैनिक दोघांनी युतीची मानसिक तयारी केल्याचे चित्र दिसून येत आहे.
ही एक सकारात्मक बाब सध्या दिसते आहे. त्यामुळे येत्या काळात हा शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग यशस्वी होण्याची शक्यता दिसून येते आहे.
जागल्याभारत ने दिली होती सर्वप्रथम बातमी
वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची युती होणार असल्याची सर्वप्रथम बातमी मराठी माध्यमात सर्वप्रथम जागल्याभारत ने दिली होती.
फ्रॅक्चर्ड फ्रीडम कोबाड गांधी ; पुस्तकात नेमकं काय?
भगवान बुद्धांच्या मूर्तीला भगव्या रंगाने रंगवण्यावरून वाद, प्राचार्यांचे स्पष्टीकरण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 26,2022, 20:12 PM
WebTitle – Vanchit Bahujan Aghadi and Shiv Sena alliance latest news update