अकोला/मुंबई: केंद्रात भाजपची सत्ता असली तरी राज्यात मात्र आलेली सत्ता गमवावी लागल्याने विरोधी पक्षात बसलेल्या भाजपकडून राज्यात सतत महाविकास आघाडीच्या विरोधात काही ना काही कारवाया घवडून आणल्याचे दिसून येते. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यानीही राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या विरोधात आघाडी उघडलेली आहे,राज्यातील राजकीय वातावरण यामुळे ढवळून निघाले आहे.या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युती संदर्भात वक्तव्य केल्याने आता राज्यातील राजकीय चर्चा आणखी जोरदार रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.आकोल्यातील पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलंय.
नेमकं काय म्हणाले एड.प्रकाश आंबेडकर?
अकोल्यात पत्रकार परिषदेत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी च्या युती संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांना उत्तर देताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले,”शिवसेनेसोबत युती यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकदा भेटलोही होतो.मात्र ही चर्चा पुढे गेली नसल्याचं आंबेडकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.वाईट भाषेत सांगायचं तर आमच्यासोबत फिरायला सगळे तयार आहेत मात्र लग्न करायला कुणी तयार नाही,अशी कोटीही त्यांनी यावेळी केलीदरम्यान,वंचित बहुजन आघाडीने या अगोदर काँग्रेसला पुन्हा एकदा युतीसाठी प्रस्ताव दिल होता तो त्यांनी अद्यापही स्वीकारला नसल्याचे समजते.आता प्रकाश आंबेडकर यांच्या या मैत्रीच्या प्रस्तावाला शिवसेना काय उत्तर देते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग यशस्वी होऊ शकतो?
अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भविष्यातील राजकीय समीकरणांची चाचपणी सुरू केल्याचं बोललं जात आहे.वंचित बहुजन आघाडीने गेल्या लोकसभेला मते तब्बल 41 लाख 32 हजार मते घेऊन आपलं राजकीय अस्तित्व दाखवून दिले आहे.वंचित बहुजन आघाडीला जेवढी मते मिळाली त्याहून कमी मते राज ठाकरे यांच्या मनसेला 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती.म्हणजे 16 लाख. मुंबईत असे काही महत्वाचे पॉकेट्स आहेत जिथं आंबेडकरी मतांची टक्केवारी निर्णायक आहे.ज्याचा फायदा सेना वंचित दोघांना होऊ शकतो.राज्यात सध्या महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,आणि शिवसेना अशी तीन पक्षांची युती आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका मध्ये हे तीन पक्ष कसे लढणार हे अजून ठरलेलं नाही.नगरपालिकेत सेनेची सत्ता आहे.
आजवर भाजप सेना एकत्र लढली.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,हे सेनेचे विरोधक होते. यात नंतर मनसे हा सुद्धा एक पक्ष आला.आज तीन विरोधी पक्षांची युती आहे.आता यात वंचित बहुजन आघाडीची एंट्री झाली आहे.त्यामुळे सर्वांचीच टक्केवारी विभागली जाईल.यात काही शंका नाही.त्यामुळे आगामी निवडणुका लढवताना मतांचे टक्केवारीचे हे गणित जुळवावे लागणार आहे.त्या अनुषंगाने नेमके काय चित्र निर्माण होते हे येत्या काळात स्पष्ट होईल.तूर्तास आता या नव्या मुद्याची चर्चा जोरात सुरू झालीय.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
Amy Wax या युएस प्राध्यापिकेचं ब्राह्मण स्त्री विषयी वादग्रस्त वक्तव्य
राज ठाकरे यांना आता नीलेश कराळे मास्तर यांचे प्रत्युत्तर..म्हणाले
मशीद भोंगा प्रकरण : सुजात आंबेडकर याना मनसे चं प्रत्युत्तर
अमित ठाकरे याना हनुमान चालीसा म्हणायला सांगा – सुजात आंबेडकर
द काश्मिर फाईल्स:भाजप देशाचे वातावरण बिघडवत आहे:शरद पवार
Bank frauds in india मागील सात वर्षात सर्वात मोठा घोटाळा
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on APR 13, 2022 17:48 PM
WebTitle – Possibility of Vanchit Bahujan Aghadi and Shiv Sena alliance