उत्तराखंड: मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यात समान नागरी संहिता लागू करण्यासाठी मसुदा समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. याशिवाय दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश प्रमोद कोहली, राज्याचे माजी मुख्य सचिव शत्रुघ्न सिंग, मनू गौर आणि सुरेखा डंगवाल या समितीचे सदस्य असतील.
समितीबद्दल माहिती देताना सीएम धामी यांनी ट्विट केले की, “देवभूमीची संस्कृती जपत सर्व धार्मिक समुदायांना एकसमानता प्रदान करण्यासाठी.सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती (निवृत्त) रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समान नागरी संहिता (UCC) च्या अंमलबजावणीसाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
समान नागरी संहिता मसुदा ठराव राज्य मंत्रिमंडळात एकमताने मान्य
मुख्यमंत्री धामी यांनी शुक्रवारी (27 मे) सांगितले की त्यांचे सरकार लवकरच राज्यात समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करेल. यासह समान नागरी संहिता लागू करणारे उत्तराखंड हे गोव्यानंतरचे दुसरे राज्य ठरणार आहे. तत्पूर्वी, मुख्यमंत्री धामी यांनी शुक्रवारी (27 मे) सांगितले होते की त्यांचे सरकार लवकरच राज्यात समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करेल. यासह समान नागरी संहिता लागू करणारे उत्तराखंड हे गोव्यानंतरचे दुसरे राज्य ठरणार आहे.
15 मे रोजी मुख्यमंत्री पुष्कर धामी म्हणाले होते की राज्य मंत्रिमंडळाने राज्यात समान नागरी संहिता लागू करण्यास
एकमताने सहमती दर्शविली आहे. त्यांनी इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देखील UCC लागू करण्याचे आवाहन केले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने नमूद केले होते
भारतीय जनता पक्षाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात समान नागरी संहिता लागू करण्याचे आश्वासन दिले होते.
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले होते.
यानंतर राज्यातील भाजप सरकारांनीही या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे सातत्याने याचे समर्थन करत आहेत.
देशात सर्वांसाठी एकच कायदा असायला हवा, असे त्यांचे म्हणणे आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर
यांनीही भाजप सरकारांना पाठिंबा दिला असून हिमाचल देखील या दिशेने एक पाऊल पुढे टाकेल असे सांगितले.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव द्यायला विरोध;मनुवादी जमावाची जाळपोळ
‘हे घर विक्रीसाठी आहे’ आंबेडकरी समाजाने घरांबाहेर लावले बॅनर
ज्ञानवापी प्रकरणी फेसबुक पोस्ट ; डॉ. रतन लाल यांना अटक
MP:दलित वराच्या वरातीवर दगडफेक,सरकारने पाडली बुलडोझरने घरे
विधवा प्रथा : समाज मनाचा दृष्टिकोन अन् मानसिकता बदलली पाहिजे..
ज्ञानवापी मशिद मुद्यावर विरोधी पक्ष गप्प का आहे?
भगवान बुद्ध आणि माझा खास संबंध – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 27, 2022 21:42 PM
WebTitle – Uttrakhand government announce the Drafting Committee to apply the same Civil Code cm pushkar singh dhami