कपिल सिब्बल यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरील चर्चेत देशातील सद्यस्थितीवर आढावा घेण्याचा प्रयत्न केला.सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर मनुवादी सनातनी अर्बन नक्षल राकेश किशोर या इसमाने इजा होण्याच्या इराद्याने एक वस्तु फेकून मारली होती,त्यावरून देशात जे वातावरण तयार झाले आहे या मुद्यांवर महत्वपुर्ण अन गंभीर चर्चा केली आहे.
…पण मग मारुती कांबळेचं काय झालं बोला ना..?
चर्चा चांगलीच झाली,बरं वाटलं पण समाधान नाही,काहितरी अपूर्ण राहिल्यासारखं वाटत राहिलं.जी अवस्था/अस्वस्थता कपिल सिब्बल यांची झाली,ती आपलीही त्याचवेळी होते, समोरचे तिघे तुम्हाला accept करायला अजूनही तयार नाहीत? किंवा त्यांनी काही मर्यादा आखल्या असाव्यात? किंवा जन्मजात असाव्यात? हे होतंच नैसर्गिकपणे. पण दोषारोप न करता प्रश्न सोडवण्याकडे अन कुणाला नाकारण्याऐवजी समजून घेण्याकडे कल असावा अशीही एक भावना यावेळी झाली.
कपिल सिब्बल सतत त्या भिंतीला धडका देत आहेत,फिरून फिरून..
…पण मग मारुती कांबळेचं काय झालं बोला ना..? यावर जोर देत आहेत,
कपिल सिब्बल यांनी चांगला प्रयत्न केला परंतु बरेच मुद्दे त्यांच्याकडूनही सुटले,परंतु त्यात त्यांचा दोष नाही,कदाचित केवळ वानगीदाखल अलीकडच्या घटना मांडणे त्यांना जास्त महत्वाचे वाटले असावे,परंतु त्यांनी एवढं मांडणं यापेक्षा ही चर्चा घडवून आणणंच जग जिंकल्यासारखी गोष्ट वाटते मला.
जेव्हा दूसरा माणूस दूसरा समाज तुमची बाजू मांडतो,तुमचे प्रश्न तुमची दु:ख मांडतो. समजून घेतो.तेव्हाच प्रश्न सुटायला सुरुवात होते,निदान तशी शक्यता निर्माण होते.हे समीकरण आंबेडकरी तरुणांनी मन मेंदूत नीटपणे घोटवून घ्या.याशिवाय तुम्हाला तरणोपाय नाही..
संविधान निर्मिती होत असताना हेच घडलं होतं,बहुसंख्य हिंदू समाज सोबत उभा होता.म्हणून संविधान तरतुदी सफल झाल्या.अनेकदा आपण या गोष्टी विसरतो,आपल्याकडेही असं काही लक्षात येऊ नये याची काळजी घेणारे नेते असतील,नसतील माहिती नाही,पण आपल्याकडेही एकारलेपणाच्या अनुषंगाने एकच बाजू वाजवत राहण्याची परंपरा राहिली.यात आपले थोर साहित्यिक तर आत्मचरित्रातून दु:खाचा बाजार मांडण्यापलीकडे गेले नाहीत.तरीही त्यांना दोष देण्यातही अर्थ नाही,कारण हजारो वर्षे जी अडगळ साठून होती,जे अनन्वित छळवाद अन्याय अत्याचार होता त्याचं कॅथर्सिस होणं गरजेचं होतं.ती सुरुवात होती,त्याच्या दुसऱ्या पिढीने नवसर्जन सुरू करायला हवं होतं,ते नीट झालेलं नाही.त्यामुळे अनेक संभ्रम,संशयाचे वातावरण,अनेक चुकीच्या कल्पना दोन्ही बाजूने घट्ट राहिलेल्या आहेत.असो,याला सीमा नाही,त्यामुळे यावर जास्त बोलणं चर्चा दुसऱ्या ट्रॅकवर जाण्याची भीती आहे.त्यामुळे हा पॅराग्राफ ईग्नोर केला तरी चालेल.
न्यायव्यवस्थेने मात्र उचित कारवाई करण्याची गरज होती
कपिल सिब्बल यांनी त्यांच्या चर्चेत देशातील सद्यस्थितीवर आढावा घेण्याचा प्रयत्न केला.सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर
मनुवादी सनातनी अर्बन नक्षल राकेश किशोर या इसमाने इजा होण्याच्या इराद्याने एक वस्तु फेकून मारली होती,
त्यावरून देशात जे वातावरण तयार झाले आहे या मुद्यांवर महत्वपुर्ण अन गंभीर चर्चा केली आहे.
या घटनेनंतर मिडियाने एक चुकीचा नॅरेटीव्ह समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला,की न्या.भूषण गवई असं का म्हणाले?
यापेक्षा त्यांची अशी हिम्मत कशी झाली? हा दर्पोक्तीवजा प्रश्न जातीय अहंगंडातूनच येतो.देशात वातावरण असे तयार केले गेले की संविधान न मानणारा अर्बन नक्षल राकेश किशोर हा सनातनी हिरो आहे आणि संविधानाच्या कक्षेत देशाच्या सर्वोच्च अन घटनादत्त पदावर बसलेले न्या.गवई हे व्हिलन आहेत.हा नॅरेटीव्ह भारतीय न्यायव्यवस्थेसाठीही घातक ठरला आहे.याशिवाय सर्वच पातळ्यांवर याचे परिणाम दिसून येतात हे मुद्दे चर्चेत मांडले गेले.
न्या.सुधांशू धूलिया यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला की,चीफ जस्टीस भूषण गवई यांनी जरी (अर्बन नक्षल सनातनी) हल्लेखोर राकेश किशोर याला माफ केले असले तरी न्यायव्यवस्थेने मात्र उचित कारवाई करण्याची गरज होती.अन्यथा समाजात चुकीचा संदेश जाईल. मी ऐकलं की,काल परवाच गुजरातमध्ये एका न्यायालयात एका आरोपीने न्यामुर्तीवर काहितरी फेकून मारले आहे.आता हे समाजात नॉर्मल होण्याचा धोका आहे.जर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांवर हल्ला केल्याने आपल्याला काही होत नसेल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनतो.
सनातनचे मूळच अहिंसा
न्या.कौल म्हणाले मी स्वत: सनातनी आहे.मात्र जे (मनुवादी अर्बन नक्षल) स्यूडो सनातनी व्यक्तीने केलंय तो सनातन धर्म नाही,
आम्हाला सहिष्णू राहण्याचेच शिक्षण दिले जाते.
कपिल सिब्बल सुद्धा हेच म्हणाले की
सनातन धर्म प्रचंड सहिष्णू आहे,जर कुणाला आपले विचार पटले नाहीत.तर आपण हिंसा करू शकत नाही,सनातनचे मूळच अहिंसा आहे.
न्या.कौल यांचे काही मुद्दे मला थोडे काळजी करणारे वाटले हेही इथं स्पष्टपणे मांडलं पाहिजे.काही ठिकाणी त्यांचा मुद्दा सुटलेला जाणवला.
या चर्चेत न्या.दीपक गुप्ता आणि न्या.सुधांशू धूलिया यांच्याकडून आलेला प्रतिसाद मला या चर्चेतून एक आशेचा किरण वाटतो.
देशात दलित आणि अल्पसंख्याक समाजावरील अन्याय अत्याचारात वाढ
संसद संविधान सभेला उद्देशून घटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणातील महत्वाचे वाक्य, “केवळ राजकीय लोकशाही पुरेशी नाही, तिला सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये रूपांतरित करण्याची गरज आहे. सामाजिक समानता नसेल, तर मूठभर लोकांचे राज्य जनतेवर असल्यासारखे होईल,आणि लोकशाही कोसळेल.अशी भीती आंबेडकरांनी व्यक्ती केली होती,” याची आठवण न्या.सुधांशू धूलिया यांनी शेवटी व्यक्त केली.तसेच आज देशात जर कशाची वाढ झाली असेल तर ती असमानता आहे. अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.
कपिल सिब्बल यांनी देशात दलित आणि अल्पसंख्याक (मुस्लिम) समाजावरील हल्ले अन्याय अत्याचारात वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
उत्तरप्रदेश मध्यप्रदेश उडीसा उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यात असहिष्णुता वाढल्याचे निरीक्षण कपिल सिब्बल या चर्चेत नोंदवतात.
55:21 मिनिटांची ही चर्चा आहे.त्यामुळे वेळ काढून फुरसतमध्ये बघा.

मिलिंद धुमाळे
संपादक – जागल्याभारत
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 23,2025 | 12:56 PM
WebTitle – Urban Naxal Sanatani Rakesh Kishore’s act of throwing an object at a singer reflects the growing intolerance in the country.
























































