यूपी राज्य महिला आयोगाने महिलांच्या सुरक्षा आणि रोजगारासाठी काही महत्त्वाचे प्रस्ताव दिले आहेत. या अंतर्गत आता महिलांची माप महिला टेलरच घेतील. पुरुष टेलर महिलांच्या कपड्यांचे मोजमाप करू शकणार नाहीत,आणि जिममध्ये महिला ट्रेनर ठेवणे अनिवार्य असेल. उत्तर प्रदेशातील महिलांविरुद्ध होणारे अपराध थांबवण्यासाठी आणि त्यांना ‘बॅड टच’पासून वाचवण्यासाठी उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाने हा प्रस्ताव दिला आहे. यानुसार, राज्यात पुरुष टेलर महिलांचे कपडे शिवण्यासाठी महिलांची माप घेऊ शकणार नाहीत. त्यासाठी महिला टेलर ठेवावी लागेल. तसेच, जिममध्ये महिलांसाठी स्वतंत्र महिला ट्रेनर ठेवण्याचा प्रस्तावही देण्यात आला आहे.
पुरुष टेलर महिलांच्या कपड्यांचे मोजमाप करू शकणार नाहीत
जर एखाद्या महिलेला पार्लरमध्ये पुरुष कर्मचाऱ्याची सेवा घ्यायची असेल तर तिने याची लेखी परवानगी द्यावी
आयोगाच्या अध्यक्ष बबिता चौहान म्हणाल्या की, “हा प्रस्ताव महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या रोजगारासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. माझी विनंती आहे की जिममध्ये महिलांसाठी महिला ट्रेनर आणि महिलांची माप घेण्यासाठी महिला टेलरच ठेवली जावी.” त्यांनी असेही नमूद केले की, आधी ब्यूटी पार्लरमध्ये फक्त महिला कर्मचारी असायच्या, पण आता तिथे पुरुष कर्मचारीही आहेत. आजकाल ब्राइडल मेकअपही पुरुष कर्मचारी करतात. त्यांनी असेही म्हटले की, “मी फक्त इतकेच म्हणत आहे की, जर एखाद्या महिलेला पार्लरमध्ये पुरुष कर्मचाऱ्याची सेवा घ्यायची असेल तर तिने याची लेखी परवानगी द्यावी.”
जिम आणि योगा सेंटरमध्ये महिला ट्रेनर असणे अनिवार्य
तसेच त्यांनी प्रस्ताव दिला की, पार्लर, जिम आणि टेलर यांच्या ठिकाणी पुरुष कर्मचारी असतील तर त्यांचे सत्यापन पोलिसांनी करावे.
हा एक प्रस्ताव असून आयोगातील सर्व सदस्यांनी त्याला समर्थन दिले आहे.
येत्या 28 ऑक्टोबर रोजी झालेल्या आयोगाच्या बैठकीत महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महिला जिम, योगा सेंटर, शाळा, नाट्य कला केंद्रे, बुटीक सेंटर आणि कोचिंग सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते निर्देश देण्यात आले.
बैठकीत ठरवले की महिला जिम आणि योगा सेंटरमध्ये महिला ट्रेनर असणे अनिवार्य आहे.
तसेच महिला जिमचे सत्यापन देखील झाले पाहिजे. या ठिकाणी सीसीटीव्ही सक्रीय असावा आणि फक्त ओळखपत्र पाहूनच प्रवेश दिला जावा.
शाळांच्या बसमध्ये महिला सुरक्षाकर्मी किंवा महिला शिक्षिका असणे अनिवार्य
आयोगाने शाळांच्या बसमध्ये महिला सुरक्षाकर्मी किंवा महिला शिक्षिका असणे अनिवार्य केले आहे. नाट्य कला केंद्रांमध्ये महिला डान्स ट्रेनर आणि सीसीटीव्हीची व्यवस्था असावी. बुटीक सेंटरवर महिलांच्या कपड्यांची माप घेण्यासाठी महिला टेलर असावी. कोचिंग सेंटरवर सीसीटीव्ही आणि वॉशरूमची सुविधा असावी. महिलांच्या परिधानांच्या विक्री केंद्रांवर महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे.
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 08,2024 | 19:16 PM
WebTitle – UP: Men tailors will not be able to measure women’s clothes, women trainers will also have to be hired in gyms, proposal