सागर (मध्य प्रदेश): देशात दलित अत्याचाराचा घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.राजस्थान नंतर आता मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातून एका अमानुष घटनेची बातमी आली आहे. मध्य प्रदेशात एका जैन संताने मानवतेला काळिमा फासणारे कृत्य केल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील एका जैन मंदिरात तिथल्या पुजाऱ्याने 11 वर्षीय दलित मुलावर झाडाला बांधून बेदम मारहाण करत अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पुजारी निष्पाप मुलाला बेदम मारहाण करत आहे, तर अल्पवयीन स्वत:ची सुटका करण्यासाठी लोकांना मदत मागताना दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी जैन पूजऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
जैन मंदिरात दलित मुलावर अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार , या प्रकरणाचा तपास करत असलेले मोतीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सतीश सिंह यांनी सांगितलं की, जैन समाजाच्या पर्युषण सणाच्या शेवटच्या दिवशी जेव्हा सगळे जैन माफी मागत होते,(जैन धर्मातील एक प्रथा) तेव्हा या दलित समाजातील मुलाने तिथं ताटात ठेवलेले बदाम उचलले. बदाम उचलताना जैन संताने या मुलाला पाहिलं आणि थोड्यावेळापूर्वी माफी मागणारा जैन संत अचानक वेगळ्याच रूपात आला आणि रागाच्या भरात त्याने मुलाला पकडून मारहाण केली इतकच नाहीतर इतर लोकांच्या मदतीने त्याला झाडाला बांधून पुन्हा अत्याचार केला. यादरम्यान पीडित मुलाने मदतीसाठी आरडाओरडा केला.. काका सोडा मला.. मी मरेन असं म्हणत राहिला मात्र त्याला कोणीही मदत केली नाही.हे सर्व बाहेरून पाहणाऱ्या काही लोकांनी मदतीसाठी पुढे येण्याचे धाडस दाखवले खरे पण त्यांनाही या जैन साधूने तिथून हाकलून लावले. या घटनेनंतर पीडित मुलाच्या वडिलांनी करिला येथील जैन सिद्धायतन मंदिराच्या पुजाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलाच्या वडिलांनी या घटनेची तक्रार मोतीनगर पोलिस ठाण्यात दाखल करताना सांगितलं की, विद्यार्थी मंदिराच्या गेटजवळ उभा होता आणि चुकून मंदिरात गेला होता, त्यावरून जैन साधूने त्याच्यावर चोरीचा आरोप करत इतरांच्या मदतीने त्याला पकडलं आणि जबरदस्तीने झाडाला बांधून मारहाण केली.निष्पाप मुलगा रडत राहिला आणि मला सोडा म्हणत राहिला मात्र जैन संत म्हणवून घेणाऱ्याला त्या निरागस बालकाला पाहून कसलीही दया आली नाही. मारहाण होताना पाहून काही लोक समजावण्यास आले असता साधूने त्यांनाही तेथून हाकलून दिले. मुलाच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या आहेत.
या घटनेनंतर या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी सांगितले की,
आरोपी पुजारीविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या (अत्याचार प्रतिबंधक)
विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
गणेश विसर्जन करतेवेळी अनेक ठिकाणी दुर्घटना;काही जणांचा मृत्यू
सरकारी रेशन घेण्यासाठी आणली मर्सिडीज;व्हायरल व्हिडिओ मागील सत्य
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 11,2022, 11:09 AM
WebTitle – uncle-leave-me-i-will-die-dalit-boy-was-beaten-by-jain-monk-in-jain-temple