मुंबई: नवाब मलिक दररोज समीर वानखेडेंच्या संदर्भात नवे खुलासे करत आहेत.सोमवारी (22 नोव्हेंबर 2021) महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध सार्वजनिक वक्तव्ये किंवा सोशल मीडिया पोस्ट करण्यापासून रोखण्यासाठी तात्पुरता मनाई आदेश पारित करण्यास नकार दिला आहे.त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढच झाली आहे.आता नवाब मलिक यांनी वानखेडेंच्या आईच्या मृत्यूपत्राचा दाखला शेअर करत हा और एक फर्जीवाडा आहे असं म्हटलं आहे.
वानखेडेंच्या आईच्या मृत्यूपत्राचा दाखला फर्जीवाडा
न्यायालयाने नवाब मलिक यांच्यावर मनाई करण्याचा आदेश नाकारल्यानंतर ही मोठी गोष्ट नवाब मलिक यांनी शेअर केली आहे.त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.कारणही तसेच आहे.नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या आईच्या मृत्यूचा दाखला ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी असे दोन वेगवेगळे दाखले शेअर केले असून एका दाखल्यात समीर यांच्या आईच्या धर्माचा उल्लेख हिंदू, तर दुसऱ्या दाखल्यावर मुस्लीम असा उल्लेख आहे.”अजून एक खोटोपणा. अंत्यसंस्कारासाठी मुस्लीम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? धन्य आहेत ज्ञानदेव वानखेडे,” असं नवाब मलिक यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
याअगोदर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या निकाहनामाचा एक फोटो ट्वीटरवर शेअर केला होता. या फोटोत समीर वानखेडे निकाहनामावरती स्वाक्षरी करताना दिसतात. त्यांच्यासोबत मुस्लिम धर्मगुरु देखिल दिसतात.तसंच त्यांची मुलगी सना मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नांची निमंत्रण पत्रिकाही सोशल मीडियावर पोस्ट केली होती. यात समीर यांच्या वडिलांचा दाऊद वानखेडे असाच उल्लेख दिसून येतो.
तर दुसरीकडे समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी समीर वानखेडे यांच्यासोबत आपल्या लग्नाचे फोटो, पूजेचे आणि इतर कार्यक्रमांचे पोस्ट करत समीर वानखेडे हे हिंदू परंपरांचं पालन करतात असं सांगत आल्या आहेत.
तसेच स्वत: समीर वानखेडे यांनीही आपण हिंदू असल्याचे वारंवार सांगितले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत आहेत;खिडकीत कपडे वाळत घालू नका
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 25, 2021 12:01 PM
WebTitle – This is another forgery of Wankhede’s mother’s death certificate – Malik