PM Modi’s US Visit. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा सध्या मिडियात गाजवला जात आहे.व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सहभागी झाले होते. यादरम्यान भारतीय आणि अमेरिकन पत्रकारांनी दोन्ही नेत्यांना आलटून-पालटून प्रश्न विचारले. दरम्यान, एका अमेरिकन पत्रकाराने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना भारतातील भेदभावाबाबत प्रश्न विचारला.यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी उत्तर दिले की, भारतात सर्वांची साथ, सर्वांचा विकास, सर्वांचा प्रयत्न या धोरणाचे पालन केले जाते. लोकशाही आमच्या नसानसांत आहे आणि आमचा लोकशाही संस्थांच्या विस्तारावर विश्वास आहे.
लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवर आधारित संविधानाच्या आधारे आपले सरकार चालते.
अमेरिकन पत्रकाराने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना विचारले की भारतात धार्मिक अल्पसंख्याकांचे अधिकार वाढवण्यासाठी काय केले जात आहे? यावर पीएम मोदी म्हणाले की, तुम्ही असे म्हणत आहात याचे मला आश्चर्य वाटते. बस का भावा,आपणच लोकशाही आहोत. भारत आणि अमेरिका या दोघांच्या डीएनएमध्ये लोकशाही आहे, असे ते म्हणाले.लोकशाही हा आपला आत्मा आहे, लोकशाही आपल्या शिरपेचात आहे. आपण लोकशाही जगतो आणि आपल्या पूर्वजांनी ती संविधानाच्या रूपात शब्दात मांडली आहे. लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवर आधारित संविधानाच्या आधारे आपले सरकार चालते.
मोदी अमेरिका दौरा,लोकशाहीवर भाषण
‘लोकशाहीच देऊ शकते’ democracy can deliver हे आम्ही सिद्ध केले आहे, असे प्रधानमंत्री मोदी म्हणाले. मी जेव्हा असं म्हणतो तेव्हा जात, पंथ, धर्म, लिंग इत्यादी भेदभावाला तिथे स्थान नाही. आणि जेव्हा आपण लोकशाहीबद्दल बोलतो, तेव्हा जर मानवी मूल्य नसेल, मानवी हक्क नसेल, माणुसकी नसेल तर ती लोकशाहीच नाही.जेव्हा आपण लोकशाही म्हणतो तेव्हा आपण लोकशाही स्वीकारतो आणि जेव्हा आपण लोकशाहीने जगतो तेव्हा भेदभावाचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणूनच भारत सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या तत्त्वांवर चालतो.
या मीडिया ब्रीफिंगची गरज का होती?
खरं तर, तीन अमेरिकन खासदार – इल्हान उमर, रशिदा तलाईब आणि अलेक्झांड्रिया ओकासिओ-कॉर्टेझ यांनी – यूएस काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात प्रधामंत्र्यांच्या भाषणावर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितल्यानंतर मीडिया ब्रीफिंगचे नियोजन करण्यात आले होते. भारतातील धार्मिक अल्पसंख्याकांवर होत असलेल्या दडपशाहीबद्दलही त्यांनी भाष्य केले.व्हाईट हाऊसच्या बैठकीपूर्वीच अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी कान टोचत म्हटलं की, मुस्लिम अल्पसंख्याकांचा आदर न केल्यास भारत एकाकी पडण्याचा धोका आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत अध्यक्ष जो बिडेन म्हणाले की, प्रधानमंत्री मोदींसोबतच्या त्यांच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये लोकशाही मूल्यांचा समावेश आहे आणि आमच्यात चांगली चर्चा झाली.
या गोष्टी ज्या भारतीय मिडियाने तुम्हाला दाखवल्या नाहीत दाबून टाकल्या
प्रधानमंत्री मोदी यांच्या अमेरिका दौरा नियोजित असताना तिथल्या तब्बल 75 नेत्यांनी पत्र लिहून गंभीर प्रश्न विचारले आहेत.
या पार्श्वभूमीवर यूएसमध्ये रस्त्यावर देखील काही डिजिटल पोस्टर्स असणाऱ्या वॅन फिरत होत्या.या गाडीवर प्रदर्शित झालेल्या पोस्टर बॅनरपैकी,
एकावर धैर्याने लिहिलेलं होतं की, “ जो (बायडेन) ! मोदींना विचारा की विद्यार्थी कार्यकर्ते उमर खालिद याला 1000 दिवसांहून अधिक काळ खटल्याशिवाय तुरुंगात का ठेवले? ” बीबीसी डॉक्युमेंटरी बॅन का केली?” इत्यादि या पोस्टर्समध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार भारतात मानवी हक्कांचे दडपशाही करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
इतकच नाहीतर एका पोस्टरवर क्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया crime minister of india असंही लिहिलं होतं.
दुसर्या पोस्टरने अल्पसंख्याक समुदायातील लोकांच्या मॉब लिंचिंगच्या चिंताजनक वाढीकडे लक्ष वेधले आहे,
“तुम्हाला माहित आहे का की मोदींच्या राजवटीत मुस्लिम, ख्रिश्चन आणि दलितांच्या मॉब लिंचिंगमध्ये वाढ झाली आहे.
अन या सगळ्यात (सरकार म्हणून) कोणतीही जबाबदारी दिसून आली नाही.
राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना भारत-अमेरिकेतील संबंध मजबूत करण्याच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान भारताच्या अलीकडील लोकशाही च्या अवस्थेबद्दल,
75 युनायटेड स्टेट्स (यूएस) सिनेटर्स आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या काँग्रेस प्रतिनिधींनी बिडेन यांना पत्र लिहिले आहे.
तसेच गंभीर चिंता व्यक्त केली.
या सिनेटर्स नी यूएस स्टेट डिपार्टमेंट आणि नागरी समाज संघटनांच्या अहवालांचा हवाला देऊन, राष्ट्रपतींना “भारतात वाढलेली धार्मिक असहिष्णुता, राजकीय क्षेत्र संकुचित होत जाने, नागरी समाज संघटना आणि पत्रकारांना लक्ष्य करणे आणि प्रसार माध्यमे व इंटरनेट (सोशल मिडिया) वरील वाढत्या निर्बंधांचे विशिष्ट मुद्दे उपस्थित केले आहेत.अमेरिकन सिनेटर्सकडून हे पत्र मंगळवारी दुपारी इस्टर्न टाइमला प्रसिद्ध करण्यात आले, मोदी दुसऱ्यांदा अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करण्याच्या 48 तास आधी या घडमोडी घडल्या,हा एक दुर्मिळ सन्मान आहे.भारतात यावर गोदी मिडियात अजिबात चर्चा नाही,पण बातम्या सुद्धा दाबून टाकल्या जात आहेत.
भगवान बुद्ध अस्थि दर्शन ,सुट्टी न दिल्याने उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी दिला राजीनामा
मोदी सरकार आल्यापासून महिलांची उंची वाढली: भाजप नेता
Sanatani Bulldozer सनातनी बुलडोजर आता धार्मिक प्रतिक?
आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा....
First Published by Team Jaaglya Bharat on 24 JUN 2023, 12:48 PM
WebTitle – These things which Indian media did not show you during Modi’s US tour