नवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द काढून टाकण्यात आल्याचा दावा लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना चौधरी यांनी दावा केला की, ‘आज (19 सप्टेंबर) आम्हाला संविधानाच्या नवीन प्रती देण्यात आल्या, ज्या घेऊन आम्ही संसदेच्या नवीन इमारतीत प्रवेश केला.प्रस्तावनेत ‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द नाहीत. अधीर रंजन चौधरी म्हणाले की, 1976 मध्ये दुरुस्ती करून हे दोन शब्द प्रस्तावनेत समाविष्ट केले असले तरी आज कोणीतरी आपल्याला संविधानाची प्रत देतो आणि त्यात हे शब्द नाहीत. तर ही चिंतेची बाब आहे.
राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द काढले
सरकारवर ताशेरे ओढत काँग्रेस नेते म्हणाले, ‘त्यांच्या हेतूवर शंका आहे. हे अत्यंत हुशारीने केले गेले आहे. ही माझ्यासाठी चिंतेची बाब आहे. मी हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला पण मला संधी मिळाली नाही.” संसदेची नवीन इमारत मंगळवारी कामकाजासाठी खुली झाली आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जुन्या संकुलातून नवीन इमारतीपर्यंत खासदारांचा मोर्चा नेला.या प्रक्रियेत राज्यघटनेच्या नवीन प्रती संसद सदस्यांना सुपूर्द करण्यात आल्या. अधीर रंजन चौधरी म्हणाले की, त्यांना मिळालेल्या राज्यघटनेच्या प्रतीच्या प्रस्तावनेतून त्यांनी स्वतः ‘समाजवाद’ आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द लिहिलेले नव्हते मी भाषण करताना स्वत: माझ्या कडून ते शब्द उच्चारले त्यांनंतर ‘मी राहुल गांधींनाही याबाबत सांगितले.’ असं अधीर रंजन चौधरी म्हणाले.
सरकारकडून स्पष्टीकरण
अधीर रंजन यांच्या दाव्यावर आता सरकारचीही प्रतिक्रिया आली आहे.
भाजप नेते आणि केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे की,
‘जेव्हा राज्यघटना बनली,तेव्हा हे दोन शब्द त्यात नव्हते. त्यानंतर ४२वी घटनादुरुस्ती झाली…या मूळ राज्यघटनेच्या प्रती आहेत, ज्या सर्व खासदारांना वाटल्या गेल्या आहेत.
अधीर रंजन यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले,
‘…जेव्हा राज्यघटना तयार करण्यात आली होती, त्यावेळी हे शब्द नव्हते. नंतर दुरुस्ती करण्यात आली.ही मूळ प्रत आहे.
यावर आमच्या प्रवक्त्याने प्रत्युत्तर दिले आहे.
यावर माध्यमांशी बोलताना अधीर रंजन चौधरी म्हणाले की,”जर घटना दुरुस्ती झाली होती मग अमेंडमेंट झालेले संविधान आम्हाला का दिलं गेलं नाही? हे जुनं का दिलं. यामुळे आता संविधानाशी छेडछाड सुरू झाल्याचे वाटते.”
“नविन संविधान” वर हंगामा, कोण आहे बिबेक देबरॉय? संपूर्ण प्रकरण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 04,2023 | 16:30 PM
WebTitle – The words ‘secular’ and ‘socialism’ have been removed from the Preamble of the Constitution – Adhir Ranjan Chaudhary