मुंबई : कोरोना मुळे संसर्ग – कोविड-19 (COVID-19) या आजाराने नगरिकाचा मृत्यू झाल्यास सदर व्यक्तीच्या नातेवाईकास 50 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ई-अर्ज दाखल करता येणार आहे. यासाठी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या http://mahacovid19relief.in या संकेतस्थळावर संबंधितांनी लॉगीन करून अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना मुळे संसर्ग – कोविड-19 संसर्ग होऊन मृत्यू झाल्यास अशा व्यक्तीच्या नातेवाईकाला 50 हजार रुपये
इतके सानुग्रह आर्थिक सहाय्य देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दि. 04 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार,
महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय 26 नोव्हेंबर रोजी जारी केला आहे.
ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागेल
सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने Online web portal ची निर्मिती केली असून याद्वारे कोविड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in या वर लॉगिन करणे आवश्यक आहे.तसेच यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm या वेबसाइटवर देखील लिंक देण्यात आली आहे.
मुंबईतील रुग्ण संख्येत मोठी घट
दरम्यान आफ्रिकेतून आलेल्या ऑमीक्रॉन या कोरोनाच्या नव्या घातक विषाणूमुळे जगभरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे सध्या देशात मात्र ऑमीक्रॉनचा एकाही रुग्ण नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्य संस्थेने दिली आहे. परंतु तरीही खबरदारीची उपाययोजना आखली जात आहे.अशा परिस्थितीत मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (Corona Cases in Mumbai) मोठी घट झाल्याचं पाहिला मिळतंय.गेल्या 24 तासात 108 नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या दीड वर्षात कोरोना रुग्णसंख्येचा हा निचांक आहे. याआधी 16 एप्रिल 2020 रोजी 107 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच इतक्या कमी रुग्णांची नोंद झाली आहे.
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 02, 2021 17: 06 PM
WebTitle – The state government will pay Rs 50 thousand in case of death due to corona