रशिया आणि युक्रेन मधील संकटाने जागतिक अर्थव्यवस्था, राजकारण, तसेच जागतिक बाजारपेठेत एक वादळ निर्माण केले आहे.या संकटामुळे G7 राष्ट्रांच्या अर्थमंत्र्यांना रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याची योजना आखल्यास त्याचे “मोठे” आर्थिक दुष्परिणाम होतील असा आशय अधोरेखित करणारे संयुक्त निवेदन जारी करण्यास प्रवृत्त केले. “आम्ही एकत्रितपणे आर्थिक आणि आर्थिक निर्बंध लादण्यास तयार आहोत ज्याचे रशियन अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात आणि तात्काळ परिणाम होतील,”असं G7 संयुक्त राष्ट्राच्या निवेदनात म्हटलंय.
रशिया-युक्रेन मधील संघर्ष काय आहे?
रशिया आणि युक्रेनमधील तणाव 2014 मध्ये शिगेला पोहोचला होता.जेव्हा निदर्शकांनी युक्रेनचे प्रो-रशियन अध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच (Viktor Yanukovych) यांना देशाच्या सन्मानाच्या मुद्यावर झालेल्या आंदोलनातून सत्तेतून पाय उतार होण्यास भाग पाडले होते.त्याच काळात रशियाने क्रिमियात रणगाडे घुसवून क्रिमियावर जबरदस्तीने ताबा मिळवला, क्रिमिया युक्रेनचा एक भाग आहे.इथं रशियन भाषा बोलणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे.आणि हा भाग काहीसा रशियाकडे झुकलेला आहे.2014 साली तिथं सार्वमत घेण्यात आलं होतं तेव्हा ते स्पष्टपणे रशियाच्या बाजूनं गेलं.त्यामुळे इथं ताबा मिळवणे रशियाला सोपे गेले.
क्रिमियात घुसल्यानंतर पुतीन ने युक्रेनच्या सीमावर्ती भागात सैन्यबळ वाढवायला सुरुवात केली.त्याचदरम्यान लुहान्स्क आणि डोनास्क या भागातल्या काही फुटीर गटांनी यूक्रेनपासून वेगळं होतं स्वतंत्र रिपब्लिक जाहीर केलं.या गटांना बळ देण्याचे काम पुतीन करत असल्याचा आरोप आहे.मात्र त्यांनी हा आरोप फेटाळला.विशेष म्हणजे ही दोन्ही राज्ये रशियाच्या लगतच आहेत.युक्रेन आणि डोनास्क यांच्यातील फुटीरवाद्यांच्या अंतर्गत युद्धात सुमारे १४०० नागरिकांचा बळी गेला.डोनास्कला पुतीन ने बळ दिले.यातून पुतीन आणि युक्रेनचा संघर्ष सुरु झालाय.
पुतीन युक्रेनला दबावात का ठेवत आहेत?
खरंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना युक्रेनच्या लोकशाहीची भीती आहे.युक्रेन सोव्हिएत यूनियनमधून बाहेर पडला आहे.बाहेर पडल्यानंतर युक्रेननं लोकशाही व्यवस्था स्वीकारली.रशिया यामुळे अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे.कारण रशियात पुतीन यांची एकाधिकारशाही आहे.जर युक्रेन मध्ये लोकशाही व्यवस्था नांदू शकते तर रशियात का नाही? असा सवाल नागरिक विचारू शकतात.हाच प्रश्न व्लादिमीर पुतीन याना सतावत आहे.
दुसरीकडे, युक्रेन सरकार युरोपियन देशांच्या जवळ येत आहे.
2024 मध्ये ते युरोपियन युनियन सदस्यत्वासाठी अर्ज करेल,
युक्रेनला NATO मध्ये सहभागी होण्याची देखील महत्त्वाकांक्षा आहे असे त्यांनी उघडपणे म्हटलंय.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की 2019 मध्ये डोनास्क प्रदेशात शांतता, भ्रष्टाचारविरोधी
आणि आर्थिक नूतनीकरणाच्या आश्वासनांवर सत्तेवर आले आहेत.
जर युक्रेन NATO चा सदस्य झाला तर रशियासाठी हे धोकादायक ठरू शकतं.
हे होऊ नये म्हणूनच रशिया सतत युक्रेनवर दबाव वाढवत आहे.
नाटो म्हणजे काय? रशियाला धोका का?
नाटो म्हणजे काय नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (किंवा नाटो) ही जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक लष्करी संघटना आहे. नाटोची स्थापना ४ एप्रिल १९४९ रोजी १२ राष्ट्रांनी केली. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपियन देशांनी मिळून नाटोची निर्मिती झाली केली.या संघटनेचा उद्देशच रशियाला रोखणे हा होता.आणि आहे.अमेरीका, इंग्लंड, कॅनडा,डेन्मार्क,इटली,फ्रान्स बेल्जियम, आईसलंड अशा सगळ्या दादा देशांचा समावेश नाटो मध्ये होतो.यात जर युक्रेनचा शिरकाव झाला,तर अमेरिका,इंग्लड सारख्या बलाढ्य देशांना रशियाच्या सीमेवर उभे करण्यासारखे आहे.त्यामुळे पुतीन अस्वस्थ आहे.
रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध होऊ शकतं?
व्लादिमिर पुतीन युक्रेनवर दबाव वाढवत आहेत.युक्रेनच्या सीमेवर त्यांनी सैन्य आणून उभं केलं आहे.काल दोन्ही उभय देशात महत्वाची चर्चा होणार होती.या चर्चेत मात्र काही ठोस निर्णय समोर आलेला नाही.त्यामुळे ही चर्चा फेल गेलीय असं म्हणता येईल.मात्र दुसरीकडे अमेरिकेने म्हटलंय की हे युद्ध झालं तर त्याचे पडसाद जगभरात उमटतील.अमेरिका यावर लक्ष ठेवून आहे.तिसऱ्या महायुद्धाचा तणाव कमी करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांचं आम्ही स्वागतच करतो. आम्ही अनेक सहकार्यांच्या संपर्कात आहोत.असं वक्तव्य व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.
अमेरिकेला या संघर्षात इतका रस कशामुळे आहे?
क्रिमिया चे नाटो मध्ये सामीलीकरण आणि डॉनबास संघर्षाला पाठिंबा देऊन, रशियाने युक्रेनसाठीच्या बुडापेस्ट मेमोरँडम सुरक्षा आश्वासनांचे उल्लंघन केले आहे. युक्रेनसाठी बुडापेस्ट मेमोरँडम सिक्युरिटी अॅश्युरन्स हा यूएस, यूके आणि रशिया यांच्यातील 1994 चा बहुपक्षीय करार आहे ज्याचा उद्देश युक्रेनच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्यासाठी त्याच्या आण्विक शस्त्रास्त्रांचा त्याग करण्याच्या वचनबद्धतेच्या बदल्यात आहे.
हा लेख अपडेट करत असताना एक महत्वाची अपडेट आली आहे.रशियाने युक्रेनच्या सीमेवरून काही सैन्य मागे घेतल्याने,
पाश्चात्य जग सुटकेचा श्वास घेत आहे. युक्रेनमध्ये तणाव वाढत असतानाही,
व्हाईट हाऊस सावधगिरी बाळगत आहे आणि या बातमीमुळे जगभरातील शेअर बाजार सुधारत आहेत.
सध्य स्थितीत यूक्रेनच्या बॉर्डरवर रशियानं 1 लाख 30 हजार सैन्य उभं केलंय.
त्यात 1 लाख 12 हजार जवान आहेत तर 18 हजार वैमानिक, नौसैनिक आहेत. टँक, मिसाईल्स असं सगळं तैनात केलं गेलंय.
इतर वाचनीय लेख
पहिल्या स्कूटरपासून ‘हमारा बजाज’ पर्यंतचा प्रवास
कोटा मध्ये 82 हजार किलोची घंटा बांधली जात आहे,काय आहे खास?
Bhima Koregaon Commission:रश्मी शुक्ला यांचे प्रतिज्ञापत्र सादर
कर्नाटक हिजाब विवाद सुरु असतानाच दुसरीकडे केरळ सरकारची हिजाब वर बंदी
Monginis controversial ad:कुत्र्याला फुलनदेवी नाव दिल्याने संताप
व्हॅलेंटाईन डे – मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 16, 2022 15 :25 PM
WebTitle – The reasons behind the Russia-Ukraine conflict; see what has happened so far Updates