पिंपरी (प्रतिनिधी) : पिंपरी चिंचवड येथील काळेवाडीमधील एका महिला वकिलाच्या ऑफीसची तोडफोड करत मध्यरात्री ऑफिसमधील सामान चोरी केल्याची घटना घडली होती. आरोपींनी स्वत:च गुन्ह्याची माहिती व्हाटसप ग्रुपमध्ये दिल्याने पोलिस आरोपींच्या पर्यंत पोहोचले महिला वकिलाच्या ऑफिसातील मुद्देमालासह एकूण अठ्ठेचाळीस हजार सातशे रुपयांचं सामान चोरीला गेल्याची तक्रार अॅड.सोफिया जाॅर्ज डिसोझा यांनी वाकड पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
उमेश गुंड, नानू कुट्टन, शशिकांत मुगली व त्यांचे इतर साथीदार (सर्व राहणार – अम्रृतधाम सोसायटी, विजयनगर, काळेवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपींनी यापूर्वी देखील फिर्यादी यांस दमदाटी व धमकी दिलेली होती
महिला वकिलाच्या ऑफीसची तोडफोड संदर्भात दिलेल्या तक्रारीच्या विरोधात अरोपींतर्फे पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. अरोपीतर्फे युक्तिवाद करण्यात आला की, आरोपी सोसायटीचे पदाधिकारी असून ते पब्लीक सर्वंट असल्यामुळे त्यांनी कारवाई केली. परंतु सरकारी वकील व मूळ फिर्यादीच्या वकिलांनी त्यास जोरदार विरोध दर्शवत सोसायटीचे पदाधिकारी पब्लीक सर्वंट या व्याख्येत मोडत नाहीत, तसेच आरोपींनी या पूर्वी देखील फिर्यादी यांस दमदाटी व धमकी दिलेली होती व त्याचं अनुषंगाने आरोपींनी मध्यरात्री ऑफिसचे सुरक्षा ग्रील कापुन आतमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून लोखंडी टेबल, लोखंडी बेंच, लोखंडी खुर्ची व कॅनन कंपनीचा एक प्रिंटर असा मुद्देमाल चोरून नेला व मुद्देमाल अजून जप्त करावयाचा असल्याचे सांगितले.
जमीन अर्ज फेटाळला
सबब मा.न्यायालयाने दोन्ही बाजू समजून घेऊन प्रस्तुत तिन्ही आरोपींचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला.
या कामी सरकारी वकील म्हणून ॲड.अग्रवाल व सहाय्यक म्हणून ॲड.मयूर लोढा, ॲड.विश्वजीत पाटील यांनी प्रामुख्याने काम पाहिले.
तसेच असीस्ट म्हणून ॲड.राजरत्न जाधव, ॲड.दिपक जाधव, ॲड. जॉर्ज डिसुझा, ॲड.सूर्यकांत लबडे, ॲड.प्रदीप ढोले,
ॲड.मुकुंद ओव्हाळ, ॲड.व्हिक्टर पिंटो, ॲड.विजय ढकोलीया, ॲड.अजय शर्मा, ॲड.बालाजी पवार, यांनी काम पाहिले.
तसेच सुनावणीच्या वेळी पुणे ॲड.बार असोसिएशनचे व पिंपरी चिंचवड ॲड.बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
असे हल्ले रोखण्यासाठी वकिलांच्या सुरक्षेच्या माध्यमातून अश्या प्रकारच्या घटना रोखण्यासाठी
वकील सुरक्षा कायदा लवकरात लवकर पारित करून घेणे काळाची गरज असल्याचे
तसेच हा विजय वकील एकजुटीचा असल्याचे मत ज्येष्ठ विधीज्ञांनी मांडले.
सदर प्रकरणात जेष्ठ विधीज्ञ ॲड.सुशील मंचरकर, ॲड.नारायण रसाळ, ॲड.जयश्री कुटे, ॲड.संगीता परब, ॲड.साधना बोरकर, ॲड.अतिश लांडगे, ॲड.सारिका परदेशी, ॲड.गणेश शिंदे, ॲड.रेखा करंडे दांगट, ॲड.मयूर बोरुडे, ॲड.प्रवीण जगताप, ॲड.रवींद्र आरू, ॲड.करपे, ॲड.संग्राम सावंत, ॲड.किरण कदम, ॲड.माधुरी बोधक, ॲड.निकिता बोधक तसेच तमाम वकील वर्गाने वकीलावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
सदर प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत,
लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल अशी माहिती आमच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.
मेरठ एक्सप्रेस हायवेवर शाळेची बस रॉंगसाइडने सुसाट ; 6 जणांचा मृत्यू
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 16,2023 | 14:14 PM
WebTitle – The pre-arrest bail application of the accused who vandalized the office of the female lawyer and stole was cancelled
कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर शासन करावयास हवे, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येऊन गजाआड करावे.