पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड येथील काळेवाडीमधिल एका महिला वकिलाच्या ऑफिस ची तोडफोड करत ऑफिसतील सामान चोरी केल्याची घटना समोर आलीय.आरोपींनी स्वत:च गुन्ह्याची माहिती व्हाटसेप ग्रुपमध्ये दिल्याने पोलिस आरोपींच्या पर्यंत पोहोचले महिला वकिलाच्या ऑफिसातील मुद्देमालासह एकूण अठ्ठेचाळीस हजार सातशे रुपयांचं सामान चोरीला गेल्याची तक्रार महिला वकिलांनी काल 18 तारखेला वाकड येथील स्थानिक पोलिसांना दिली.
यासंदर्भात अॅड. सोफिया जाॅर्ज डिसोझा यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
उमेश गुंड नानू कुट्टन,शशिकांत मुगली व त्यांचे इतर साथीदार (सर्व राहणार -अम्रृतधाम सोसायटी विजयनगर काळेवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
महिला वकिलाच्या ऑफिस ची तोडफोड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वकिली व्यवसाय करणाऱ्या अॅड. सोफिया डिसोझा (35) यांचं ऑफिस शॉप क्र.03, सत्संग भवन जवळ, अमृतधाम सोसायटी, विजयनगर, काळेवाडी येथे असून,त्यांचे पती जॉर्ज गॅब्रियल डिसोझा (41) यांच्यासह त्या विधिज्ञ म्हणून या ऑफिसमधून व्यवसाय करत आहेत.शनिवारी रात्री 10 वाजता नेहमीप्रमाणे ऑफिस बंद करून गेले असता,दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसची तोडफोड झाल्याची माहिती त्यांचे शेजारील सलून मालक मोहन शिंदे यांनी त्यांना फोनवर दिली.
महिला वकिल अॅड. सोफिया डिसोझा यांनी अधिक माहिती घेतली असता,ऑफिसच्या बाहेरच्या बाजूस असणारे ग्रील तोडुन त्याचे नुकसान करून ग्रीलच्या आतमध्ये ठेवलेल्या लोखंडी टेबल, खुर्च्या, लोखंडी बेंच, कॅनन कंपनीचा प्रिंटर व बोर्ड इत्यादी साहित्य चोरी करण्यात आल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.
व्हाटसेप ग्रुपवर मॅसेज करून फसले आरोपी
दरम्यान,आरोपींनी अमृतधाम सोसायटीच्या व्हाटसेप ग्रुपवर मॅसेज करून कळवले की
शॉप नं 3 से बाहेर लावलेले बेकादेशीर ग्रील आम्ही काढून टाकलं आहे”
अमृतधाम सोसायटीच्या या व्हाटसेप ग्रुपमध्ये अॅड. सोफिया डिसोझा यांचे वडील सुद्धा एड होते,
त्यामुळे त्यांनी या मॅसेज बाबतची माहिती ताबडतोब मुलीला कळवली.
अॅड. सोफिया डिसोझा यांना समजलं की हे कृत्य याच लोकांनी केलेलं आहे. दि. 17/06/2023 रोजी रात्री 10 वाजता बंद केलेलं ऑफिस दुसऱ्या दिवशी दि. 18/06/2023 रोजी सकाळी 10:00 च्या आसपास बंद असताना अमृतधाम सोसायटी मध्ये राहणारे उमेश गुंड,नानु कुट्टन, शशीकांत मुगली व त्यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करुन ऑफिसच्या बाहेर असलेले लोखंडी ग्रील कापुन आतमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून लोखंडी टेबल, लोखंडी बेंच, लोखंडी खुर्ची व कॅनन कंपनीचा एक प्रिंटर असे एकूण साहित्याची किंमत 45.700 रुपये असे साहित्य त्यांच्या संमतीशिवाय चोरुन नेण्यात आले आहे.अशी तक्रार महिला वकिलांनी पोलिस ठाण्यात दिलीय.याबाबतचा अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत.
Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ फिल्म ने तीसरे दिन कितना किया कलेक्शन? आंकड़े सामने आए
आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?
अपने @jaaglyabharat के टेलिग्राम चॅनेल में एड हो जाए,ताजा अपडेट्स पाए ..
First Published by Team Jaaglya Bharat on 19 JUN 2023, 16:40 PM
WebTitle – Pune Women’s Advocate’s office vandalized
अतिशय निंदनीय बाब आहे, यामुळे पुनश्च: वकिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे, आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी.