देशातील महिलांवर होणारे अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाही.युपी बिहार मध्ये तर गँगरेपने कळस गाठला आहे.हाथरसची केस ज्यामध्ये पोलिसानीच रात्रीच्या अंधारात गपचूप अंत्यसंस्कार केले या मुद्यावरून देशभरात वातावरण घुसळून निघाले.सगळीकडे संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला.अशातच खुद्द राष्ट्रीय महिला आयोग्याच्या अध्यक्षा असणाऱ्या रेखा शर्मा यांच्याकडून 14 जानेवारी 2014 रोजी केलेल्या ट्विटचा मुद्दा ट्विटरवर मोठ्याप्रमाणावर वायरल होत आहे.
महिला आयोग हा “आपल्या मर्जीतील” आपल्या विचारांच्या स्त्रियांच्या राजकीय पुनर्वसनाचा मुद्दा
महिलांवरील अन्याय अत्याचारावर न्याय मिळावा,महिलाना संरक्षण आणि आत्मसन्मान अबाधित राहावा म्हणून देशाच्या संसदेने राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केली.महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात देशातील महिला आयोग कठोरपणे भूमिका घेईल अशी एक सामान्य अपेक्षा या आयोगाकडून आहे.मात्र स्थापना झाल्यापासून आजवर महिला आयोगाची कामगिरी निराशाजनकच राहिलेली दिसली आहे.
खासकरून दलित ओबीसी गरीब कष्टकरी महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या अन्याय अत्याचारावर महिला आयोग कारवाई करण्यासाठी कचरत आलेला दिसला आहे. महिला आयोग हा “आपल्या मर्जीतील” आपल्या विचारांच्या स्त्रियांच्या राजकीय पुनर्वसनाचा मुद्दा बनून राहिला आहे असे अलिकडे दिसून आले आहे. आणि सत्तेत असणारा कोणताही पक्ष याला अपवाद राहिलेला नाही.
ट्विट मधिल भाषा सभ्य माणसाला सुद्धा आवडणार नाही
भाजपच्या कार्यकाळात तर त्याची दुर्दशा पाहण्यालायक झालेली आहे.
अशातच खुद्द राष्ट्रीय महिला आयोग्याच्या अध्यक्षा असणाऱ्या रेखा शर्मा यांच्याकडून
14 जानेवारी 2014 रोजी केलेल्या ट्विटचा मुद्दा ट्विटरवर मोठ्याप्रमाणावर वायरल होत आहे.
सदर वादग्रस्त आणि अतिशय हीन पातळीवरील ट्विट मधिल भाषा सभ्य माणसाला सुद्धा आवडणार नाही अशी आहे.
विशेष म्हणजे ही भाषा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा असणाऱ्या रेखा शर्मा या एक महिला असून
त्यानीच एका महिलेसाठी वापरलेली आहे.हे जास्त दु:खद आहे.
सदर वादग्रस्त भाषा त्यांनी प्रसिद्ध कवी आणि आम आदमी पक्षाचे माजी आमदार
कुमार विश्वास यांच्या एका ट्विटला रीट्विट करताना वापरली आहे.कुमार विश्वास प्रियंका गांधी
या माझ्या बहिणीप्रमाणे आहेत असे म्हटले होते,त्यावर रेखा शर्मा यांनी विचित्र भाषा वापरली आहे.
यावरून ट्विटरवर सध्या गोंधळ सुरू असून अनेकांनी या भाषेबद्दल धक्कादायक म्हणत निषेध व्यक्त केला आहे.
सर्वच स्तरातून या ट्विटचा समाचार घेणे सुरू झाल्याने शेवटी रेखा शर्मा यांनी हे ट्विटच डिलिट केले आहे.
मात्र आमच्या टीमला त्यांचे स्क्रीनशॉट मिळाले आहेत.त्यामुळे आम्ही वाचकांना हे इथे उपलब्ध करून देवू शकलो.
अनेकांनी केली कारवाई करण्याची मागणी
यावर अनेकांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी केंद्रीय कापड मंत्री स्मृती इराणी यांना ट्विट करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तसेच यासाठी कुणी न्यायालयात जायलं हवं का असेही विचारले आहे.
पत्रकार राजू परूळेकर यांनीही या ट्विटल री ट्विट करत खेद व्यक्त करत राजीनामा देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
महिल्यांच्याप्रती असंवेदनशिलता बाळगणारे पायलीला पन्नास
रेखा शर्मा यांनी आपलं ट्विट डिलिट केल्याने आता त्यांना दिलेली उत्तरे रीट्विट सगळे null and void झालेली आहेत. मात्र स्क्रीनशॉटमुळे हे सगळं आपल्याला पाहता येत आहे.खरेतर ज्यावेळी त्यांनी अशी भाषा वापरली त्यावेळी त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा नव्हत्या हे खरं मात्र अशी कामगिरी असणाऱ्या व्यक्तीला भाजपने एवढ्या महत्वाच्या पदावर सन्मानित करणे.हा त्या पदाचाच एकप्रकारे अतिशय वाईट अपमान आहे. खरतर भाजप अशा लोकाना पद प्रतिष्ठा सन्मान नाही देणार तर कोण देणार असंही मुद्दा इथे उपस्थित होऊ शकतो,कारण महिल्यांच्याप्रती असंवेदनशिलता बाळगणारे पायलीला पन्नास नमुने या पक्षात पाहायला मिळतात सगळे एकाच शाळेत शिकलेले गणंग भणंग लोक.
यांच्यापैकी कुणीतरी दररोज काहीतरी महिलांच्या संदर्भाने बोलत असतोच हाथरसच्या केसच्यावेळी आपण याचा अनुभव घेतला आहेच,यावेळी विशेष घडलं कारण महिला आयोग आणि खुद्द महिला. अशी यांची भाषा असेल तर पक्षातील पुरुष मंडळींची काय कथा? आता महिला आयोग स्वत: आपल्यावरच काही कारवाई करणार आहे?
की कुणी असं अधिकारीक (आम्हाला तर असं काही दुरदूर पर्यन्त दिसत नाही) व्यक्ती या प्रकरणार कारवाई करत पडदा टाकणार आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आपलं अकाऊंट हॅक झाल्याचा रेखा यांचा दावा
रेखा शर्मा यांनी उशिरा याबद्दल स्पष्टीकरण दिले असून आपलं अकाऊंट हॅक झाल्याचा दावा त्यांनी केली आहे.तसेच याबाबत ट्विटर इंडियाला मी तक्रार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सदर ट्विट हे 2014 चे यावरून असे साधारणपणे समजता येते की अकाऊंट हॅक झाले तरी तारीख बदलून ट्विट करता येणे शक्य नसते.
कारण ट्विटरवर ट्विट एडिट करण्याची कोणतीही सोय नाही.तसे काही करता येत नाही.
आता त्यांनी केलेली सारवासारव कितपत लोकाना पटते हेही पाहणे रोचक ठरणार आहे.
BY – टीम जागल्या भारत
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)