केरळ: Pinarayi Vijayan On Kerala Name Change: केरळ चे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी बुधवारी (9 ऑगस्ट) राज्याचे नाव बदलण्यासाठी विधानसभेत ठराव मांडला. केरळचे अधिकृत नाव बदलून ‘केरलम’ करण्यात यावे, असा प्रस्ताव त्यांनी मांडला.मल्याळम भाषेत राज्याचे नाव ‘केरलम’ आहे.मुख्यमंत्री म्हणाले की 1 नोव्हेंबर 1956 रोजी भाषेच्या आधारावर राज्यांची स्थापना झाली आणि मल्याळम भाषेत राज्याचे नाव ‘केरलम’ आहे, मात्र राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये आपल्या राज्याचे नाव लिहिताना त्याचा उल्लेख “केरळ” असा केला गेला.
केंद्र सरकारला विनंती केली
विजयन म्हणाले, “ही विधानसभा एकमताने केंद्र सरकारला घटनेच्या कलम ३ अंतर्गत राज्याचे नाव बदलण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची विनंती करते.” राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या सर्व भाषांमध्ये राज्याचे नाव ‘केरलम’ असे ठेवावे, अशीही सभागृहाची विनंती आहे.
द हिंदू ने दिलेल्या वृत्तानुसार , ”मल्याळममध्ये आपल्या राज्याचे नाव ‘केरलम’ Keralam आहे. भाषिक आधारावर १ नोव्हेंबर १९५६ रोजी राज्यांची पुनर्रचना करण्यात आली. १ नोव्हेंबर रोजी ‘Keralappiravi’ day ‘केरळपिरवी’ दिवसही साजरा केला जातो. मल्याळम बोलणाऱ्या लोकांसाठी संयुक्त केरलम ची मागणी कारण त्यांची मातृभाषा स्वातंत्र्यलढ्याच्या दिवसांपासून मजबूत होती. तथापि, घटनेच्या कलम ३ अन्वये ‘केरलम’ म्हणून सुधारणा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे,’ असे ठरावात म्हटले आहे.
कलम ३ नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे, सीमा किंवा नावे बदलण्याशी संबंधित आहे.
कोणत्याही पक्षाचा विरोध नाही
विशेष म्हणजे हा प्रस्ताव विधानसभेने एकमताने मंजूर केला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने त्याला विरोध केला नाही.
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने (यूडीएफ) त्यात कोणतीही दुरुस्ती सुचवली नाही.
यूसीसीच्या विरोधात ठरावही मंजूर करण्यात आला
यापूर्वी मंगळवारी केरळ विधानसभेने समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेविरोधात ठराव मांडला होता.
UCC बाबत मुख्यमंत्र्यांनी संघ परिवारावर निशाणा साधला होता
आणि संघाने कल्पना केलेली UCC संविधानानुसार नसून ‘मनुस्मृती’वर आधारित असल्याचे सांगितले होते.
हरी नरके यांचं निधन,समतावादी पुरोगामी चळवळीची मोठी हानी
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 09,2023 | 19:43 PM
WebTitle – The name of Kerala will be changed to Keralam