हरी नरके या दीपस्तंभाची अचानक झालेली अखेर अनेकांना चटका लावून गेली.क्रांतीसूर्य जोतीबा फुले यांच्या जीवन चरित्रावर विपुल लेखन करणारे,अनेक दुर्लक्षित पैलू त्यांनी समोर आणले होते.त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत तब्बल 56 पुस्तकांचे लेखन संपादन केले.प्रामुख्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादन करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.पेशाने ते प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून महात्मा फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ, पुणे येथे कार्यरत होते,निवृत्ती नंतरही ते सामाजिक वैचारिक चळवळीचे काम करतच होते,सोशल मिडियावर ते अॅक्टिव असायचे.अनेक विषयावर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे.त्यांचं वय वर्षे ७० होतं गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याचे कळते.त्यांनी मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर त्यांचा मोठा अभ्यास होता.ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरलं होतं. त्यांच्या निधनानं पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली आहे.
मुंबईला येत असताना गाडीतच अस्वस्थ
आज सकाळी मुंबईला येत असताना सहा वाजता गाडीत त्यांना दोन वेळा उलट्या झाल्याची माहिती समोर येतेय.
त्यांना तातडीने एशियन हार्ट इन्स्टिट्यूट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला,
अशी माहिती हरी नरके यांचे निकटवर्तीय, जवळचे मित्र मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
समतेच्या चळवळीत काम करताना आमच्या असंख्य आठवणी आहेत. दलित-शोषितांच्या प्रश्नांवर त्यांचा विशेष अभ्यास होता. शोषित समुहाचे प्रश्न तडीस नेण्यासाठी ते आग्रही असायचे. त्यांच्या निधनामुळे शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार मानणाऱ्या समस्त पुरोगामी चळवळीची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे, अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी भावना व्यक्त केल्या.
हरी नरके यांचा ब्लॉग सरांचे विविष विषयांवरील साहित्य आपल्याला येथे वाचायला मिळेल.यातील महत्वाची माहिती आपण जतन करून ठेवणे गरजेचे आहे.
मुस्लिम आणि ख्रिश्चनांवर अपमानास्पद टिप्पणी बद्दल पोलीस निरीक्षक निलंबित
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 09,2023 | 11:57 AM
WebTitle – hari narke passed away