जम्मू-काश्मीरवर बनलेला ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सतत चर्चेत आहे. भारतीय जनता पक्ष ( BJP ) शासित राज्यांमध्ये या चित्रपटाला मोठा पाठिंबा मिळत आहे. उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. त्याचवेळी काँग्रेस चे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांनी बुधवारी विधानसभेतील सर्व आमदारांना ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहण्यासाठी निमंत्रित केले. ते म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केंद्रीय जीएसटी कर हटवला तर देशभरात चित्रपट करमुक्त होईल.त्यांनी ट्विट करून सांगितले की, आज रात्री ८ वाजता राजधानीतील एका सिनेमागृहात आपण सर्व आमदार आणि निमंत्रित नागरिक एकत्र चित्रपट पाहणार आहोत.
द काश्मीर फाइल्स पाहण्यासाठी काँग्रेस च्या मुख्यमंत्र्यांचं आमंत्रण
खरं तर, छत्तीसगड विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर लगेचच भाजपचे ज्येष्ठ आमदार आणि विरोधी पक्षनेते धरमलाल कौशिक यांनी ‘काश्मीर फाइल्स’चा मुद्दा उपस्थित केला. 1990 च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या काश्मीरमधून पलायनावर आधारित या चित्रपटाला छत्तीसगडमध्ये करातून सूट देण्यात यावी, असे ते म्हणाले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षातील सदस्यांना सांगितले की, चला चित्रपट पाहायला जाऊ या. भारत सरकारलाही कराचा काही भाग मिळतो, त्यामुळे केंद्राने संपूर्ण देशात ‘काश्मीर फाइल्स’ करमुक्त करावी.
देशभरात चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा
बघेल म्हणाले की, जीएसटी लागू झाल्यानंतर त्यातील अर्धा हिस्सा केंद्राकडे जातो,
त्यामुळे हा चित्रपट देश पातळीवर करमुक्त म्हणून घोषित करावा.
बुधवारी सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर आपण सर्वजण हा चित्रपट पाहायला जाऊ.
यावेळी त्यांनी प्रत्येक सदस्याला निमंत्रित केले. नंतर, जनसंपर्क विभागाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून सांगितले की
मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या सर्व सदस्यांना ‘काश्मीर फाइल्स’ पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे.
भाजपशासित राज्यांमध्ये चित्रपट करमुक्त
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाला भारतीय जनता पक्षाचा (भाजप) पूर्ण पाठिंबा मिळत आहे. उत्तर प्रदेश सरकारने नुकताच राज्यात चित्रपट करमुक्त केला आहे. यापूर्वी हा चित्रपट गुजरात, हरियाणा, कर्नाटक आणि मध्य प्रदेश आणि गोवा या भाजपशासित राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. यासोबतच त्रिपुरा आणि उत्तराखंडमध्ये करमुक्त करण्यात आले आहे. आता दिल्लीतही चित्रपट करमुक्त करण्याची मागणी भाजप नेत्याने केली आहे.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
हिजाब : कोर्टाच्या निर्णयानंतर विद्यार्थिनींचा परीक्षेवर बहिष्कार
श्रीलंका : आशियातील सर्वात प्रसिद्ध हत्ती नंदुगमुवा राजा चं निधन
भगवान बुद्धांचा मृत्यू कोणता पदार्थ सेवन केल्याने झाला? जाणून घ्या..
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 16, 2022 21: 55 PM
WebTitle – The Kashmir Files : Congress Chief minister puts on a special show; He asked the Center to make the whole country tax free