मुंबई,दि 12 – भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर दादर येथील समुद्र किनारी अंत्यसंस्कार करण्यात आले.ही जागा त्यानंतर जगभरात चैत्यभूमी म्हणून ओळखली जाऊ लागली,आणि दादरची ओळख सुद्धा चैत्यभूमी अशीच होऊ लागली.या चैत्यभूमी जवळ एक हिंदू स्मशान भूमी असून तिथे एक धर्मशाळा – कार्यशाळा सुद्धा आहे.या कार्यशाळेचे बांधकाम वाढवल्याने चैत्यभूमीचा परिसर झाकोळून गेला.त्यामुळे देशभरातील आंबेडकरी बांधवांनी संताप व्यक्त करत नाराजी व्यक्त केली.यामुळे अखेर पालिकेला हे वादग्रस्त बांधकाम पुन्हा पाडावे लागले.
याबाबत राज्यातील आंबेडकरी जनता आंदोलनाच्या पवित्र्यात होती,आणि त्यामुळे राज्यात एक मोठा पेच निर्माण झाला असता.एकीकडे कोरोना महामारी आणि दुसरीकडे अशा पेचात राज्यातील वातावरण ढवळून निघाले असते.त्यामुळे दोन्ही बाजूंनी सामंजस्य दाखवत राज्याच्या हिताचा विचार आणि भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव यांच्या ऊर्जा भूमीचे महत्व कमी करण्याचा अथवा गालबोट लावून दडपण्याचा प्रकार हाणून पाडण्यात येवून महामानवांच्या विचारांना महत्व देण्याची भूमिका देशभरातील आंबेडकरी अनुयायांनी घेतली.
या प्रकरणावर दादारचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्याशी दलित युथ पॅंथर चे अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांनी संपर्क साधला असता.त्यांनी या कार्यशाळेचे बांधकाम ताबडतोब थांबवले असून आम्ही सर्वोपरी सहकार्य करू आणि तुम्ही म्हणाल तसे करू अशी भूमिका मांडली.ते असेही म्हणाले की सदर कार्यशाळा ही कोणत्याही विशिष्ट धर्माची नसून तिथे सर्व धर्मीय येत असतात, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे सुद्धा भगवान आहेत,आपल्या सर्वांचे दैवत असून चैत्यभूमी ही आपल्या सर्वांची अस्मिता आहे. असेही ते म्हणाले.
मात्र,बांधकामाचे पाडकाम सुरू असताना शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर भलतेच संतापले होते आणि त्यातून त्यांनी दगडफेक करू अशी चिथावणी देत आपण घटनेच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने निवडून आलेले आमदार असल्याचाही त्यांना विसर पडल्याचे दिसून आले.विशेष म्हणजे ही चिथावणीखोर धमकी त्यांनी पोलिसांच्या समोरच दिल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत असून हे व्हिडिओ समाज माध्यमातून वायरल होत आहेत.
अनधिकृत बांधकामास भारतीय बौद्ध महासभा यांचा होता आक्षेप तक्रारी नंतर पालिकेची कारवाई
सदर अनधिकृत बांधकाम लॉकडाउनच्या काळात कोणतीही परवानगी न घेता बांधण्यात आल्याचा दावा
भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने करण्यात आला असून
त्याअनुषंगाने मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयास रीतसर तक्रार अर्ज करून पाडण्याची विनंती करण्यात आली होती.
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पालिकेने कारवाई करत सदर चैत्यभूमी जवळील धर्मशाळा चे अनधिकृत बांधकाम पाडून टाकले.
- टीम जागल्या भारत
(फोटो सौजन्य – जागल्या भारत प्रतिनिधी – मिलिंद चिंचवलकर )
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on APRIL 12 , 2021 21 : 06 AM
WebTitle – the controversial Dharma School near Chaityabhoomi has been demolished 2021-04-12