मध्यप्रदेश : देशातील जाती-आधारित हिंसाचाराच्या घटनेत सतत वाढ होताना दिसत आहे, मध्यप्रदेशातील रीवा जिल्ह्यात एका जातीयवादी मालकाकडून एका दलित मजुराचा हात कापला गेला आहे.अशोक साकेत ने आपल्या मेहनतीच्या मजुरीचे पैसे मागताच त्याच्या तथाकथित उच्चजातीय हिंदू मालकाने त्याचा हात कापला.मन सुन्न करणारी ही घटना 21 नोव्हेंबर रोजी डोलमाऊ गावात घडली आहे.अतीप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने साकेतला गंभीर अवस्थेत संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
साकेत हा गणेश मिश्रा यांच्याकडे बांधकाम कामगार म्हणून काम करत होता.
मजुरीचे पैसे मागताच दलित मजुराचा हात कापला
अशोक साकेतचा पुतण्या लवकुश साकेत याच्या म्हणण्यानुसार
“जेव्हा आम्ही त्याच्या थकीत मजुरीची मागणी केली तेव्हा मालकाने आम्हाला धमकावले.
हाणामारी झाली आणि त्यांनी माझ्या काकांचा हात कापला.त्याच्या चेहऱ्याला आणि जबड्यालाही दुखापत झाली होती, ”
मिश्रा थकीत मजुरीचे पैसे देण्यास दररोज विलंब करत असायचा , असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
“घटनेची माहिती सगळीकडे पसरल्यानंतर आरोपी पैकी काही लोकांनी हात लपवण्याचा प्रयत्न केला मात्र घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या पथकाने तोडलेला हात ताब्यात घेऊन तात्काळ रुग्णालयात नेला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मजुरावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला ज्यामुळे त्याचे बरेच रक्त वाहून गेले आणि आता त्याची प्रकृती चिंताजनक आहे, असे सहायक पोलीस अधीक्षक (एएसपी) शिवकुमार वर्मा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.
याप्रकरणी गणेश मिश्रा आणि त्याचे भाऊ रत्नेश मिश्रा आणि कृष्ण कुमार मिश्रा या तिघांना अटक करण्यात आली.
आरोपीने कापलेला हात जवळच लपवण्याचा प्रयत्न केला, ज्याचा नंतर शोध लागला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
या तिघांवर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न)
आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
(With inputs from The Indian Express)
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत आहेत;खिडकीत कपडे वाळत घालू नका
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 22, 2021 15:13 PM
WebTitle – The Brahmin owner cut off the hand of the Dalit laborer for asking for wages, Three arrested