लिबिया : लिबियाच्या समुद्रकिनाऱ्यावर खोम्स शहराच्या किनाऱ्याजवळ सुमारे 27 निर्वासितांचे मृतदेह सापडले आहेत. हे निर्वासित चांगल्या आयुष्याच्या शोधात अवैध मार्गाने युरोपला जात होते. मृतांमध्ये दोन महिला आणि एका लहान मुलाचाही समावेश आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मिग्रेशनच्या म्हणण्यानुसार, या वर्षी अशा घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या 1,500 वर गेली आहे.
चांगल्या जीवनाच्या शोधात युरोपला जाणाऱ्या किमान २७ निर्वासितांचे मृतदेह पश्चिम लिबियाच्या किनार्याजवळ सापडले आहेत. लिबियाच्या रेड क्रेसेंटने याला दुजोरा दिला असून बोट उलटल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. युरोपकडे जाणारा हा मार्ग बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी सर्वात धोकादायक मार्ग मानला जातो, तेथून अनेकदा स्थलांतरितांचा बुडून मृत्यू झाल्याच्या बातम्या येत असतात. परंतु तरीही, अनेक निर्वासितांची चांगले जीवन जगण्याची इच्छा या जोखमींपेक्षा जास्त असते आणि अनेक वेळा ते आपला जीव गमावून किंमत मोजतात.
मृतांमध्ये एक बालक आणि महिलांचा समावेश
रेड क्रिसेंट शाखेने सांगितले की,लिबियाच्या राजधानी त्रिपोलीपासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या खोम्स समुद्रकिनाऱ्यावर गावात मृतदेह सापडले आहेत. शनिवारी रात्री उशिरा हे सर्व मृतदेह दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापडले. या मृतदेहांमध्ये एका लहान मुलासह दोन महिलांचाही समावेश आहे. अन्य तीन निर्वासितांची सुटका करण्यात आली असून उर्वरितांचा शोध सुरू असल्याची माहिती रेड क्रिसेंट कडून देण्यात आली.
अनेक दिवसांपूर्वी बोट बुडाली
एका सुरक्षा अधिकाऱ्याने एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले की, “ज्या अवस्थेत मृतदेह सापडले त्यावरून हे जहाज अनेक दिवसांपूर्वी बुडाल्याचे दिसून येते.” सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, मृतांचा आकडा वाढू शकतो. लिबियन मीडिया संस्थांनी प्रकाशित केलेल्या प्रतिमांमध्ये मृतदेह किनाऱ्यावर ठेवण्यात आले आणि नंतर बॉडी बॅगमध्ये ठेवले गेले. दुर्घटनेची ही भयानक चित्रे कोणालाही अस्वस्थ करायला पुरेशी आहेत.
हे निर्वासित लिबियामार्गे युरोपला जाण्याच्या प्रयत्नात होते आणि बोट बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आफ्रिकन आणि आशियाई स्थलांतरितांसाठी हा युरोपचा मुख्य आणि सर्वात धोकादायक मार्ग मानला जातो.
या सागरी मार्गाने वर्षभरात 1,500 निर्वासितांचा बळी गेला
युनायटेड नेशन्स मायग्रेशन एजन्सीच्या म्हणण्यानुसार, या वर्षी मध्य भूमध्यसागरीय मार्गावर
अनेक बोट अपघात आणि जहाज कोसळून सुमारे 1,500 निर्वासितांचा मृत्यू झाला आहे.
उत्तरेकडे जाण्यापूर्वी निर्वासितांना लिबियामध्ये गर्दीच्या आणि असुरक्षित अशा जहाजांवर
अनेकदा गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशी जहाजे खराब स्थितीत असतात जी अनेकदा समुद्रात बुडतात.
आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटना(International Organization for Mirgration) अहवालानुसार,
अशाच घटनांमध्ये आठवडाभरात 160 निर्वासितांचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांतच ही शोकांतिका समोर आली आहे.
यासह, यावर्षी अशा घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1,500 वर गेली आहे.
निर्वासित शिबिरांमध्ये भयानक अत्याचार होतात
IOM च्या म्हणण्यानुसार या दरम्यानच्या कालावधीत 30,000 हून अधिक निर्वासितांना ताब्यात घेण्यात आले त्यानंतर ते लिबियात परतले.
युरोपच्या किनार्यावर येणार्या निर्वासितांची संख्या कमी करण्यासाठी युरोपियन युनियन लिबियन कोस्ट गार्डसोबत काम करत आहे.
युरोपमध्ये जाण्यापासून रोखलेल्या अनेक निर्वासितांना निर्वासितांच्या छावण्यांमध्ये भयंकर अत्याचाराचा सामना करावा लागतो.
मुलांच्या मनात त्यांचे तथाकथित उच्चजातीय पालक विष का भरतात?
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 26, 2021 19: 36 PM
WebTitle – The bodies of 27 refugees were found on a beach in Libya a heartbreaking tragedy