Tasnim Mir has become the first Indian to grab the No.1 spot in under-19 girl’s singles badminton १६ वर्षीय तस्नीम मीर ने (Tasnim Mir) भारतीय बॅडमिंटन जगतात नवा इतिहास रचला आहे. 19 वर्षांखालील मुलींच्या एकेरी गटात ती जगातील नंबर वन खेळाडू बनली आहे. ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. पीव्ही सिंधू, सायना नेहवाल सारखे दिग्गज खेळाडूही ज्युनियर स्तरावर कधीही नंबर 1 बनू शकले नाहीत. तस्नीमने 10,081 गुण मिळवले आहेत, ज्यामुळे तिला हे विजेतेपद मिळाले आहे.
तस्नीम ने वयाच्या कितव्या वर्षी खेळायला सुरुवात केली?
तस्नीम मीर ही मूळची गुजरातची असून वयाच्या ७ व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळत आहे. याचे श्रेय तीचे वडील (Irfan Mir) इरफान मीर यांना जाते, जे गुजरात पोलिसात सहाय्यक उपनिरीक्षक तसेच बॅडमिंटन प्रशिक्षक आहेत.ते स्वतः तस्नीमला कोचिंग सेंटरमध्ये घेऊन जात. तस्मिनने हळूहळू खेळात रस घेतला आणि तिच्यापेक्षा मोठ्या खेळाडूंना हरवायला सुरुवात केली. त्यानंतर लवकरच ती सबज्युनियर स्टेट चॅम्पियन बनली.
कुठे घेतले तस्नीम ने बॅडमिंटन प्रशिक्षण?
यानंतर, 2017 मध्ये तसनीमने हैदराबादमधील पुलेला गोपीचंद अकादमीमध्ये प्रशिक्षण सुरू केले, जिथे ती तीन वर्षे राहिली.
2020 मध्ये ती गुवाहाटी येथील आसाम बॅडमिंटन अकादमीमध्ये शिफ्ट झाली.
तिथे तीचा मिश्र दुहेरी भागीदार अयान रशीद आधीच प्रशिक्षण घेत होता.
तस्नीम म्हणते, ‘मी इथे माझ्या बॅडमिंटन जोडीदारासोबत ट्रेनिंग घेण्यासाठी आले होते आणि आता इथेच ट्रेनिंग सुरू ठेवायचे आहे.’
‘मला पहिल्या क्रमांकाची अपेक्षा नव्हती’
तिच्या यशाबद्दल ती म्हणते, “मी खरोखरच रोमांचित आहे. हा मोठा सन्मान आहे. या वयोगटासाठी मी खेळणे बंद केल्यामुळे मला याची अजिबात अपेक्षा नव्हती. मी गेल्या वर्षी नंबर 2 खेळाडू होते आणि मी नंबर 1 वर येईन असे कधीच वाटले नव्हते. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला , असे तस्नीमचे म्हणणे आहे. या पदासाठी ती ज्युनियर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील तिच्या चांगल्या कामगिरीचे श्रेय देते.
सीनियर कैटेगरीची ट्रेनिंग
तस्नीम आता वरिष्ठ श्रेणीसाठी प्रशिक्षण घेत आहे. ती म्हणाली , “गेल्या वर्षापासून मी बांगलादेश इंटरनॅशनलसह वरिष्ठ गटात खेळायला सुरुवात केली आहे.” तस्नीम सध्या इंडोनेशियाच्या एडविन इरियावानकडून कोचिंग घेत आहे.तसनीम मीरचे वडील इरफान मीर हे बॅडमिंटन प्रशिक्षक आणि मेहसाणा पोलिसात सहाय्यक उपनिरीक्षक देखील आहेत.इरफान अहमदाबादजवळ मेहसाणा येथे कोचिंग सेंटर देखील चालवतात. त्याना तसनीमला वरिष्ठ भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना बघायचे आहे.
टेलीप्रॉम्प्टर म्हणजे काय? कसे काम करते? नरेंद्र मोदी यांचे भाषण चर्चेत
जय भीम पिक्चर आणखी एक विक्रम,ऑस्कर अकादमी कडून सन्मान
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा, )
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 20, 2022 12: 12 PM
WebTitle – Tasnim Mir has become the first Indian to grab the No.1 spot in under-19 girl’s singles badminton