21 व्या शतकातही भारतात अस्पृश्यता जातीभेद प्रचंड प्रमाणात दिसून येतो,दलितांच्या पाण्याच्या टाकीत मानवी विष्ठा टाकल्याने अनेक लहान मुलं आजारी पडल्याची घटना समोर आलीय.भारत देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली,या पार्श्वभूमीवर भाजपची सत्ता असणाऱ्या केंद्र सरकारच्या वतीने देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे.भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा देशाचे कामकाज आणि पुढील वाटचाल यासाठी संविधान निर्मिती करण्यात आली. संविधानात हजारो वर्षापासून सुरू असलेल्या अमानवी प्रथा अस्पृश्यता जातीभेद हे कायद्याने नष्ट करण्यात आले.भारतीय संविधानात त्याच्या पानावर तरी जातीभेद कोणत्याही प्रकारचा भेदभाव आणि अस्पृश्यता सारख्या रानटी प्रथा नष्ट करण्यात आल्याचा उल्लेख आहे.मात्र हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेतून ते अजूनही नष्ट झाल्याचे दिसत नाही.समाजातील तथाकथित उच्चजातीय लोकांच्या मनातून आजही रानटी अन अमानवी असणारी अस्पृश्यता अन जातीय भेदभाव समूळ नष्ट झाल्याचे दिसत नाही.आपल्यापेक्षा तथाकथित खालच्या जातीतील व्यक्तींवर आजही अन्याय अत्याचार करणे भेदभाव करणे अस्पृश्यता पाळणे अशा रानटी प्रथा पाळणारे समाजात काही प्रमाणात दिसत आहेतच.
जातीय वैर इथेच संपत नाही
पेरियार रामास्वामी यांच्या चळवळीचा गड असलेल्या तामिळनाडूतील पुडुकोट्टई जिल्ह्यातील इरायुर गावात Tamilnadu Pudukottai caste discrimination जातिभेदाचे धक्कादायक प्रकरण समोर आलंय.यामुळे भारतातील तथाकथित उच्च जातीयांचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा उघडा पडला आहे.तामिळनाडूतील पुडुकोट्टई गावात अनुसूचित जाती (दलित) समाजासाठी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मानवी मलमूत्र टाकण्यात आलं. तपासासाठी गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना समजलं की जातीय वैर इथेच संपत नाही, पुडुकोट्टई जिल्ह्यातील इरायुर गावात अजूनही अस्पृश्यता कायम असल्याचे दिसून आलं.या गावात अस्पृश्यता इतकी आहे की स्थानिक चहाच्या दुकानात दोन वेगवेगळ्या ग्लासांची व्यवस्था आहे आणि दलितांना मंदिराच्या आवारात सुद्धा प्रवेश नाही. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकार उद्या अधिक तपासासाठी एक पथक पाठवत असल्याचे समजते.
दलितांच्या पाण्याच्या टाकीत मानवी विष्ठा
पुदुकोट्टईच्या जिल्हाधिकारी कविता रामू आणि जिल्हा पोलिस प्रमुख वंदिता पांडे यांनी मंगळवारी मध्य तामिळनाडूतील इरायुर गावाला माहिती मिळाल्यानंतर भेट दिली. गावातील 10,000 लिटर क्षमता असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मोठ्या प्रमाणात मानवी मलमूत्र आढळून आले. या टाकीतून दलित समाजातील सुमारे 100 लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो.
असं म्हणतात की प्यायला पाणी देणे हे पुण्याचे काम असते. त्यामुळे मानवाला पुण्य मिळतं,उन्हाळ्यात अनेक संवेदनशील लोक गाईला कुत्र्यांना मांजरांना पक्षांना पाणी पिण्यासाठी भांडे ठेवत असतात,परंतु दुसरीकडे मानवासाठी असणाऱ्या पिण्याच्या पाण्यात मानवी मल मूत्र विष्ठा टाकून ते दूषित करण्याचे काम करणारे काही अमानवी जनावरांच्यापेक्षाही वाईट अवस्थेतील लोक समाजात आहेत.एकवेळ पशू पक्षी सुद्धा अशा प्रकारचे कृत्य करत नाहीत.असे आपण कधी पाहिले नसेल. परंतु माणूस म्हणून आपण असे का वागतो? आपला मेंदू एवढा विषारी होऊन बधिर का होतो? यावर देशातील तथाकथित उच्च जातीय लोकानी विचार करण्याची गरज आहे.
मुलं आजारी पडल्यावर सत्य बाहेर आलं
गावकऱ्यांनी सांगितलं की, अलीकडच्या काळात त्यांच्या गावातील अनेक मुलं आजारी पडली आहेत. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतामुळे हा त्रास होऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर काही तरुणांनी टाकीवर चढून टाकीच्या आत तपासणी केली.त्यावेळी हा धक्कादायक अन हादरवणारा प्रकार उघडकीस आला.
या भागातील राजकीय कार्यकर्ते मोक्ष गुणवलगन म्हणाले, “पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मोठ्या प्रमाणात विष्ठा टाकण्यात आल्याचे आढळून आले आहे. पाणी गडद पिवळे झाले आहे. आठवडाभर लोक हेच पाणी नकळत पीत होते. “मुलं आजारी पडल्यावर सत्य बाहेर आलं.”
नेहमीप्रमाणे,याला जबाबदार कोण हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पिण्याच्या पाण्याच्या टाकीभोवतीचे कुंपण गेल्या काही दिवसांपासून उघडण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी कविता रामू यांनी सांगितलं की, “जेव्हा तरुण टाकीवर चढले तेव्हा त्यांना झाकण उघडे दिसले… मात्र कोणीही टाकीवर चढून टाकीमध्ये घाण पाणी टाकताना पाहिलेलं नाही.”
मंदिरात खालच्या जातीचे लोक नको
स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की या भागात जातीभेद प्रचंड मोठ्याप्रमाणावर आहे.
त्याना गावातील मंदिरात जाण्याची परवानगी नव्हती.
आजही खेड्यातील चहाच्या दुकानात दलितांसाठी वेगवेगळे ग्लास ठेवलेले दिसून येतात.
जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी स्वत: जाऊन चौकशी करून चहाच्या दुकानाच्या मालकावर गुन्हा दाखल केला.
या दोघांनी संपूर्ण दलित समाजाला गावातील मंदिरात नेले आणि मंदिराच्या आवारात प्रवेश करण्यापासून रोखणाऱ्यांची ओळख पटवण्यास सांगितले.
मंदिरातील प्रवेश घटना झाल्याने दलितांच्या पाण्याच्या टाकीत विष्ठा?
एकेदिवशी मंदिरात नेहमीप्रमाणे पूजा चालू होती.
अचानक एक तथाकथित उच्चजातीय महिलेच्या अंगात आलं आणि तिच्यावर एका देवतेचा ताबा आहे
अशी तीने बतावणी करत या मंदिरात खालच्या जातीचे लोक नको आहेत अशी देवाची आज्ञा आहे अशी पुडी सोडली.
पोलिसांनी तीच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.
गणित विषयात बीएस्सी पदवी घेतलेल्या सिंधुजाने सांगितले की, ती 22 वर्षे खेड्यातच वाढली. या २२ वर्षांच्या काळात तिने कधीही मंदिराच्या आवारात प्रवेश केला नाही. ती म्हणाली , “तीन पिढ्यांपासून आम्हाला मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. आज जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आत नेले, ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. हा अधिकार फक्त इथेच नाही, तर अशा प्रत्येक ठिकाणी कायम राहायला हवा. जिथे आम्हाला बाहेर ठेवले जाते.”
मंदिरातील प्रवेश घटना झाल्यानंतर दलितांच्या पाण्याच्या टाकीत विष्ठा टाकल्याची घटना घडली असल्याचे संबंधित बातम्यांची संगती लावल्यावर लक्षात येते,इतकेच नाही तर यानंतर सोमवारी चेन्नईजवळील नेदुवरंबक्कम गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची देखील विटंबना करण्यात आल्याची बातमी यानंतर आली आहे. त्याची सध्या चौकशी सुरू आहे .सोमवारी सकाळी पुतळा खराब झालेला आढळून आल्याने स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली.
ही बातमी मेनस्ट्रीम मिडिया कव्हर करत नाही.जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा.
विमानात महिलेवर लघवी करणारा शंकर मिश्रा,96 लाख पगार, बडतर्फ
Alt News मोहम्मद जुबेर यांच्या ट्विटमध्ये कोणताही गुन्हा आढळला नाही
ल्द्वानी Haldwani अतिक्रमण ; नेमकं काय समजून घेऊया
भाजप नेता 13 वर्षीय मुलीवर बलात्कार,संतप्त जमावाने गाडी पेटवली
न करणार? चित्रा वाघ बेस्ट फ्रेंड बनणार?
केतकी चितळे चा राग अनावर, ट्रोलर ला शिवी देत म्हणाली xx
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा,आम्हाला आर्थिक सक्षम बनवा!

First Published by Team Jaaglya Bharat on JAN 07,2023 13:08 PM
WebTitle – Tamilnadu Human excrement in the water tank of Dalits, many children are sick