तालिबान ने अफगाणिस्तान मध्ये 20 वर्षांनंतर पुन्हा सत्ता प्रस्थापित केल्यानंतर तिथं दहशतीचं वातावरण आहे. २० वर्षापूर्वीच्या तालिबानी सत्तेचा अनुभव असलेल्या स्थानिक जनतेच्या मनात अजूनही भीती घर करून आहे.त्यामुळे अनेक जण अफगाणिस्तानातून जीव वाचविण्यासाठी पळ काढताना दिसत आहे.तालिबान ने अफगाणिस्तान मध्ये सर्वच ठिकाणी कब्जा केला आहे.
विश्वाला शांती व अहिंसेचा मध्यममार्ग देणाऱ्या महाकारूणिक तथागताची (तालिबान) अफगाणिस्तान ला गरज..!!! तिसरा बुद्ध कुठे आहे???
” त्या बुत् चा (मूर्तीचा) सर्वनाश करणे हि आमच्यासाठी मोठे आव्हान होते व सर्वसामान्य माणसाला जमेल अशी हि गोष्ट नाही.केवळ गोळीबाराने तर तो संपणारच नाही. दोन्ही बाजूला असलेल्या कड्यात अडकवून तो डोंगरात कोरलाय. आमची प्रचंड ताकद फक्त दगडाबरोबर मजुरी करण्यात व्यर्थ जात आहे……!!!! ” – : मुल्ला कुद्रतुल्ला तत्कालिन तालिबान ( अफगाणिस्तान ) चा प्रवक्ता
आत्यंतिक पीडेतून सोडवणुकीचे मुक्तीचे कसे व कोणते उपाय देऊ शकतो?? याची चर्चा करणे हा लेखाचा विषय आहे.
आज जगभरात अफगाणिस्तान मध्ये आलेल्या दहशतवादी तालिबान राजवटीची चर्चा होत आहे. अफगाणिस्तानात भीती, दहशत, प्रचंड अमानवीय क्रोर्य, आत्यंतिक हिंसा, वेदना, पीडा, शोषणाचे वातावरण पसरले आहे. तालिबानी राजवटीची दहशत एवढी मोठी आहे की, परवा एक व्हिडिओ असा आला की एका तरूणाने विमानाच्या चाकाला धरले व तिथून तो उंचावरून पडला व ठार झाला. हि आत्महत्या करणे पसंत केले पण तालिबानी राजवट नको.
मानवी इतिहासात क्रूर शासनाची अशी हजारो उदाहरणे आहेत परंतु मानवी कल्याणाच्या एका विकसनशील टप्प्यावर येऊनही जर अशी वेळ एखाद्या देशावर येत असेल तर ती खरंतर मानवी समाजाचीच हार समजावे लागेल.
अफगाणिस्तानसारख्या प्रचंड समृद्ध वारसा लाभलेल्या देशाची आज हि स्थिती झाली आहे.
हिंसेचं दुसरं टोक हि पराकोटीची करूणाच असते. ती करूणा त्या लोकांच्या नेणीवेमध्ये आहे.
त्या करूणेला अफगाणी समाजाने कायम प्रकाश देणारी मानले.तिच्याशी ममत्वाचे नाते जोडले.तिला आपली आई मानले.
तिचा इतिहास अफगाणिस्तानात काय आहे? तिचा प्रभाव आजच्या त्यांच्या आत्यंतिक पीडेतून सोडवणुकीचे मुक्तीचे कसे व कोणते उपाय देऊ शकतो?? याची चर्चा करणे हा लेखाचा विषय आहे.
तिसरा बुद्ध कुठे आहे??? Where is the third Light??
अफगाणी जनता ज्याला त्यांच्या पख्तूनी भाषेत “सोलसोल” म्हणजे विश्वाला प्रकाश देणारा, किंवा अंतराळातून आलेला प्रकाश मानते तो “वैराचन बुद्ध”. ज्याची उंची ५५ मी (१८० फूट) आहे ज्याला पश्चिमेकडचा बुद्ध असेही म्हटले जाते.
आणि दुसरा म्हणजे पख्तूनी भाषेत ते “सहमम” म्हणजे आमची राणीआई (Queen Mother) म्हणाले म्हणजे त्यांनी त्या बुद्धाला स्त्रीरूपात पाहिले व त्यापासून ममता मागितली. आपण नाही का आपल्या विठ्ठलाला विठूमाऊली म्हणलं तसं त्यांनीही त्या बुद्धाला आपली आई केलं. असे ते बुद्धाच्या अजून जवळ गेले होते. तो बुद्ध हा ‘शाक्यमुनी’ आहे. हि मूर्ती ३८ मी. (१२५ फूट) आहे.
कार्बन डेटींगनुसार दोन्ही पुतळे प्रस्थापित करण्याचा कालावधी हा मोठ्या पुतळ्याचा इ. स. ५७० तर त्या पेक्षा लहान पुतळ्याचा काल हा इ. स. ६१८ हा निश्चित करण्यात आला आहे. दोन्ही पुतळे कच्ची लाल माती, लाईमस्टोन (चुनखडी), सँडस्टोन व लाकडी आवरणाने पर्वताने मजबूत पकडून ठेवलेल्या दोन्ही कड्यांच्या मध्ये कोरलेले आहेत.
अकराव्या शतकापासून ते आजतागायत ते दोन्ही पुतळे पाडण्याचे, फोडण्याचे प्रयत्न चालूच आहे.तरीही अजूनही कोणताही शासक, शाह, सुलतान त्याला संपूर्णपणे नष्ट करु शकले नाहीत.यावरून केवळ दगड, माती, चिखल आणि लाकडासारख्या नैसर्गिक वस्तूंनी बनवलेले हे “बुत” शहंशाहकडे अजूनही शतकांपासून कारूण्याने बघत उभे आहेत.
क्रूरकर्मा चंगेझखान
क्रूरकर्मा चंगेझखान, १५२८ मध्ये बाबरीनाम्यात या कामगिरीचा उल्लेख करणारा बाबर, ‘धार्मिक’ ‘नेकबंदा’ औरंगजेब जो फक्त त्या मूर्तीचे केवळ खपले पाडू शकला. १८ व्या शतकात लष्करी मोहिम काढणारा पर्शियन शहंशाह ‘नादर अफशर’, ज्यानं पहिल्यांदा हे पुतळे पाडण्यासाठी तोफगोळ्यांचा वापर केला. १९ व्या शतकात अफगाणी बादशाह ‘अब्दुल रहमान खान’ ज्याने बुद्धाच्या दगडी चेहऱ्याला जिद्दीने फोडले पण तोही तो पुतळा संपूर्णपणे नष्ट करू शकला नाही.
त्यानंतरची सर्वात मोठी जिद्दी मोहिम तालिबान्यांनी उघडली. २ मार्च २००० साली डायनॅमिकसारखी प्रचंड विध्वंसक स्फोटके लावूनही हि कारवाई काही आठवडे चालली. रॉकेट्स आणली गेली. शेवटच्या मार्गात तर त्यांनी तो डोंगरकडे ड्रीलमशीनने छेदले व त्या छिद्रात स्फोटके भरली. ती छिद्रे आपल्याला छायाचित्रातही स्पष्ट दिसतात. इतका प्रचंड राग त्यांना या बुत् चा आला होता.
आता विषय असा आहे की, तुम्ही दोन्ही पुतळे तर पाडले पण तिसरा बुद्ध कुठे आहे???
ज्याचा उल्लेख भन्ते युवांग श्वांग यांनी आपल्या प्रवासवर्णनात केला आहे, तो तिसरा बुद्ध कुठे आहे?? तो आपल्याला का शोधायचाय?? त्याची गरज आताच का एवढी पडली?? युवांग श्वांग यांच्या मते तो या दोन्ही मूर्तीहूनही मोठा आहे मग कुठाय तो??
दडलाय की गाडलाय जमिनीत?? दडलाय की गाडलाय अफगाण्यांच्या नेणिवेत?? तुमची नेणीव काय सांगते?? का तुम्ही त्या दोन्ही मूर्त्यांना जगाचा प्रकाश व राणीआई म्हणता?? मालदीव, इंडोनेशिया, अफ्रिकेतले त्वारेगसारख्या जमाती हे इस्लाम स्विकारूनही व्यवहारात मातृसत्ताकच का राहिले?? म्हणून हि मातृसत्ताक नेणीव तुम्हाला विठूमाऊली म्हणल्यासारखं त्याला क्वीन मदर म्हणायला का लावतेय ??
अफगाणिस्तानातील वारसा
सम्राट अशोकाचे राज्य हे कलिंगपासून कंदाहारपर्यंत आडवे पसरले होते हा ऐतिहासिक दाखला आहे, म्हणजे आजच्या ओरिसातील कलिंगपासून ते अफगाणिस्तानातील किंवा तात्कालीन गांधारप्रदेशापर्यंत पसरले होते. बौद्ध महायानी स्कूलचे दोन अत्यंत महत्वपूर्ण तत्वज्ञानी असंग व वसुबंधू ज्यांनी बौद्ध विचारविश्वाला प्रचंड योगदान दिले. तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान, प्रमाणशास्त्रात नवी भर टाकली व ज्यांचं शिष्यत्व महाविद्वान भिक्खू दिग्नागाने स्विकारले ते दोघे बंधू असंग व वसूबंधू हे जन्माने अफगाणी होते. कॉ. शरद् पाटिल या दोन्ही दार्शनिकांचा उल्लेख ‘पठाण बंधू’ असा गौरवाने करतात.
हि परंपरा सहाव्या शतकापर्यंत सहज व अक्षुण्ण राहिली. जपानचे बौद्ध इतिहास अभ्यासक ‘यामाडा’ यांनी युवांग श्वांग यांची अफगाणच्या भूमीवर पाय ठेवण्याची तारिख हि इ. स ३० सप्टेंबर ६३० अशी दिली आहे. युवांग श्वांग यांनी त्यांच्या प्रवासवर्णनात असं लिहिलं आहे की, ” हा प्रदेश चारबाजूंनी पर्वतराशींचा बनलेला आहे. येथे मोठमोठे दहा विहार आहेत. येथे जवळपास एक हजार भिक्खू आहेत, संघाराम आहेत, गुहेत जिवंत रंगांची भित्तीचित्रे (fresco) आहेत. येथे तीन प्रमुख बुद्धमूर्ती आहेत. ते इतके भव्य असूनही सोने, व महागडे हिरे जवाहिरेंनी त्यांचे बाजूंनी सजवले आहेत.”
युवांग श्वांग यांच्या म्हणण्यानुसार तीन बुद्ध आहेत.
त्यातील काही ठिकाणी अतिशयोक्ती जरी वाटली तरी तो प्रदेश हा प्रचंड समृद्ध बनलेला होता हे निश्चित आहे.या म्हणण्याला आधार आहे.
काय आधार आहेत??
तर युवांग श्वांग दक्षिण चीनमधून निघाले. ते हिंदुकुश पर्वतराशीतून दोन प्रमुख मार्ग फुटतात. त्यातील एक युरोपात जातो तर दुसरा मध्य अशियातून पूर्वेकडे निघतो. हिंदुकुश पर्वतराशीतल्या ज्या मार्गाने ते अफगाणिस्तानात उतरले तो आजही सिल्क रूट म्हणून ओळखला जातो. त्याला सिल्क रूट का म्हणायचे तर त्या मार्गाने चीनमधल्या मौल्यवान वस्त्रांना हव्या असणाऱ्या रेशीम धागा व कपड्यांची मोठ्या प्रमाणात आवकजावक होत असे. थोडक्यात तो एक महत्वपूर्ण व्यापारी मार्ग (Trade Route) होता.
बौद्ध धम्म त्याकाळी उत्पादनशक्तीचा धर्म
बौद्ध धम्म त्याकाळी उत्पादनशक्तीचा धर्म बनलेला होता.त्याने व्यापाऱ्यांचे व्यावहारिक प्रबोधन केले. मोठमोठे व्यापारी भिक्खूंची प्रवचने ऐकण्यासाठी जमत होते. त्यामुळे पुढे हे विहार बँकासारखे आर्थिक नियोजनाचे काम करू लागले होते. आपल्याकडे नाशिकमध्ये अशा प्रकारचे उल्लेख आले आहेत.
हि गोष्ट आहे म्हणून हा प्रदेश समृद्ध झाला होता. तब्बल चाळीसेक वर्षे चारिका करून युवांग श्वांग परतले.
त्यांनी उल्लेख केलेल्या तो बुद्ध तिसरा मग भौतिक अस्तित्वात नसेलही
पण तो पख्तूंनांच्या नेणिवेत कसा राहिला.तो त्यांना आज काय उत्तर देतोय का??
याची शक्यता तपासून पाहणे आज महत्वपूर्ण ठरणार आहे.
युवांग श्वान यांच्यानंतर तिथे इस्लामिक अंमल पूर्णपणे प्रस्थापित होईपर्यंत म्हणजे बारावे शतक उजाडेपर्यंत
तब्बल पाचशे वर्षांचा काल मध्ये गेला होता. तिथून ते आजपर्यंत बुद्ध संपूर्णपणे ढासळला नाही.
दहशतगर्दादहशतगर्दाच्या झुंडीने हिंसक रितीने हे ‘ईश्वरी कार्य’ पार पाडलं तरीही कारूण्यमयी बुद्ध ते संपवू शकले नाही.
प्रचंड हिंसा व आत्यंतिक अहिंसेचा उपाय याच्या पेंडलममध्ये झुल्यामध्ये अफगाणिस्तान असा झुलत गेला आहे.
दुसऱ्या भागात आपण त्या तिसऱ्या बुद्धाची चर्चा करणार आहोत
व जागतिक राजकारणात साम्राज्यवादी भांडवली राष्ट्रे तालिबान्यानांही टूल्स बनवून वापरत आहेत
त्यामुळे कोणत्या भयावह समस्या भविष्यात समोर येणार आहेत याची चर्चा करूया.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 21, 2021 09:15 AM
WebTitle – Taliban Afghanistan; The whole universe Need a Buddha