सीरिया तील युद्धात मारले गेलेल्या लहानग्यांचे फोटो सोशल मीडियात वायरल झाले.त्याने अनेकजण हेलावून गेलेत.लहान मुलांची कलेवरं पाहून मन हेलावून जाणं साहजिकच.त्यांचे शांत निपचित चेहरे अंगावर येतात.या युद्धामुळे आतापर्यंत जवळपास 5 लाख लोक मृत्युमुखी पडलेत.
युद्धात काय प्रकारची परिस्थिती उद्भवू शकते हे बघून मन हेलावून जातंय.एक संपूर्ण शहर स्मशानात बदलून गेलंय.इमारती घरं उध्वस्त झालेत.रस्त्यावर प्रेतांचाखच.इमारतींच्या ढिगाखाली गाडले गेलेले मृत तर काही जिवंत जीव.जमिनीतून अंकुर फुटून वर यावा तसे वाचलेले लहानगे जीव रडत बाहेर काढले जातायत.
हे का सुरु आहे? एवढं कौर्य कशासाठी? यामागे काय मोटिव्ह आहे? असे अनेक प्रश्न अनेकांना पडले असतील.मराठीत यात फार कमी किंबहुना लिहिलेलंच नाही.माहिती थोडी दीर्घ स्वरुपात आहे.त्यामुळे कंटाळा येवू शकतो.ज्यांना यात रस आहे त्यांनी पुढे जावं.
सीरिया मध्ये मरणारे आणि मारणारे हे एकाच धर्माचे
सीरिया मध्ये जे युद्ध सुरु आहे त्यास अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.एकच एक कारण नाही.सीरीया मध्ये मरणारे आणि मारणारे हे एकाच धर्माचे.संपत्तीचा हव्यास,तेलसाठे, धार्मिक सत्ता,राजकीय सत्ता अन एकमेकांच्या प्रती असणारा द्वेष.या कारणातून हे सर्व सुरु आहे.परंतु.यात केवळ एकच किंवा दोन पार्टी/पक्ष नाहीत.
एकावेळी अनेक देश अनेक संघटना यात सामील आहेत.हे समजून घेताना डोके अक्षरशः गरगरायला लागते.तिसऱ्या महायुद्धाची ही मीनी आवृत्ती आहे असं म्हणनं अतिशयोक्ती ठरणार नाही.
सीरियन सरकार/शिया/सुन्नी/आयएसआयएल-इस्लामिक स्टेट ऑफ इराक एंड लेव्हंट यांना आयसीस म्हणूनही ओळखले जाते/कुर्दिश सेना/एफएसए-फ्री सीरियन आर्मी/स्थानिक विद्रोही ग्रुप्स/अल-कायदा/अमेरिका/नॉर्थ कोरिया/rरशिया/तुर्की/इराण/इराक आणि जॉर्डन
एकाच देशात हे सगळे एकमेकांवर तुटून पडले आहेत.एकमेकांचे लचके तोडत आहेत.सगळेच रक्ताला चटावले रक्त पिपासू बनलेले आहेत.
यामागे एक प्रमुख क्रूर चेहरा आहे बशर-अल असाद
यामागे एक प्रमुख क्रूर चेहरा आहे बशर-अल असाद याचा.जो आज सीरिया चा सत्ताधारी हुकुमशाह आहे.हा घराणेशाहीचा वारसदार.त्याचे वडील हाफिज-अल असाद यांनी 1971 ते 2000 एवढी प्रदीर्घ काळ सत्ता भोगून 2000 साली बशर-अल असादला सुपूर्द केली.
तेव्हापासून तो तिथं सत्ता भोगत आहे.इंग्लंडमध्ये शिक्षण घेतल्यामुळे स्वभावाने प्रोग्रेसिव्ह असणारा बशर-अल असाद तेवढाच निर्दयी क्रूरकर्मा आहे.सत्ता हस्तगत करण्यासाठी त्याने राज्यघटनेत हस्तक्षेप करत दुरुस्ती करून घेतली आणि सत्तारूढ झाला.
सत्तेवर आल्यानंतर त्याने तुरुगांतून दहशतवादाचे आरोप असणारे तसेच राजकीय आरोप असणारे कैदी सोडून दिले.अन आपल्या पदरी घेतले.आणखी जे वडिलांच्या कार्यकाळात त्यांच्याशी प्रामाणिक होते त्यांना तुरुगांत टाकले.जे त्याच्या धोरणांना विरोध करत होते.
हुकुमशाहीची नशा झाल्यांनतर त्याने लेबनानच्या हिजबुल्लाह या शिया-जिहादी लोकांच्या अतिरेकी संघटनेशी हात मिळवले.हिजबुल्लाहचा अर्थ पार्टी ऑफ गॉड किंवा पार्टी ऑफ अल्लाह असा आहे.हसन नसरूल्लाह हा या संघटनेच नेता.लेबनानमध्येही गृहयुद्ध झालेलं आहे.यात हिजबुल्लाह संघटनेचा हात होता.त्यास इराणचे आर्थिक समर्थन मिळाले होते.
बशर-अल असाद आत्मकेंद्री आहे.स्वत:च्या प्रतिमेत बुडालेला.शहरात प्रत्येक चौक आणि उंच इमारतींवर त्याचे मोठे मोठे होर्डिंग्ज-फोटो पहायला मिळतात.स्वतःच्या फोटोचा तो शौकीन आहे.तसेच त्याने तिथल्या प्रसारमाध्यमांवर ताबा मिळवलेला आहे.
सीरियाची स्क्रिप्ट भारतासाठीही लागू होते
बशर-अल असादचा विचार केला तर त्याच्या आणि भारताच्या अलीकडच्या परिस्थितीत अनेक साम्य आढळून येतील.
सीरियाची स्क्रिप्ट भारतासाठीही लागू होते अन पुढे होईलही अशी काळजीयुक्त भीती वाटते.
गेले काही दिवस सोशल मिडीयाच्या माध्यमांतून लहानग्यांचे जे फोटो येत आहेत तो एक प्रोपेगंडाचा भाग वाटतो.
सीरिया अन तीची राजधानी दमास्कस,एलेप्पो येथे झालेले रॉकेटहल्ले आणि त्याहून भयंकर म्हणजे उत्तर कोरियाने पुरवलेल्या केमिकल्स युक्त शस्त्रसाठा ज्याचा वापर बशर-अल असाद ने तिथल्या रिबेलीयंसवर केला.
यात लाखो लोक मृत्यूमुखी पडलेले असले तरी सोशल मीडियात मात्र लहानग्यांचे फोटोच वायरल झालेले आहेत.आपण हे लक्षात घेतलं पाहिजे.करण हे ठरवून केलेलं आहे हे स्पष्ट.यामागे अमेरिकेची यंत्रणा असू शकते असा एक तर्क आहे.
या युद्धाची सुरुवात कुठून कशी झाली?
मिडल इस्ट देशात 2011 पासून अरबस्प्रिंग म्हणून एक संज्ञा प्रचलित झाली.त्याला कारणीभूत ठरला.एक सामान्य फळ विक्रेता.आणि हाच सामान्य फळ विक्रेता आज संपूर्ण मिडलइस्टच्या असंतोषाचा जनक मानला जातो.
अरबस्प्रिंगचा अर्थ बहार-ए-अरब किंवा अरबी वसंत ऋतू.मोहम्मद बुअजीजी (26) हा तो सामान्य फळ विक्रेता.ट्युनिशियाचा.तो हातगाडीवर फळ विकायचा,अविवाहित.वडील वारलेले.आठ सदस्य असणाऱ्या कुटुंबाची जबाबदारी.त्याच्यावर.
त्याला ट्युनिशियनपोलीस रोज त्रास द्यायचे.हप्ता म्हणून गाडीवरील टोपलीभरून फळे उचलून घेऊन जायचे.अल अबिदीन बेन अली ट्युनिशियाचा प्रधानमंत्री कम हुकुमशहा.कायर्काळ 1987 ते 2011.
याची सत्ता घालवली या सामान्य फळविक्रेत्याने
फैदा ह्म्दी या पोलीस कर्मचारी महिलेने त्यादिवशी त्याची फळे उचलून कार मध्ये ठेवली.मोहम्मद बुअजीजी गयावया करू लागला.रोजच्या त्रासाला कंटाळलेला.आज बोहनी सुद्धा झालेली नव्हती.
इतर पोलीस हसत होते.तो वरिष्ठाकडे गेला.तीथेही त्याच्यावर हसले गेले.मग तो मुख्य कार्यालयात तक्रार द्यायला गेला.सामान्य माणसांच्या सरकारी सिस्टम सोबतच्या व्यथा वैश्विक.तीथेही त्याला उडवून लावले गेले.हा सगळा घटनाक्रम चाळीसपन्नास लोक बघत होते.त्याच्या अन्यायाचे हे सर्व साक्षीदार.
वैतागून हताश होऊन मोहम्मद बुअजीजीने स्वत:ला पेटवून घेतले.आत्मदहन केलं.जमावाने वाचविण्याचा असफल प्रयत्न केला.तासभर मोहम्मद तिथेच पडून होता.पोलीस बघत होते.तो शहीद झाला.लोक चीडले.
त्यांनी ठरवलं.आता बस झालं,सोशल मीडियातून हाक दिली.मोर्चे निघाले.
सरकार उलथवून टाकलं.ही सामान्य लोकांची ताकद.त्याला आदर्श मानून मिस्र आणि लिबियात सोशल मीडिया पेटर्न राबवून क्रांती झाली.हुकुमशाही सरकारे उलथवून टाकली गेली.या घटनांचा मिडलिस्ट देशात प्रभाव पडला.नागरिकांना प्रेरणा मिळाली.
आता येवू सीरियात –
2011 –
सीरिया मध्ये गेली चार दशके असाद घराण्याची सत्ता आहे.तिथला रोजगाराचा प्रश्न आणि वारंवार कुर्दिश समाजाकडून वेगळा कुर्दिस्तानाची मागणी यामुळे अगोदरच काही प्रमाणात असंतोष खदखदत होता.
बशर-अल असाद निवडून येण्यासाठी त्याने रोजगार देण्याचे जाहीरनाम्यात सांगितलं होतं.जे वचन त्याने पाळलं नाही.बेरोजगारीला कंटाळून सीरियातील हॉम्स शहरात निदर्शने झाली.पोलिसांकडून त्यातील काही तरुणांना छळ करून मारण्यात आलं.
त्याच्या निषेधार्थ नागरिकांनी मोठा मोर्चा काढला.यामोर्च्यावरही बळाचा वापर करत पोलिसांना मुक्त गोळीबार करण्याचा आदेश देवून हा मोर्चा चिरडून मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला.ज्यात अनेक तरुण मारले गेले.अन याची परिणीती म्हणून नागरिकांनी चिडून बशर-अल असादच्या हुकुमशाही विरुद्ध हत्यारे उपसली.आणि लोकशाही राष्ट्राची मागणी केली.
तिथला उच्चभ्रू वर्ग-व्यापारी वर्ग बशर-अल असाद सोबत आहे
यांना विद्रोही म्हणले जाते (रिबेल) या गटाने सरकारच्या विरोधात उघड भूमिका घेतली.त्यांची असादसोबत आजही हीच लढाई सुरु आहे.त्यांना हत्यारे पुरवली अमेरिकेने.
तिथला उच्चभ्रू वर्ग-व्यापारी वर्ग बशर-अल असाद सोबत आहे.कोणत्याही समजातील हे घटक कायम सत्ताधारीशी सोबत करतात.
बशर-अल असादने नागरिकांवर अंधाधुंद अत्याचार सुरु केला.
नागरिकांवर केमिकल बॉम्बचा वर्षाव करून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अनेक ठरावांपैकी एक रासायनिक शस्त्रांचा वापर प्रतिबंधित आहे.
यात प्रामुख्याने रिबेलीयस ग्रुप्स टार्गेट होते.अन याचा दुसरा अर्थ स्थानिक नागरिक.
ज्या लहान मुलांना आपण पाहतो तो असादचा पराक्रम.सीरीयातील नागरिक बशर-अल असाद मरावा म्हणून दररोज प्रार्थना करतात.
अबू ह्नीन हा बशर-अल असादच्या आर्मीतील एक मोठा अधिकारी.त्याला असादच्या दहशतीबद्दल विचारलं तर तो म्हणाला,
“तुम्ही नागरिकांना विचारा आम्ही तर त्यांची सुरक्षा कशी करता येईल याचीच सतत काळजी करत असतो”
“आम्ही स्वातंत्र्यसैनिक आहोत.” जेव्हा त्याला असं विचारण्यात आलं की असादने लाखो लोकांना मारलं आहे.लाखो जीव वाचविण्यासाठी पलायन करून गेले आहेत.त्यावर तो थोडा स्तब्ध झाला.मग विचार करून एकदम उसळून म्हणाला.
“हे बघा जे झालं त्याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही,असाद आमचा अभिमान आहे.तो प्रधानमंत्री आहे आणि तोच पुढेही प्रधानमंत्री असणार आहे. तो खूनी नाही,त्याने लहान मुलांना स्त्रियांना मारलेलं नाही,ज्यांनी चूक केली त्यांना त्याची शिक्षा मिळाली.यासाठी ते स्वत:जबाबदार आहेत.त्यांनी स्वीकार करो अगर ना करो बशर-अल असाद हा कायम राहणार आहे”
जगात स्थलांतर करण्याऱ्या देशात सीरिया क्रमांक एक वर आणि आपला भारत नंबर दोनवर आहे.
सीरियन नागरिक रानिया मुस्तफा अली त्यावेळी 20 वर्षाची होती.राक्का-कोबान मधून तीनं स्मगलरच्या मदतीने पलायन केले.
स्मगलर आयसीस आणि इतर जिहादी पैसे दिले की सगळ्या गोष्टी करतात.त्यासाठीच सर्व सुरु आहे.
जगात स्थलांतर करण्याऱ्या देशात सीरिया क्रमांक एक वर आणि आपला भारत नंबर दोनवर आहे.(अभिनंदन)
आयलान कुर्दिशचा वायरल झालेला फोटो आपल्याला आठवतच असेल.तो याच दरम्यानचा.असाच पलायनात बोटीत बळी गेला होता.
रानियाने पलायन केलं तेव्हा तीला ज्या बोटीत एजंटने बसवले त्या बोटीची 15 लोकांची क्षमता असताना
52 लोक अक्षरशः एकावर एक कोंबले होते.तीही बोट उलटणार होती.
सुदैवाने एक मोठी बोट जवळून जाताना भर समुद्रात त्यांना रेस्क्यू करण्यात आलं.
पुढे निर्वासित छावण्यात पावसामध्ये राहणे.पुन्हा त्या छावण्यांवर रबरी गोळ्या अश्रुधुराचे हल्ले.बलात्कार शोषण सुरूच होतं.
पलायन करणाऱ्या नागरिकांत व्हीलचेअरवर असणारे दोन लोक होते ज्यांना सोबतचे लोक नदी पलीकडे घेऊन जाताना दिसतात,
छावणीत असणारी नुकतीच चालू लागलेली दोन अडीच वर्षाची काही पाळण्यातली लहान बाळं
या सगळ्याच माणसांची जगण्यासाठीची धडपड आणि मृत्यूचा पाठलाग
अन यास कारणीभूत माणूस म्हणून आपण किती क्रूर वागू शकतो हा विचार तुम्हाला अस्वस्थ करून निद्रानाश देवू शकतो.
रानिया मुस्तफा अली सुदैवी ठरली तिच्यासोबतचे इतरही.मात्र लाखो लोक जे मृत्यू पावले
आणि आजही मृत्युच्या दाढेत जीव मुठीत घेऊन प्रतीक्षा करत आहेत त्यांच्याबद्दल आपण केवळ प्रार्थना करू शकतो.
एकच देव अल्लाह बाकी सगळे काफिर मृत्यू अटळ अशी धारणा
बशर-अल असाद सीरियन सरकारच्या अत्याचाराविरुद्ध असणारे रिबेल ग्रुप.शिया-सुन्नी यांचा धर्मांतर्गत श्रेष्ठत्वाची लढाई.
आयसीसची खलीफा (मुस्लीम धर्माचा एकमेव सर्वोच्च नेता) बनण्याची महत्वाकांक्षा एकच
देव अल्लाह बाकी सगळे काफिर मृत्यू अटळ अशी धारणा.
कुर्दिश लोकांचा वेगळा कुर्दिस्तानची मागणी,सीरियातील तेलसाठे.इराण इराक.रशिया यांची त्यावर असणारी नजर.
अमेरिका उत्तरकोरियाला संपविण्याच्या पवित्र्यात आहे.तसेच तेलसाठ्यावर देखील कब्जा करण्याची मंशा आहे.
त्यामुळे उत्तर कोरियाने केमिकलशस्त्र पुरवठा केला असा व्हाईटहाउसने आरोप केला आहे.या सगळ्याचा हा परिपाक.
भारताने यात काहीही भूमिका घेऊ नये तटस्थ राहणे हीच एक भूमिका असली पाहिजे.
आज कोण कुणाविरुद्ध आहे –
1 बशर-अल असाद सीरियन सरकार विरुद्ध – रिबेल ग्रुप/ यांना अल-कायदा नंतर जॉईन झाली.
2 बशर-अल असाद सीरियन सरकार विरुद्ध – कुर्दिश आर्मी
3 बशर-अल असाद सीरियन सरकार विरुद्ध – जॉर्डन
4 बशर-अल असाद सीरियन सरकार (शिया) विरुद्ध – सुन्नी आर्मी
5 बशर-अल असाद सीरियन सरकार विरुद्ध – अमेरिका
6 बशर-अल असाद सीरियन सरकार विरुद्ध– आयसीस (अल कायदा फुटली तीचं हे रूप)
7 आयसीस विरुद्ध – रिबेल ग्रुप्स/अमेरिका/कुर्दिश आर्मी एंड यस रेस्ट ऑफ द वर्ल्ड
8 टर्की विरुद्ध – बशर-अल असाद सीरियन सरकार /कुर्दिश/आयसीस/रशिया
9 रीबेल्स विरुद्ध – रशिया
10 इराण विरुद्ध – रिबेल ग्रुप/कुर्दिश
थोडक्यात ठळकपणे
बशर-अल असाद/हिजबुल्ला/रशिया/इराण एका बाजूला
बाकी सगळे एका बाजूला.
यात एक बाजू शिया विरुद्ध सुन्नी मुस्लीम जगत
संदर्भ –
द गार्डियन
अल जझिरा
द डिप्लोमेट
व्हाईस न्यूज
सीबीसी वर्ल्ड न्यूज
वाशिंगटन पोस्ट
बीबीसी न्यूज
Research Report 2010 To 2016
and YOUTUBE
पॅलेस्टाईन – आधुनिक शस्त्रात्रे टेस्ट करण्याची जागतीक प्रयोगशाळा
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)
First Published on Sep 24, 2020 13:55 PM
WebTitle – syria war isis