Pune Professor Controversial Statement: अलिकडे महापुरुषांच्या विरोधात अपशब्द वापरणे दैवतांच्या विषयी वादग्रस्त बोलणे यामुळे समाजात तणाव निर्माण होत आहे.नुकतेच पुणे पोलिसांनी हिंदू देव-देवतांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल सिम्बॉयसिस कॉलेजच्या प्राध्यापकांना अटक केलीय. प्रा अशोक ढोले असं अटक करण्यात आलेल्या प्राध्यापकांचे नाव आहे. डेक्कन पोलिसांकडून यासंबंधी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलीय.प्रा अशोक ढोले यांना अटक करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली होती,त्याची डेक्कन पोलिसांकडून अंमलबजावणी करण्यात आलीय. डेक्कनच्या पोलिसांनी कलम 295\ अ अंतर्गत ही कारवाई केल्याचे समजते.
नेमकी काय आहे घटना जाणून घ्या
पुण्यामधिल नामांकित सिम्बॉयसिस कॉलेजमधिल ही घटना असल्याचे समोर आले आहे.या कॉलेजमधील प्राध्यापक अशोक ढोले यांनी हिंदू देवतांचा अवमान केल्याचा आरोप आहे.“नवरा बायको मोठ्या नदीतून होडीत बसून जात असतात दुसऱ्या नावेत इतर धर्माचे लोक जात असतात,त्यावेळी संकटात सापडलेले मुस्लिम धर्मिय लोकांनी धावा केला,त्यानंतर अल्लाह नी त्यांना वाचवलं,त्यानंतर ख्रिस्ती धर्मियांनी जिजस चा धावा केला तेव्हा जिजस नी त्यांना वाचवलं, हिंदूं धर्मीय पत्नीने अगोदर रामाचा धावा केला,राम यायला निघाले इतक्यात त्यांनी लक्ष्मण चा धावा केला लक्ष्मण यायला निघाले इतक्यात सीता मातेचा धावा केला,असं करत करत महालक्ष्मी इत्यादी धावा केला.त्यामुळे (कंफ्यूजन होऊन) कुणीच आलं नाही,आणि ती बुडाली,माझ्या म्हणण्याचा अर्थ इतकाच की आपल्याकडे अनेक देव आहेत,मात्र देव हा सर्वांचा एकच आहे.देवाची ही निर्मिती आपणच (मानवांनी) केलीय,ज्याना जसं आवडलं तसा देव बनवला गेला” अशा आशयाचं विधान प्राध्यापक ढोले यांनी केलं होतं.हे विधान वादग्रस्त असल्याचा आरोप करत तक्रार करण्यात आली अन त्यांना अटक करण्यात आली आहे.
सिम्बॉयसिस व्यवस्थापनाकडून प्रा.अशोक ढोले यांचं निलंबन
प्राध्यापक अशोक ढोले हे विद्यार्थ्याना शिकवत होते.वर्गात शिकवत असताना त्यांनी हे विधान केलं होतं. कुणीतरी त्यांचा हा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि त्यांनी याप्रकरणी संबंधित प्राध्यापकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी या मागणी केली. यासाठी त्यांनी सकल हिंदू समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला होता.त्यानंतर पोलिसांनी प्राध्यापक अशोक ढाले यांना अटक केली आहे.इतकच नाही तर या अटकेच्यानंतर सिम्बॉयसिस च्या व्यवस्थापनाने कारवाई करत प्राध्यापक अशोक ढोले यांना निलंबित करण्यात आले आहे.
शिंदे शिवसेना गटाने देखील केली अटकेची मागणी
प्राध्यापक अशोक ढोले यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या प्रकरणी शिंदे गट शिवसेना यानीही अटकेची मागणी केली आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हृषिकेश सोमण यांनी पीटीआयला सांगितले की, वर्गादरम्यान एका विद्यार्थ्याने व्हिडिओ शूट केला.
“नंतर, एका संघटनेच्या काही सदस्यांनी व्हिडिओसह आमच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
आम्ही त्यांना निलंबित केले आहे, महाविद्यालय सरकारी अनुदानित असल्यानं,सदर प्राध्यापकांची चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे,”
डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व्हीव्ही हसबनीस यांनी सांगितले की,
अशोक ढोले यांना भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ (धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये)
अंतर्गत अटक करण्यात आली असून त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाईल.
या घटनेचा व्हिडिओ इथे पाहू शकता
महाराष्ट्र ISIS मॉडेल पुणे, डॉक्टर ची पाचवी अटक,विवादस्पद साहित्य सापडल्याचा दावा
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 03,2023 | 020:56 PM
WebTitle – Symbiosis: For Insulting Hindu Gods Prof. Ashok Dhole arrested