अभिनेते सुव्रत जोशी यांनी आपल्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळापासून बुद्ध, बौद्ध तत्त्वज्ञान आणि पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपर्यंत झालेल्या वैचारिक प्रवासाचा अनुभव मांडला आहे. वडिलांच्या निधनानंतर निर्माण झालेला मानसिक ताण, नैराश्याच्या उंबरठ्यावर असताना हिमाचल प्रदेशातील बीर येथे झालेली बौद्ध चिंतन कार्यशाळा आणि त्यानंतर बदललेले जीवन याविषयी त्यांनी सविस्तर भाष्य केले.
वडिलांच्या निधनानंतर आयुष्याचा रथ चौखूर उधळल्यासारखा झाला होता. मन सावरण्यासाठी संस्कार, समजुती आणि कर्मकांडातून मिळालेली पारंपरिक आयुधेही अपुरी पडत होती, असे जोशी यांनी सांगितले. याच काळात बौद्ध समाजातील एका हुशार आणि प्रगल्भ जिगरी मित्राच्या आग्रहामुळे ते हिमाचल प्रदेशातील बीर येथे एका बौद्ध रिनपोचे यांच्या चिंतन कार्यशाळेला गेले. या अनुभवाने त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.
“जगण्याच्या मूलभूत प्रश्नांविषयी, भवतालाविषयी, मनुष्याच्या विकारांविषयी, वास्तवाच्या सत्याविषयी
आणि प्रकृतीविषयी इतकं अगाध आणि रसरशीत ज्ञान उपलब्ध आहे, याची पहिल्यांदाच जाणीव झाली,” असे त्यांनी सांगितले.
या अनुभवानंतर बुद्ध आणि बौद्ध तत्त्वज्ञानाकडे आपला मोठा ओढा निर्माण झाला आणि पुढील तीन-चार वर्षे त्यांनी मोठ्या प्रमाणावर पुस्तके वाचली.
विशेष म्हणजे अभिनयाच्या प्रशिक्षणादरम्यान त्यांना मिळालेल्या काही ध्यानपद्धतींचे मूळ बौद्ध परंपरेत असल्याची जाणीवही त्यांना झाली.
आपले गुरू आदिल हुसेन यांच्याकडून अभिनयाची विद्या शिकताना अनेक meditation techniques नियमितपणे करत होतो.
चांगला नट होण्यासाठी तासनतास त्यांचा सराव केला; मात्र नंतर त्याच पद्धतींच्या आध्यात्मिक बाजूचा प्रत्यय आला, असे जोशी यांनी नमूद केले.
“बुद्ध म्हणतो की एक पंख सरावाचा आणि एक ज्ञानाचा. दोन्ही पंख मारल्याशिवाय उडणे शक्य नाही.आधी फक्त एक पंख फडकवत होतो, आता दोन्ही,”
अशा शब्दांत त्यांनी आपल्या वैचारिक परिवर्तनाचे वर्णन केले.
या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी झालेली त्यांची ओळख.
एका हुशार प्रगल्भ आणि बौद्ध समाजातून आलेल्या जिवलग मित्रामुळे बाबासाहेब त्यांच्या विचारविश्वात आले,असे त्यांनी सांगितले.
बुद्धाकडे जाण्याचा आपला पहिला प्रवास तिबेटियन आणि थेरवाद परंपरांच्या माध्यमातून झाला होता. मात्र त्या टप्प्यावरचा आध्यात्मिक प्रवास काही प्रमाणात आत्ममग्नतेकडे, स्वतःभोवतीच फिरण्याकडे जात असल्याचे त्यांना जाणवले. नाटकाच्या क्षेत्रात असल्यामुळे समाजभान आणि राजकीय भूमिका असण्याची गरज आधीपासूनच त्यांच्या मनात रुजलेली होती. त्यामुळे आध्यात्मिक भान आणि सामाजिक-राजकीय जाणीव यांच्यातील दुवा शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला.
दरम्यान, लोकप्रिय विज्ञान आणि विज्ञानाच्या तत्त्वज्ञानाचाही त्यांच्यावर प्रभाव पडला.
रिचर्ड डॉकिन्स यांच्यासह लोकप्रिय विज्ञानाच्या साहित्यामुळे प्रत्येक गोष्टीमागे कार्यकारणभाव शोधण्याची सवय लागल्याचे ते सांगतात.
या सर्व वैचारिक प्रवाहांना एकत्र जोडणारा मार्ग त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमध्ये दिसला.
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये केवळ राजकीय घोषवाक्ये न राहता प्रत्यक्ष जीवनात आणण्यासाठी आध्यात्मिक
आणि सामाजिक-राजकीय मार्ग बाबासाहेबांनी निर्माण केला, असा साक्षात्कार झाल्याचे जोशी यांनी म्हटले.
“आधुनिक भारतीय म्हणून किंवा आधुनिक मानव म्हणून कुठल्या दिशेने चालायचे,
याची वाट बाबासाहेबांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पुस्तकातून घालून दिली,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
जोशी यांच्या या अनुभवातून अभिनय, ध्यान, बुद्धाचे तत्त्वज्ञान, विज्ञानाची दृष्टी आणि आंबेडकरी विचार यांचा परस्परसंबंध त्यांच्या वैचारिक प्रवासात कसा तयार होत गेला, याची झलक मिळते. अभिनय हे केवळ उपजीविकेचे साधन किंवा व्यवसाय नसून तो एक आध्यात्मिक प्रवास असल्याची जाणीव झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले असून, या विषयावर सविस्तर पुन्हा लिहिणार असल्याचे संकेत दिले आहेत.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 00,2026 | 09:00 AM
WebTitle — Suvrat Joshi on Buddha, Buddhism and Dr Babasaheb Ambedkar























































