नवी दिल्ली : गणेशोत्सव आणि दुर्गापूजेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने (DPCC) यमुना नदीसह राजधानीतील इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनावर निर्बंध घातले आहेत. स्थानिक प्रशासनाने निश्चित केलेल्या अधिकृत विसर्जन स्थळांवरच मूर्ती विसर्जन करता येणार आहे.
DPCC ने 9 सप्टेंबर रोजी जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, 1974 मधील कलम 33A अंतर्गत हे निर्देश जारी केले आहेत. मूर्ती तयार करणारे आणि विक्रेते यांनी नैसर्गिक माती, जैवविघटनशील साहित्य आणि नैसर्गिक रंगांचा वापर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्तींचे जलस्रोतांमध्ये विसर्जन करू देऊ नये, असेही DPCC ने स्पष्ट केले आहे. गणेशोत्सव आणि दुर्गापूजेच्या काळात नद्या, तलाव, तळी आणि विहिरींमध्ये मूर्ती विसर्जित करण्याची परंपरा असल्याने त्यातून होणाऱ्या जलप्रदूषणाचा मुद्दा लक्षात घेऊन हे निर्देश देण्यात आले आहेत.
DPCC च्या म्हणण्यानुसार, मूर्ती विसर्जनामुळे जलस्रोतांमध्ये गाळ साचण्यासोबतच पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. पाण्याची conductivity, biochemical oxygen demand (BOD) तसेच जड धातूंच्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता असते.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर 50 हजार रुपयांपर्यंत पर्यावरणीय नुकसानभरपाई
मूर्तींवर वापरण्यात येणाऱ्या रासायनिक रंग आणि रंगद्रव्यांमध्ये पारा, क्रोमियम, शिसे आणि कॅडमियम यांसारखे घातक घटक असू शकतात.
त्यामुळे जलचर सजीवांसह सार्वजनिक आरोग्यावरही परिणाम होण्याचा धोका असल्याचे DPCC ने नमूद केले आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) मे 2020 मध्ये जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने हे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, राष्ट्रीय हरित लवादाच्या 13 जानेवारी आणि 16 सप्टेंबर 2015 रोजीच्या आदेशांचा हवाला देत
यमुनेत कचरा, पूजेचे साहित्य, अन्नधान्य, तेल आणि इतर वस्तू टाकण्यास मनाई असल्याचे DPCC ने स्पष्ट केले आहे.
केवळ निश्चित केलेल्या ठिकाणीच अशा वस्तूंची विल्हेवाट लावता येईल.
निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर 50 हजार रुपयांपर्यंत पर्यावरणीय नुकसानभरपाई आकारली जाऊ शकते.
ही रक्कम DPCC कडे जमा केली जाणार आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांना निवासी भागांच्या जवळ तात्पुरत्या मूर्ती विसर्जनासाठी सुविधा
आणि कृत्रिम तलाव उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिल्लीमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांमधून प्रतिबंधित प्रकारच्या मूर्ती आणल्या जात आहेत का, याची तपासणी करण्याची जबाबदारी महापालिका संस्था आणि दिल्ली पोलिसांवरही सोपवण्यात आली आहे.
परवाना किंवा आवश्यक नोंदणीशिवाय मूर्ती तयार करणाऱ्या बेकायदा युनिट्सवरही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 16,2026 | 21:30 PM
WebTitle – Delhi Bans Idol Immersion in Yamuna During Ganeshotsav and Durga Puja























































