उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या भाऊ आणि वहिनी ला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांना अटक न केल्याने धक्कादायक पाऊल उचलले. त्याने कॅमेऱ्यासमोर आपले एक बोट कापून व्हिडिओ व्हायरल केला.धनंजय ननावरे यांनी आपले तोडलेले बोट महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवले आहे.धनंजय ननावरे उद्विग्नपणे म्हणाले, ज्या बोटाने मोदी सरकारला मतदान केलं तेच बोट मी कापलंय. तसेच ज्यांनी माझ्या भाऊ आणि वहिनी ला आत्महत्या करण्यास भाग पाडले त्यांना पकडले नाही तर माझ्या शरीराचा एक एक भाग कापून दर आठवड्याला पाठवू, असेही म्हटले आहे.
महाराष्ट्रातील उल्हासनगरचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, जोडप्याची आत्महत्या प्रकरण, वाचा 10 मोठ्या गोष्टी
1.नंदकूमार ननावरे यांनी 20 दिवसांपूर्वी पत्नीसह आत्महत्या केली होती. ते अंबरनाथच्या दिवंगत आमदार ज्योती कलानी यांचे पीए होते. सध्या ते अंबरनाथचे विद्यमान आमदार बालाजी किनकर यांचे पीए होते. मात्र, किणीकर यांनी याचा इन्कार केला आहे.
2.पोलिसांना सापडलेल्या सुसाईड नोट आणि व्हिडीओवरून ननावरे दाम्पत्य काही गुंडांमुळे त्रासले होते. व्हिडिओमध्ये त्याने साताऱ्यातील काही लोकांचा आणि एका वकिलाचा उल्लेख करून हे लोक आपला मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे.
3.या सर्वांवर आरोप करत नंदकुमार ननावरे यांनी पत्नीसह आत्महत्या केली होती. या प्रकरणी कोणालाही अटक न केल्याने संतापलेल्या नंदकुमारचा भाऊ धनंजय याने त्याचे एक बोट कापले आणि व्हिडिओ व्हायरल केला.
4.उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मधील आशेळेपाडा परिसरात नंदकुमार हे कुटुंबासह राहत होते.
त्याने पत्नीसह बंगल्याच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली होती.
5.नंदकुमार ननावरे यांनी आत्महत्येपूर्वी मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यात त्यांनी संग्राम निकाळजे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, अधिवक्ता ज्ञानेश्वर देशमुख व नितीन देशमुख (हे सर्व सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील रहिवासी) त्रास देत असल्याने व्यथित होऊन आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते.
6.या प्रकरणात विठ्ठलवाडी पोलिसांची भूमिकाही संशयास्पद असल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. मात्र, नंदकुमारचा भाऊ धनंजय समाधानी नाही.
7.धनंजय यांनी म्हटलं की ते आठवडाभरापासून गुन्हे शाखेत जाऊन तपास अधिकाऱ्यांना भेटत आहेत. मात्र त्यांना टाळाटाळ केली जात आहे.
8.धनंजयने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ज्या बोटाने त्यांनी मोदी सरकारला मतदान केले ते बोट कापून
ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट म्हणून पाठवत आहे.
9. नंदकुमारच्या मृतदेहाच्या तपासादरम्यान पोलिसांना बर्म्युडाच्या खिशातून एक चिठ्ठीही सापडली,
ज्यामध्ये आत्महत्येचे कारण नमूद करण्यात आले होते.
10.या प्रकरणात एका मंत्र्याचा हात असल्याचा धनंजयचा आरोप आहे, त्यामुळे तपास संथगतीने सुरू आहे.
धनंजय ननावरे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेचे आमदार बालाजी किणीकरांचे स्वीय सहाय्यक शशिकांत साठे,
पप्पू कलानी यांच्या जवळचे अन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते कमलेश निकम, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी नरेश गायकवाड
यांच्यासह आणखी २ ते ३ जणांना ठाणे क्राईम ब्रँचकडून अटक करण्यात आल्याचे समजते.
“नविन संविधान” वर हंगामा, कोण आहे बिबेक देबरॉय? संपूर्ण प्रकरण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 19,2023 | 12:20 PM
WebTitle – Suicide of brother and sister-in-law, distraught person cuts finger ulhasngar