भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार Sonali Phogat सोनाली फोगाट यांचे निधन झाले आहे. गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना हिसार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र त्या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता असं असलं तरी. त्या भाजपच्या हरियाणा युनिटच्या प्रदेश उपाध्यक्षाही होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, मैत्रिणींसोबत गोव्याला फिरायला गेल्या होत्या.
मृत्यूपूर्वी बदलली होती प्रोफाइल डीपी
Sonali Phogat सोनाली फोगाट एक राजकीय नेता असण्यासोबतच टिक-टॉक स्टार देखील होत्या,किंबहुना त्याच कारणाने लोकप्रियता पाहून भाजपने त्यांना तिकीट दिलं होतं.त्या नंतर बिग बॉसमध्येही दिसून आल्या. सोनाली फोगाट यांचे सोमवारी रात्री गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली फोगाट यांनी मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर त्यांचा डीपी बदलला होता आणि त्यासोबत एक व्हिडिओही शेअर केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मैत्रिणींसोबत गोव्याला फिरायला गेल्या होत्या.
कोण आहे सोनाली फोगाट? सोनाली फोगाट विषयी माहिती
Sonali Phogat सोनाली फोगाट चा जन्म 21 सप्टेंबर 1979 रोजी हरियाणातील फतेहाबाद येथे झाला.
तिने 2006 मध्ये दूरदर्शनच्या अँकरिंगने आपल्या करिअरची सुरुवात केली. 2008 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
सोनाली फोगाटच्या पतीचा 2016 मध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आदमपूर विधानसभा मतदारसंघातून सोनाली फोगाट यांना उमेदवारी दिली होती,
परंतु काँग्रेस उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला.
सोशल मीडियावर सोनाली फोगाट चे लाखो चाहते आहेत
सोनाली फोगाट टिक टॉकच्या माध्यमातून देशभरात स्टार बनल्या होत्या. त्यांचे करोडो चाहते आहेत.
मृत्यूपूर्वी त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओलाही यूजर्स प्रचंड पसंती देत आहेत.
सोनाली फोगाट टीव्ही शो बिग बॉसमध्येही सहभागी झाल्या होत्या. सलमान खान हा शो होस्ट करतो.
सोनाली फोगाट ने सोशल मिडियात अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली होती
Sonali Phogat सोनाली फोगाट 24 जुलै रोजी सोशल मीडियावर लाईव्ह आली होती त्यावेळी तिने live सुरू असताना अनुसूचित जाती समाजासाठी एक शब्द वापरला ज्यावर भारताने बंदी घातली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील हा शब्द गुन्हेगारी स्वरूपाचा मानला आहे.शानल अलायन्स फॉर दलित ह्युमन राइट्सचे निमंत्रक रजत कलसन यांनी त्यांचे वकील प्रवेश महिपाल यांच्यामार्फत त्यांना याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवली होती, तसेच माफीचा व्हिडिओ १५ दिवसांत सोशल मीडियावर टाकण्यास सांगितले आहे, अन्यथा त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येईल असे सांगण्यात आले होते,मात्र सोनाली फोगाट ने माफी मागितली नव्हती असे कळते.
एससी-एसटी कायद्याअंतर्गत हा शब्द गुन्हेगारी स्वरूपाचा आणि अपमानास्पद
कलसननेशी संबंधित बंदी घातलेला शब्द उच्चारला.ते म्हणाले की, सोनालीचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला.याद्वारे संपूर्ण अनुसूचित जाती वर्गाला अपमानित करण्याचे काम सोनाली फोगाट ने केले आहे. कलसन म्हणाले की 1982 मध्येच भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने भारतातील सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना या शब्दावर बंदी घालण्यासाठी अधिसूचना जारी केली होती.
कलसन म्हणाले की, यावेळी सर्वोच्च न्यायालयात मंजू देवी विरुद्ध ओम कर्जित सिंह अहुलवालियाच्या प्रकरणात 2017 मध्ये हा शब्द गुन्हेगारी स्वरूपाचा मानला गेला आहे. कलसन म्हणाले की, एससी-एसटी कायद्याच्या कलम ३ अंतर्गतही हा शब्द गुन्हेगारी स्वरूपाचा आणि अपमानास्पद आहे.
‘अफजल’ बनून ‘विष्णू’ ने दिली मुकेश अंबानी ना जीवे मारण्याची धमकी
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 23,2022, 12:22 PM
WebTitle – Sonali Phogat BJP leader and actress passed away