सोलापूर : सोलापूरचे भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी शिवाचार्य यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य (Solapur Mp Jay Siddheshwar Swami ) यांचा बनावट जातीचा दाखला तयार करणाऱ्या पोलिसांनी अटक केली आहे. शिवसिद्ध बुळा असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवला होता.
यानंतर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी जातीचा बनावट दाखल तयार केला होता.
हा बनावट दाखला बनवणाऱ्या शिवसिद्ध बुळा याला पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
सोलापूर भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचं जात वैधता प्रमाणपत्र जातपडताळणी समितीने रद्द केले आहे. सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना, बेडाजंगम जातीचा दाखला सादर केला होता. तो दाखला समितीने अवैध ठरविला आहे. त्यामुळे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची खासदारकी धोक्यात आली आहे.
खासदारकी वाचवण्यासाठी धडपड
सोलापूरचे भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी हे आपली खासदारकी वाचवण्याची धडपड करताना दिसले होते. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचं जात प्रमाणपत्र सोलापुरातील जात पडताळणी समितीने रद्द ठरविलं आहे. त्यामुळे त्यांच्या खासदारकीवर टांगती तलवार आहे.खासदारकी वाचवण्यासाठी भाजपचे खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य धडपडत असून 9 फेब्रुवारी 2020 रोजीअक्कलकोट-सोलापूर प्रवासादरम्यान वळसंग हद्दीत जातीचा दाखला गहाळ झाल्याची तक्रार सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वळसंग पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती.आता बनावट जातीचा दाखला देणाऱ्यालाच अटक केल्याने हा प्रश्नही निकालात निघाला असे म्हणता येईल.
नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र कोर्टाकडून रद्द;खासदारकी धोक्यात
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो.. @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)