अमरावती/ मुंबई : युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केलं आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांना धक्का बसला आहे. इतकंच नाही तर खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने दोन लाखांचा दंडही ठोठावला आहे.
नवनीत राणा या 2019 साली अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांपैकी एक असलेल्या आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul ) यांचा पराभव केला.
शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला आहे. नवनीत राणा यांना हायकोर्टानं 2 लाखांचा दंडदेखील सुनावला आहे. नवनीत राणा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघातून पराभव केला होता.
याआधीही नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं, पण त्यांनी आजोबांचं सर्टिफिकेट तयार करून निवडणूक लढल्या होत्या.
आजचा निकाल लागला की, ही फसवणूक असल्यानं 2 लाखांचा दंड ठोठावला.
48 तासात प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण त्यांनी 6 दिवसांचा अवधी त्यांनी मागितला.त्यांना सुप्रीम कोर्टात जायचं असेल.” असं याचिकाकर्त्यांचे वकील प्रमोद पाटील यांनी न्यायालयाच्या निकालानंतर माध्यमांशी बोलताना म्हटलं.
खासदार जयसिद्धेश्वर स्वामींच्या अडचणीत वाढ, बनावट जातीचा दाखला बनवणाऱ्याला अटक
नवनीत राणांनी सुप्रीम कोर्टात या निर्णयाला आव्हान दिलं,
तरीही त्याचा फारसा फायदा होणार नसल्याचं मत हायकोर्टाचे वकील एजाज नक्वी यांनी व्यक्त केलंय.
अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ‘मोची’ जातीची असल्याचा त्यांचा दावा खोटा असल्याचे उच्च न्यायालयाने नमूद केले आहे.
रद्द होऊ शकते खासदारकी
कोर्टाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांची खासदारकी अडचणीत येऊ शकते.
त्यांची खासदारकी रद्द होऊन शिक्षा सुद्धा होऊ शकते.
त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेल्या सहा आठवड्यांच्या मुदतीत
खासदार नवनीत राणा आपलं जात प्रमाणपत्र सादर करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा.. खासदार जयसिद्धेश्वर स्वामींच्या अडचणीत वाढ, बनावट जातीचा दाखला बनवणाऱ्याला अटक
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो.. @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)