निवडणुका जवळ आल्या की भारत देशातील दलित आदिवासी तथाकथित उच्च जातीय समाज,नेत्यांसाठी देवपेक्षा कमी नसतात,इतरवेळी टाचेखाली चिरडून चिरडून त्यांची चटणी करण्यात आसुरी आनंद मानणारे निवडणुका जवळ आल्या की त्यांचे पाय धुण्याचे,घरी जाऊन जेवण करण्याचे तमाशे करत राहतात.हे सगळं इतकं किळसवाणं असतं की बघूनच शिसारी येते,पण मराठीतच म्हण आहे ना xxणाऱ्याला लाज नसते पण बघणाऱ्याला तरी असतेच.असावीच,मध्यप्रदेशातील सीधी Sidhi Viral Video येथे आदिवासी व्यक्तीवर भाजपच्या प्रवेश शुक्ला ने मूत्र विसर्जन करत आपल्या सामाजिक जातीय व्यवस्थेचे जळजळीत उदाहरण समोर ठेवले,आता सीधी कांड करणारा शुक्ला विशिष्ट जातीचा त्यात भाजपचा अधिकृत पदाधिकारी, सिधी विधानसभा आमदार पंडित केदारनाथ शुक्ला याचा माजी आमदार प्रतिनिधी.
त्यामुळे भाजपचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान एक्शनमोडमध्ये आले.यावर पांघरून घालण्यासाठी त्यांनी पीडित आदिवासी तरुणाची भेट घेतली,इतकच नाही,त्याचे पाय धुतले,त्याच्यासोबत जेवण सुद्धा केलं हे सगळं त्यांनी व्यवस्थित चित्रीकरण करत केलं,आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मिडियात शेअर केले,आजकाल सोशल मिडियाचा हा एक साइड इफेक्ट आहे,कुणालातरी विशेषत: गरीब असहाय लोकाना काहीतरी फुटकळ केळं हातात टेकवून फोटो सेशन व्हिडिओ सेशन करण्याची एक फॅशन रुजू लागलीय,तसेच हे.याला पावर्टी पॉर्न म्हणता येईल.
Sidhi Viral Video
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून पाय धुण्याचा साग्रसंगीत कार्यक्रम पार पडल्यानंतर,मुख्यमंत्र्यांची इमेज बिल्डिंग झाल्यानंतर हा पीडित तरुण गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास सिधीपासून १८ किमी अंतरावर असलेल्या करौंडी गावात पोहोचला. सकाळी तो उठला तेव्हा त्याच्या पडझड झालेल्या घराबाहेर सर्व माध्यमांचे कॅमेरे त्याची वाट पाहत होते. ज्या जिल्हाधिकारी, एसपींना भेटणं देखील शक्य नसतं ते दोघे साक्षात सकाळी सकाळी 5 लाख रुपये आणि पीएम आवाससाठी दीड लाख रुपयांचा धनादेश घेऊन उभे होते.हे अधिकारीही तिथून निघाले नव्हते की तिथं काँग्रेसचे काही नेते पोहोचले. पीडित आदिवासी तरुणाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. अर्थातच हे सगळं बाकायदा फोटोसेशन व्हिडिओ सेशन करत चाललेलं.
आदिवासी तरुणाच्या अंगावर गंगेचे पाणी शिंपडलं. त्याला पवित्र केलं.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ग्यान सिंग यांनी पीडित आदिवासी तरुणाच्या अंगावर गंगेचे पाणी शिंपडलं. त्याला पवित्र केलं.त्यानंतर भाजपचेही इतर नेते पोहोचले.त्यांनी पीडित व्यक्तीला जबरदस्तीने मिठी मारली. दरम्यान, 12 पोलिसांना पाहून शेजारी पाजारी आदिवासी थोडे घाबरले… मग कळले की ते त्यांच्या घराची आणि ये-जा करणाऱ्यांची व्यवस्था सांभाळण्यासाठी तैनात आहेत. पीपली लाईव्ह या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे कमी-अधिक प्रमाणात तेच दृश्य सध्या मध्यप्रदेश सीधी गावात दिसत आहे.
पीडित आदिवासी तरुणाची अवस्था चित्रपटातील नत्था या पात्रासारखीच होती. चित्रपटातील नुकसान भरपाई मिळवण्यासाठी नत्थाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मग त्याच्या दिनचर्येचा त्याच्यावर कसा परिणाम झाला याची ही कथा होती. सीधी येथे प्रवेश शुक्ला ने केलेल्या मूत्र कांड प्रमाणे नेमका हाच प्रकार पीडित आदिवासी तरुणाच्या घरी दिसला. येथे नुकसान भरपाई हा उद्देश नव्हता, मात्र आदिवासी तरुणांना निश्चितच नुकसान भरपाई मिळाली, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. रात्री 11 वाजेपर्यंत वृत्त लिहिपर्यंत या पीडित आदिवासीच्या घरी पोलीस कर्मचारी आणि नेते थबकले होते.
पीडित आदिवासी म्हणाला खूप बदनामी झाली, आता यावर बोलायचे नाही
७२ तासांच्या नाट्यानंतर पीडित आदिवासी तरुणाने सांगितले- ‘व्हिडिओ जुना आहे. पोलिसांनी मला एक दिवस पोलिस ठाण्यात ठेवलं,
दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात राहिलो, नंतर प्रवास करून भोपाळला पोहोचलो,
आता घरी आल्यावर मला बरे वाटतंय.खूप बदनामी झालीय.त्यावर आता बोलायचं नाही.
आरोपी प्रवेश शुक्ला याला शिक्षा झाली आहे. मला पुढे काही नको.
प्रवेश शुक्ला वर काय कारवाई झाली?
जिल्हा सीधी येथील व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आरोपी प्रवेश शुक्ला ला जिल्हाधिकारी सिधी यांनी ताब्यात घेण्याचे आदेश दिल्यानंतर
याच्याविरुद्ध एन.एस.ए. अंतर्गत कारवाई करून आरोपीची रवानगी मध्यवर्ती कारागृह रीवा येथे करण्यात आली आहे.
सीधी लघवी / मूत्र कांड काय आहे? sidhi peshab kand kya hai
सीधी जिल्ह्यातील कुबरीबाजार येथे एक आदिवासी गरीब तरुण बसला होता.प्रवेश शुक्ला याने त्यांच्यावर लघवी केली.
अज्ञात व्यक्तीने हा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तो व्हायरल झाला अन सगळेच हादरले.
प्रवेश शुक्ला (माहिती) कोण आहे?
कुबरी गावचा रहिवासी असलेला प्रवेश शुक्ला हा सिधी विधानसभा आमदार पंडित केदारनाथ शुक्ला याचा
माजी आमदार प्रतिनिधी होता. सध्या तो भाजपचा सक्रिय कार्यकर्ता असल्याचे कळते.
समान नागरी कायदा फसवणूक, हिंदू राष्ट्राशी जोडणारा अजेंडा – अमर्त्य सेन
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा....
First Published by Team Jaaglya Bharat on 08 JULY 2023, 12:05 PM
WebTitle – sidhi urinate incident, the victimized tribals became the subject of the film ‘Peepli Live’