गुजरात,दि 3 – देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक झपाट्यानं वाढत आहे.गेल्या आठवड्याभरापासून देशात दररोज कोरोनाच्या ३ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. देशातील आरोग्य व्यवस्था व्हेटिंलेटरवर आहे.स्मशान भूमी दिवस रात्र जळत आहे. अशा परिस्थितीत काही ठिकाणी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. गुजरातमध्ये तब्बल 2,73,000 बनावट रेमेडिसीव्हिर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत.
गुजरातमध्ये तब्बल 2,73,000 बनावट रेमॅडिसीव्हिर इंजेक्शन
वाढत्या रुग्णसंख्येमुळे औषधे, ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर अशा वैद्यकीय सुविधांचा तुटवडा भासू लागला आहे.अशातच ऑक्सिजन, करोनाच्या उपचारासाठी लागणारी औषधे यांचा काळाबाजारही काही लोक करत आहेत.रेमडेसिविर हे कोरोनाच्या उपचारासाठी लागणारं एक महत्त्वाचं औषध आहे. काही जण ह्या नावाने बनावट औषधे विकत आहेत.
अशीच एक धडकी भरवणारी घटना महाराष्ट्राच्या शेजारच्या म्हणजेच गुजरात या राज्यातून आली आहे.गुजरातमध्ये तब्बल 2,73,000 बनावट रेमॅडिसीव्हिर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत.ही काळजाचा ठोक चुकवणारी आणि कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांच्या छातीत धडकी भरवणारी बातमी आहे.रेमडेसिव्हीर चे बनावट इंजेक्शन बनवणारे मोठे रॅकेट पकडण्यात आले आहे.
या रॅकेट मागे कोण आहेत? कोणते माफिया आहेत.याचा तपास आता तपास यंत्रणा करत आहेत.मात्र ही बनावट रेमेडिसीव्हिर इंजेक्शन आणखी कुठे कुठे आतापर्यंत पोहोचली आहेत? किंवा काही रुग्णांना तर दिली गेली नाहीत ना हा विचारही चिंतेत टाकणारा आहे.
संपूर्ण देशात कोरोनाच्या महामारीने हाहाकार उडालेला असताना माणुसकीला काळिमा फासणारे असे कृत्य
गुजरात राज्यातून समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
अशा समाज विघातक लोकांना कठोरातील कठोर शिक्षा करणे गरजेचे आहे.
गुजरात मॉडेलची चर्चा आपल्याकडे काही वेळेस जाणीवपूर्वक घडवून आणली जाते. मात्र असे गुजरात मॉडेल छातीत धडकी भरवणारे आहे.
नागरिकांनी आपल्या रुग्णास रेमेडिसीव्हिर इंजेक्शन देताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे.
तसेच कुणी याचा काळाबाजार करत असेल तर संबंधित यंत्रणांना त्वरित माहिती द्यावी असे आम्ही आवाहन करत आहोत.
काळ्या बाजारात तुम्हाला खरे रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळेलच असे नाही. त्यामुळे अधिकृत विक्रेत्याकडूनच ते खरेदी करावे.
टीम जागल्या भारत
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on MAY 03, 2021 23: 40 PM
WebTitle – shocking-2,73000-fake-Remdesivir-injections-seized-in-gujarat-2021-05-03