भारताचा भाग असलेल्या अंदमान निकोबार बेटांपैकी आणखी एक (Sentinel Island) सेंटीनेल बेट नावाचं बेट आहे. अंदमान निकोबार पासून ते फक्त 50 किलोमीटर दूर आहे.तिथल्या सेंटिनेल आदिवासींनी जॉन ऍलन चाऊ या अमेरिकन मिशनरीची हत्या केल्याची बातमी पसरताच जगभरात विविधप्रकरच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या.बंगालच्या उपसागरातील भारतीय द्वीपसमूहात नॉर्थ सेंटिनेल बेटाचा समावेश होतो. हे भारतातील एक असे बेट आहे, ज्यावर 60 हजार वर्षांपासून मानव राहत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे, परंतु ते काय खातात, कोणती भाषा बोलतात याबद्दल आजवर आपल्याला किंवा इतर जगाला सुद्धा माहीत नाही. अवघ्या 23 चौरस मैलांच्या या छोट्या बेटावर त्सुनामी सुद्धा आली होती, परंतु त्यावेळी चक्रीवादळासारखी आपत्ती असूनही त्यांनी स्वतःला कसे सुरक्षित ठेवले हे जगासाठी कोडेच आहे.आज आपण याच सेंटिनेल बेटाबद्दल जाणून घेणार आहोत.
सेंटिनेल बेटावर इतरांना प्रवेश आहे का?
सेंटिनेलीज आदिवासींच्या या बेटावर कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश प्रतिबंधित आहे कारण इथले आदिवासी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीचे आपल्या भागात येणे पसंत करत नाहीत.कोणत्याही परिस्थितीत ते त्यांच्या बेटावर इतर कोणत्याही मानव व्यक्तीस सहन करत नाहीत.हे लक्षात घेऊन भारत सरकारने सुद्धा इथं प्रवेश करण्यावर बंदी घातलेली आहे.
अमेरिकन मिशनरी जॉन ऍलन चाऊ यांना गमवावे लागले प्राण
अमेरिकन मिशनरी जॉन ऍलन चाऊ हे त्यांच्याकडे बेकायदेशीरपणे गेले आणि त्यांनी या आदिवासी लोकांसोबत मैत्री करण्याचा प्रयत्न केला. जॉनने विचार केला की तो या सेंटिनेलीज आदिवासींना येशूबद्दल सांगेल आणि त्यांना ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित करेल.जॉनने बेकायदेशीरपणे जॉनला आदिवासींकडे नेण्यासाठी मच्छिमारांना 25000 रुपयेही दिले होते. थोडं अंतर गेल्यावर मच्छीमार थांबला आणि तिथून जॉन त्याच्या कयाकने बेटावर पोहोचला. पहिल्या दिवशी तो परत आला, पण दुसऱ्या दिवशी जॉनने पुन्हा तेच केले आणि यावेळी तो परत आलाच नाही. आदिवासी बेटावर जॉनचा मृतदेह ओढत असल्याचे एका मच्छिमाराने पाहिले होते.असे समजते की जॉनने तिथे जाण्यासाठी अधिकृतपणे कोणाचीही परवानगी घेतली नव्हती. ना वनविभागाची परवानगी घेतली, ना स्थानिक पोलिसांची, ना अन्य अधिकाऱ्याची.त्यामुळे त्याच्या दौऱ्याबद्दल सुद्धा प्रशासनिक पातळीवर कुणाला काही माहिती नव्हती.
आदिवासींशी कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवण्यास का मनाई आहे?
संपर्क न ठेवण्याची दोन मोठी कारणे आहेत. प्रथम, या लोकांना बाहेरील जगाशी कोणत्याही प्रकारे संपर्क नको असतो. जो कोणी असा प्रयत्न करतो, त्यांच्यावर ते तीर-कमानीने हल्ला करतात. अशा परिस्थितीत, त्यांच्याशी संपर्क करणे घातक आहे.दुसरं महत्वाचं कारण असं की जर लोक त्या बेटावर मोठ्याप्रमाणावर गेले तर त्या आदिवासींना यापूर्वी कधीही न झालेले आजार पसरण्याचा धोका आहे आणि त्याच वेळी त्यांच्या संस्कृतीलाही हानी पोहोचण्याचा धोका आहे.
बेटावर केवळ 15 लोक आणि 10 घरे
एक अनुमानानुसार या बेटावर 15 ते 150 लोकसंख्या असण्याची शक्यता असल्याचे वर्तवले जाते. मात्र 2011 च्या जनगणेनुसार इथे एकूण 10 घरे आणि 15 लोक असल्याची माहिती मिळाली आहे.यामध्ये 12 पुरुष आणि 3 महिला असल्याचे समजते.1788 इंग्रजांनी त्यांची जनगणना केली तेव्हा त्यांची संख्या 6 ते 8 हजार असल्याचे समजते.यामुळेच त्यावेळी इंग्रज यांच्यावर विजय मिळवू शकले नाहीत किंवा त्यांना गुलाम करू शकले नाहीत.
मात्र,कोणताही पुरावा नसताना सेंटीलीजना नरभक्षी किंवा हिंसक मानलं जातं हा खरतर त्यांच्यावर अन्याय आहे.आणि आपण आपल्या जगातील कायदे नियम लादून त्यांची उलट बदनामी करतो आहोत याचे भान लोकांनी ठेवले पाहिजे.आपण जर त्यांच्या जगात प्रवेश केला तर ते त्यांचे जग वाचवायला स्वसंरक्षणार्थ प्रतिकार करणारच.हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
ब्रिटिशांनी सेंटीनेल लोकांना आपल्या जगात आणले त्यातले दोन मृत्यू पावले
1867 मध्ये निनवेह नावाचे एक भारतीय जहाज या बेटावर येऊन धडकले.त्यावेळी प्रवासी आणि जहाजावरील कर्मचारी यांच्यावर सेंटीनेल आदिवासीनी गैरसमजुतीतून हल्ला केला.त्यांना वाटले असावे हे जहाज आपल्यावर लढाई करण्यासाठी येऊन धडकले आहे.त्यावेळी तत्कालीन ब्रिटिश नौसेनेने या जहाजावरील कर्मचारी प्रवाशांना वाचवले.ब्रिटिश नौसेना अधिकारी मौरीस बिडाल पोर्टमन हे अंदमान आणि निकोबार बेटांची वस समूहाची देखरेख करत असत.त्यांनी 1879 ते 1901 या काळात खूप अंदमानी जातीजमातींबद्दल माहिती मिळवली,एकदा त्यांनी पोर्टब्लेअर ला त्यांच्यासोबत उत्तरी सेंटीनलीज जमातीच्या चार मुलं आणि एक वृद्ध जोडप्याला घेऊन आले.बेट सोडून नव्या जगात आलेलं म्हातारे जोडपे लगेचच आजारी पडून मृत्युमुखी पडले.त्यांचे शरीर नव्या जगातील किटाणू आणि संक्रमणांना सहन करू शकलं नाही.त्यानंतर त्या दोन मुलांना पुन्हा त्यांच्या बेटावर सोडून देण्यात आले.
सहा पैकी आता केवळ चार जमाती उरल्या
या बेटांवर अगोदर जारवा, ओंगी ,ग्रेट अंदमानीज,सेंटीनलीज,शोम्पनीज आणि बो अशा सहा जमातींचे वास्तव्य होते.
त्यापैकी आता केवळचारच समूह आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी झगडत आहेत.
हेलिकॉप्टरवर बाण मारण्यात आले होते
2004 च्या त्सुनामी दरम्यान, सेंटिनेल आदिवासींच्या मदतीसाठी सरकारने तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर सेंटिनेल बेटावर पाठवले होते,
परंतु आदिवासींनी हेलिकॉप्टरवरच बाण सोडण्यास सुरुवात केली. 2006 मध्ये दोन मच्छिमार बोटीसह बेटाजवळ भटकले असता त्यांना आपला जीव गमवावा लागला होता. 1981 मध्ये, जेव्हा एक जहाज बेटाच्या खडकाजवळ अडकले तेव्हा आदिवासींनी त्यांच्यावर बाण आणि भाल्यांच्या सहाय्याने जहाजाच्या क्रूवर हल्ला केला होता. मग कसे तरी हेलिकॉप्टरच्या मदतीने त्या लोकांना वाचवण्यात आले.
नारळ पाहून आदिवासी खूश झाले होते
जिओ ब्रदर या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओनुसार, या लोकांशी पहिला मैत्रीपूर्ण संपर्क 1991 मध्ये झाला, जेव्हा अनेक नारळ एका बोटीत भरून बेटाच्या जवळ नेण्यात आले. त्यानंतर प्रथमच नारळ पाण्यात त्यांच्याजवळ टाकण्यात आले त्यावेळी स्थानिक आदिवासी लोक आनंदाने ते नारळ उचलताना दिसून आले.
खरंतर या बेटावर नारळ नाहीत आणि इथल्या आदिवासींना ते आवडतात.
पण मैत्रीपूर्ण संपर्काची ही पहिली आणि शेवटची संधी होती.यानंतर सरकारकडून 1997 मध्ये संपर्क प्रयत्न सोडून देण्यात आले.
या लोकांच्या संरक्षणासाठी केंद्रसरकारने 2004 साली ट्रायबल अफेअर मंत्रालय आणि अंदमान निकोबार प्रशासनाच्या सोबत मिळून एक नीती बनवली.जंगलापासून मिळणाऱ्या विविध साधन संपत्तीच्या रक्षणार्थ जारवा जमातीच्या योगदान लक्षात घेऊन त्यांचे आरक्षित क्षेत्र असणाऱ्या 847 वर्ग किलोमीटर चे क्षेत्र वाढवून 1028 वर्ग किलोमीटर आरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
सेंटीनल हे बेट खास का आहे?
– पोर्ट ब्लेअरपासून 50 किमी अंतरावर आहे
-उत्तर सेंटिनेल बेट फक्त 23 चौरस मैलांमध्ये पसरले आहे
– सुमारे 60 हजार वर्षांपासून आदिवासी येथे राहतात.
– त्यांची संख्या 100 पेक्षा कमी आहे
-2011 च्या जनगणनेनुसार बेटावर 10 घरे आहेत.या घरांमध्ये केवळ 15 लोक राहतात
– त्यांची भाषा, संस्कृती, खाद्यपदार्थ याबद्दल काहीही माहिती नाही.
याचमुळे Sentinel Island उत्तर सेंटिनेल बेट आजही जगासाठी एक रहस्य बनून आहे.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आम्हाला जरूर कळवा.अशा विविध विषयांवरील माहितीसाठी आम्हाला फॉलो करा.
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा, )
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 16, 2022 21: 17 PM
WebTitle – Sentinel Island is still a mystery to the world today